Maharashtra Civic Body Polls 2026 Live Updates: राज्यातील 29 महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांसाठी एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आलीय. निवडणुकीच्या रिंगणात एकूण 15 हजार 908 उमेदवार आहेत. मतदान सकाळी 7.30 वाजेपासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत करता येईल.
Election News: राज ठाकरेंचे आरोप निवडणूक आयोगाने फेटाळले
BMC Election 2026: मनपा आयुक्त यांनी मागील आठवड्यात सर्व पक्षीय बैठकीत पाडू मशीन वापर माहिती दिली होती. संपूर्ण डिटेल दिली होती. त्यामुळे राज ठाकरे करत असलेले आरोप राजकीय पक्षांना क्लपना दिली नाही यात तथ्य नसल्याचं राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
PMC Election 2026: पुण्यात 20 ठिकाणी EVM मशिनमध्ये गोंधळ
PMC Election 2026: पुण्यात 20 ठिकाणी EVM मशिनमध्ये गोंधळ. त्यामुळे त्या ठिकाणच्या मशिन बदलल्या गेल्या आहेत. तोपर्यत मतदान थांबवण्यात आलं होतं.
Akola Municipal Corporation Election 2026: अकोल्यात सौम्य लाठीचार्ज
Akola Municipal Corporation Election 2026: अकोल्यातील जुना शहर भागातील श्री शिवाजी विद्यालय येथे भाजप उमेदवार करण शाहू आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार राजेश मिश्रा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक. या वादामुळे झालेली गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीचार्ज. महिलांना शिवीगाळ केली जात असल्याचा भाजप उमेदवाराने केला होता आरोप.
BMC Election 2026: उद्धव ठाकरें ताडदेवमध्ये, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी
BMC Election 2026: उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे ताडदेव इथे पोहोचले आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या आधी त्यांनी लालबाग, परळ, शिवडी भागात ही भेटीगाठी दिल्या होत्या.
Latur Municipal Corporation Election 2026: लातूरमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत 30.72 टक्के मतदान
Latur Municipal Corporation Election 2026: लातूरमध्ये दुपारी दीड वाजेपर्यंत 30.72 टक्के मतदान
Akola Municipal Corporation Election 2026: अकोल्यातील तापडिया शाळेतील मतदान केंद्रामधल्या ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची नागरिकांची तक्रार.
Akola Municipal Corporation Election 2026: अकोल्यातील तापडिया शाळेतील मतदान केंद्रामधल्या ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची नागरिकांची तक्रार.
Election Update: अमरावतीत उमेदवाराचा मतदान केंद्रातच राडा
अमरावती ब्रेकींग
अमरावती महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 17 गडगडेश्वर शारदा विद्यालय येथे इव्हीएम मशीन बंद पडल्याने शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने केला राडा
EVM मशीन बंद पडल्या बरोबर तात्काळ का बदलवली नाही असा प्रश्न करत मतदान केंद्रा मध्ये शिरून उमेदवाराने केला राडा अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वाना मतदान केंद्राच्या काढले बाहेर
Maharashtra Municipal Corporation Election 2026: 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 29.22 टक्के मतदान
Maharashtra Municipal Corporation Election 2026: दुपारी 1.30 पर्यंत 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सुमारे 29.22 टक्के मतदान झाले
Election 2026: जळगाव महापालिका निवडणुकीत अपक्ष आणि शिवसेनेत राडा
जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाच मध्ये अपक्ष उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्याकडून मारहाण झाल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला असून या मारहाणीत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते वसंत सोनवणे हे जखमी झाले आहे दरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Election 2026: छ. संभाजीनगरमध्ये टी- शर्ट घालून उमेदवाराचा प्रचार
ब्रेकिंग छत्रपती संभाजीनगर
भाजप पक्षाच्या वतीने उमेदवारांचा निवडणुकीच्या दिवशी प्रचार केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टी-शर्टच्या माध्यमातून कोणी कोणते बटन दाबायचे याचा अप्रत्यक्ष प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार असलेल्या महिला आणि पुरुषाने केला. बराच वेळ परिसरात गोंधळाच वातावरण निर्माण झालं होतं.
Nashik Election 2026: अभिनेत्री सायली संजीव हिने केलं नाशिक इथं मतदान
Nashik Election 2026: मराठी सिनेअभिनेत्री सायली संजीव ही खास मतदानासाठी मुंबईहुन नाशिकला दाखल झाली. तिने पोतदार हायस्कुलमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. आपलं एक मत परिवर्तन घडवू शकते त्यामुळे मतदान नक्की करा असं आवाहन सायलीने केलय.
PMC Election 2026: पुण्यात अजूनही संथ गतीने मतदान, आतापर्यत 26.28 टक्के मतदान
पुण्यात दुपारी दिड पर्यंत एकूण आकडेवारी (City Snapshot)
•एकूण मतदार: 35,52,637
•पुरुष: 18,32,789
•महिला: 17,19,360
•इतर: 488
•सरासरी मतदान टक्केवारी: 26.28%
सर्वाधिक मतदान झालेले प्रभाग (High Turnout)
जिथे 30% पेक्षा जास्त मतदान झाले:
•मयूर कॉलनी – कोथरूड: 31.56%
•वडगाव शेरी – हिंगणे होम कॉलनी: 30.41%
•शंकर महाराज मठ – बिबवेवाडी: 30.27%
•कर्वेनगर – हिंगणे होम कॉलनी: 30.25%
•शिवाजीनगर – महात्मा फुले मंडई: 29.99% (30% च्या उंबरठ्यावर)
हे भाग प्रामुख्याने मध्यमवर्गीय, सुशिक्षित, गृहसंकुलप्रधान आहेत.
सर्वात कमी मतदान झालेले प्रभाग (Low Turnout)
•गणेश पेठ – जयसिंग प्लॉट: 18.77%
•गोसावी नगर – वाकडवाडी: 19.44%
•दत्तवाडी – रामबाग: 20.53%
•औंध – ओंकार नगर: 21.60%
•रामबाग कॉलनी – शिवाजीनगर: सुमारे 21%
पेठा, बाजारपेठा, स्थलांतरित मतदार आणि कामगारवर्ग असलेल्या भागांत सकाळी मतदान कमी राहिल्याचे स्पष्ट.
महिला विरुद्ध पुरुष मतदान ट्रेंड
•जवळपास सर्व प्रभागांत पुरुष मतदान किंचित जास्त
•मात्र:
•कोथरूड, बिबवेवाडी, कर्वेनगर, वडगाव शेरी भागांत
महिलांची उपस्थिती लक्षणीय
•इतर (तृतीयपंथी) मतदार संख्या कमी, पण स्वतंत्र नोंद सकारात्मक संकेत देते
जास्त मतदान:
•कोथरूड
•कर्वेनगर
•बिबवेवाडी
•वडगाव शेरी
•काही भागांतील शिवाजीनगर
कमी मतदान:
•जुना शहर भाग
•पेठा
•व्यापारी आणि स्थलांतरित लोकसंख्या असलेले प्रभाग
Maharashtra Municipal Corporation Election 2026: शाई सुकल्यानंतर पुसली जात नाही, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
Maharashtra Municipal Corporation Election 2026: शाई सुकल्यानंतर पुसली जात नाही, राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे
Election 2026: छ. संभाजीनगरमध्ये उमेदवाराच्या पत्नीचं बोगस मतदान
छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क एका उमेदवाराच्या पत्नीचं अज्ञात महिलेने बोगस मतदान केले आहे. पठाण अमेर असे उमेदवाराचे नाव असून, प्रभाग 14 मधील बागवान हॉल मतदान केंद्रावर हा प्रकार उघडकीस आला आहे.
BMC Election 2026: उद्धव ठाकरेंच्या लालबाग परळमध्ये भेटी सत्र
BMC Election 2026: उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी लालबाग परळ शिवडी या भागामध्ये काही ठिकाणी भेटी दिल्या. आता उद्धव ठाकरे भायखळा इथे पोहचले आहेत. ठाकरे मराठी बहुल भागात भेटी देत आहेत. अनेक ठिकाणी मतदारांनी गर्दी केल्याचे दिसत आहे.
Election 2026: पिंपरी चिंचवडमध्ये एक तासापासून इव्हीएम बंद
Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026: थेरगाव प्रभाग क्रमांक 23 मधल्या यशवंतराव चव्हाण शाळेतील मतदान केंद्रामधले ईव्हीएम मशीन एक तासापासून बंद असल्याची तक्रार.
Maharashtra Municipal Corporation Election 2026: मतदारांनी बोटावरील शाई काढण्याचा प्रयत्न करू नये, राज्य निवडणूक आयुक्त
Maharashtra Municipal Corporation Election 2026: मतदारांनी बोटावरील शाई काढण्याचा प्रयत्न करू नये, शाई काढल्यास कारवाई करणार- दिनेश वाघमारे, राज्य निवडणूक आयुक्त
Municipal Corporation Election 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये पैशे वाटण्याचा डाव उधळला
शिंदे गटाच्या उमेदवारांकडून रात्री पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. संभाजीनगर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शाखा प्रमुख चंद्रकांत देवराज यांना माहीत मिळाली की पैसे वाटप होत आहे. त्या वेळी चंद्रकांत देवराज यांनी रिक्षावाल्याला थांबवले असता रिक्षावाल्याने तेथून पळ काढला. चंद्रकांत देवराज या रिक्षाला थांबण्याचा प्रयत्न केला पण तो पैशा सकट पळाला.
Municipal Corporation Election 2026: अहिल्यानगरमध्ये बोगस मतदार पकडले
Ahilyanagar Municipal Corporation Election 2026: अहिल्यानगरमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार चंद्रकांत शेळके यांनी पकडून दिले बोगस मतदार. मतदान केंद्राबाहेर पोलिस आणि उमेदवारांच्या समर्थकांमध्ये खडाजंगी. प्रभाग क्रमांक 3 मधील आनंद विद्यालयाच्या मतदान केंद्रावरील घटना.
Pune Election: ईव्हीएममध्ये पुण्यात अनेक ठिकाणी बिघाड
Pune Municipal Corporation Election 2026: प्रभाग क्रमांक 26 मधील सेंट हिल्डाज स्कूल येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम तीन ते चार वेळा बिघडल्याची तक्रार. बिघाडामुळे दोन ते तीन तासांपर्यंत रखडले मतदान.
Municipal Corporation Election 2026: शाई पुसण्याबाबत आयोगाचे स्पष्टीकरण
Maharashtra Municipal Corporation Election 2026: शाई पुसली जात असल्याबद्दल संभ्रम पसरवला जात आहे, राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारेंचे स्पष्टीकरण. केंद्रीय निवडणूक आयोग वापरत असलेलीच शाई वापरत असल्याची वाघमारे यांची माहिती. 2011 सालापासून मार्कर वापरण्यात येत असल्याची वाघमारे यांची माहिती.
BMC Election 2026: संजय राऊत याचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय? भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे! यांच्यावर काय कारवाई होणार? मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात काढा याना ठेचून असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
निवडणूक आयोग झोपलाय की विकला गेलाय?
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 15, 2026
भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्रन लुंगीवाले छातीवर कमळ लावून मतदानास गेले हा आचार संहितेचा भंग आहे!
यांच्यावर काय कारवाई होणार?
मुख्यमंत्री ठेचून काढण्याची भाषा करतात
काढा याना ठेचून
@supriya_sule
@Dev_Fadnavis
@ECISVEEP pic.twitter.com/GA9CFbKlGo
BMC Election: अजिंक्य नाईक यांनी केले मतदान
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी मतदान केले. मुंबई विकास यासाठी मतदान आग्रह त्यांनी यावेळी केला.
Municipal Corporation Election 2026: मालेगावमध्ये ही जोरदार राडा
Malegaon Municipal Corporation Election 2026: मालेगावमध्ये मतदान केंद्रातील अधिकारी विशिष्ट उमेदवाराला मतदान करा, असे सांगत असल्याचा आरोप एका उमेदवाराने व्हिडीओ रेकॉर्डींग करत अधिकाऱ्यांना विचारला जाब.
Jalgaon Municipal Corporation Election 2026: जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात गोळीबार झाल्याची माहिती
Jalgaon Municipal Corporation Election 2026: जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात दोन तरुणांमध्ये वाद, वादातून हवेत गोळीबार झाल्याची माहिती
जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरामध्ये हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती
दोन तरुणांमध्ये झालेल्या वादातून हवेत गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती
गोळीबाराच्या घटनेचे कारण अद्याप अस्पष्ट
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हवेत गोळीबार करणाऱ्या तरुणांचा पोलिसांकडून शोध सुरू
जळगाव शहरात महापालिका निवडणुकीचे मतदान सुरू असताना हवेत गोळीबाराच्या घटनेने पिंप्राळा परिसरात तणावाचे वातावरण
Election 2026 LIVE: नाशिक रोडमध्ये उमेदवाराच्या घरावर हल्ला
Nashik Breaking -
- नाशिकरोड परिसरात प्रभाग क्रमांक 21 मध्ये भाजप उमेदवाराच्या घरावर हल्ला
- घराचा दरवाजा तोडल्याची दृश्य मोबाईल कॅमेरात कैद
- उमेदवार नितीन खोले पैसे वाटप करत असल्याचा शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा आरोप
- दोन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकांमध्ये भिडले
Nagpur Municipal Corporation Election 2026: नागपूरात संथ गतीने मतदान
नागपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26
दुपारी 1.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 26.50%
Akola Municipal Corporation Election 2026: अकोल्यामध्ये 1.30 वाजेपर्यंत 30.45% मतदान
Akola Municipal Corporation Election 2026: अकोल्यामध्ये 1.30 वाजेपर्यंत 30.45% मतदान
Election 2026 LIVE: अमित देशमुख यांची मोठी प्रतिक्रीया
Latur Municipal Corporation Election 2026: लातूरमध्ये काँग्रेसला बहुमत मिळेल, आमदार अमित देशमुख यांनी केला दावा. विलासराव देशमुखांवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी केलेल्या विधानानंतर वातावरण फिरल्याचे नोंदवले निरीक्षण
Amravati Municipal Corporation Election 2026: अमरावतीमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 27.89% मतदान
Amravati Municipal Corporation Election 2026: अमरावतीमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 27.89% मतदान
Ichalkaranji Municipal Corporation Election 2026: इचलकरंजीमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 31.29%% मतदान
Ichalkaranji Municipal Corporation Election 2026: इचलकरंजीमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 31.29%% मतदान
Electuon Update: मालेगावमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 33.05% मतदान
Malegaon Municipal Corporation Election 2026: मालेगावमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 33.05% मतदान
Election Update: ठाण्यात ही मतदानाची टक्केवारी वाढतेय
Thane Municipal Corporation Election 2026: ठाण्यामध्ये दुपारी 1.30 पर्यंत 30.75% मतदान
Election 2026 LIVE: नांदेडमध्ये 29.50 टक्के मतदान
Nanded Municipal Corporation Election 2026: नांदेडमध्ये दुपारी 1.30 पर्यंत 29.50% मतदान
Election 2026 LIVE: पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मतदानात उदासीनता
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये मतदानात उदासीनता
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत एकूण 32 प्रभाग आहेत.
एकूण मतदारसंख्या 17,13,891 आहे.
यामध्ये
पुरुष मतदार: 9,05,728
महिला मतदार: 8,07,966
इतर: 197
⸻
सकाळी 7.30 ते दुपारी 1.30 पर्यंतचे एकूण मतदान
या कालावधीत एकूण मतदान झाले आहे 4,82,537.
यामध्ये
पुरुष मतदान: 2,71,282
महिला मतदान: 2,11,249
इतर: 6
एकूण मतदान टक्केवारी: 28.15%
⸻
प्रभागनिहाय मतदानाचा आढावा
* सर्वाधिक मतदान टक्केवारी
प्रभाग क्रमांक 2 – 35.4%
यानंतर
प्रभाग 3 – 33.5%
प्रभाग 16 – 33.26%
प्रभाग 12 – 31.71%
प्रभाग 28 – 31.46%
हे प्रभाग सकाळच्या सत्रात तुलनेने अधिक सक्रिय दिसतात.
⸻
* सर्वात कमी मतदान टक्केवारी
प्रभाग क्रमांक 19 – 18.67%
यानंतर
प्रभाग 13 – 19.15%
प्रभाग 10 – 21.41%
प्रभाग 30 – 22.03%
प्रभाग 11 – 23.45%
या भागांत मतदारांचा उत्साह स्पष्टपणे कमी दिसतो.
⸻
मध्यम मतदान असलेले प्रभाग
25% ते 30% दरम्यान मतदान असलेले बहुतेक प्रभाग आहेत.
यामध्ये प्रभाग क्रमांक 1, 4, 5, 6, 7, 8, 9, 14, 15, 17, 18, 20 ते 29, 31, 32 यांचा समावेश होतो.
यावरून असे दिसते की बहुतांश प्रभागांत मतदानाचा वेग सरासरी आहे.
⸻
लिंगानुसार निरीक्षण
* बहुतांश प्रभागांत पुरुष मतदान महिला मतदानापेक्षा थोडे जास्त आहे.
* काही प्रभागांत (उदा. प्रभाग 1, 16, 25) महिला मतदान चांगल्या प्रमाणात झालेले दिसते.
* “Other” प्रवर्गातील मतदान अत्यल्प आहे.
⸻
एकूण निरीक्षण (राजकीय दृष्टिकोनातून)
1.28.15% मतदान हे शहरी भागासाठी मध्यम ते कमी मानले जाऊ शकते.
2.सकाळच्या सत्रातही अनेक प्रभागांत 20% च्या खाली मतदान असल्याने मतदारांमध्ये उदासीनता स्पष्ट दिसते.
3.दुपारनंतर आणि संध्याकाळच्या सत्रात मतदान वाढले नाही, तर एकूण टर्नआउट कमी राहण्याची शक्यता.
4.जिथे टक्केवारी जास्त आहे, ते प्रभाग संघटनात्मकदृष्ट्या सक्रिय असल्याचे संकेत देतात.
Election 2026 LIVE: पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार उघड, जोरदार राडा
पुणे
पुण्यात बोगस मतदानाचा प्रकार
शिवसेना उमेदवार नाना भानगिरे यांच्या प्रभागात बोगस मतदान झाल्याची धक्कादायक माहिती
पुण्यातील महादेव वाडी परिसरात मोठा राडा
नाना भानगिरे यांच्या कार्यकर्त्यांकडून बोगस मतदारांना चोप
Election 2026 LIVE: अमरावतीत मतदानाचा टक्का वाढला
अमरावती...
* अमरावती महापालिकेसाठी मतदानाची टक्केवारी वाढली. दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण २७.८९ टक्के मतदान...
* मतदान करण्यासाठी अनेक मतदान केंद्रावर रांगा
Election 2026 LIVE: जळगावमध्ये पैसे वाटपाचा व्हिडीओ व्हायरल
जळगावात प्रभाग 18 मध्ये सुप्रीम कॉलनीतील व्हिडिओ व्हायरल..
उमेदवारांकडून पैसे वाटप केला जात असल्याचा आरोप..
पैसे देऊनही महिला मतदान करत नसल्याने पैसे परत करावे म्हणत महिला संताप करताना व्हिडिओ समोर
पैसे परत करत दुसऱ्या महिलेला देण्याचे सांगत दोन तासांपासून मतदानासाठी महिला बहाणा करत असल्याचा व्हिडिओ मध्ये संवाद
Election 2026 LIVE: कोल्हापूरमध्ये दिड वाजेपर्यंत 37 टक्के मतदान
कोल्हापूर ब्रेकिंग
राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत कोल्हापूर अग्रेसर
दुपारी दीड वाजेपर्यंत कोल्हापूर महानगरपालिकेसाठी 37 % मतदान, तर इचलकरंजी महानगरपालिकेसाठी 31.29% मतदान
Election 2026 LIVE: नवी मुंबई महापालिकेत दुपारी दिडपर्यंत 33.26 टक्के मतदान
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 26
मतदान दि. 15 जानेवारी 2026
सकाळी 7.30 ते 1.30
मतदान टक्केवारी- 33.26%
Election 2026 LIVE: जळगाव महापालिकेत दुपारी दिडपर्यंत 22.49 टक्के मतदान
जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक2025-26
दुपारी. 1.30 पर्यंत मतदान.
पुरुष मतदान = 54132
स्त्री मतदान = 44509
एकूण मतदान = 98641
टक्केवारी =22.49 %
Election 2026 LIVE: पनवेलमध्ये दुपारी दिड वाजेपर्यंत 31 टक्के मतदान
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६
दुपारी १:३० वाजेपर्यंत
मतदानाची टक्केवारी : 31%
Election 2026 LIVE विरारमध्ये राडा
विरारच्या मनवेलपाडा येथील पोलिंग बुथवर राडा
बहुजन विकास आघाडीच्या पोलिंग बुथवर भाजप कार्यकर्त्यांचा राडा
भाजपच्या कार्यकर्त्यांनी वाद घालून,शिवीगाळ आणि दमदाटी केल्याचा आरोप
Election 2026 LIVE विक्रोळीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार
विक्रोळीतील टागोर नगर येथील प्रभाग क्रमांक 119 मधील मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजेश शुक्ला हे दुपारी 12 वाजता मतदान करण्यासाठी गेले असता त्यांच्या नावावर सकाळीच मतदान झाल्याचे उघडकीस आले. ही बाब त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्यांना बॅलेट द्वारे मतदान करण्याची मुभा दिली
Election 2026 LIVE उद्धव ठाकरे यांचा प्रश्न
गणेश नाईक यांचा टांगा फरार ऐवजी टांग दुखल्या असतील मतदान केंद्र शोधता शोधता, मंत्र्यांची परिस्थिती अशी मग सामान्यांचं काय होईल - उद्धव ठाकरे, पक्षप्रमुख, शिवसेना (उबाठा)
Election 2026 LIVE 102 वर्षांच्या नागरिकाने केले मतदान
नागपूर :102 वर्ष वयाचे स्वतंत्रता संग्राम सैनिक असलेल्या ज्येष्ठ नागरिक केदारनाथ पाण्डेय यांनी मतदान केले.
Election 2026: मतदानादरम्यान काय पुण्यात काय घडतंय?
Pune Municipal Corporation Election 2026: शाई पुसली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाली नसल्याचे पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांचे म्हणणे. 15-20 EVM बंद पडल्या, मात्र त्या लगेच बदलल्याची दिली माहिती. पुण्यात 60 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान होईल असा अंदाज.
Election 2026:
Maharashtra Municipal Corporation Election 2026: सकाळी 11.30 वाजेपर्यंत 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी सुमारे 17.41 टक्के मतदान.
Election 2026: भाजप कार्यकर्त्यांनी मतदान यंत्राची तोडफोड केल्याचा आरोप
Dhule Municipal Corporation Election 2026: भाजप कार्यकर्त्यांनी मतदान यंत्राची तोडफोड केल्याचा शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सतीश महाले यांचा आरोप. गुन्हा दाखल करण्याची मागणी. धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील 'मिरच्या मारुती प्राथमिक विद्या मंदिरातील' प्रकार.
BMC Elections 2026: विक्रमी मतदान होईल आणि आम्ही 150 जागा जिंकू: मंत्री मंगलप्रभात लोढा
#WATCH | Mumbai | On BMC Elections, Maharashtra Minister Mangal Prabhat Lodha says, "People of Mumbai want protection and they will use their votes to stop infiltration in the city. They want good civic services. People are also understanding that if the BMC will be governed by… pic.twitter.com/VmiuIyzp4e
— ANI (@ANI) January 15, 2026
Election 2026: पनवेल शहरातील मतदानाची टक्केवारी
Panvel Municipal Corporation Election 2026: पनवेलमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 18 टक्के मतदान
BMC Election 2026 LIVE: अभिनेता आमिर खानने बजावला मतदानाचा हक्क
#WATCH | Mumbai: After casting his vote, Actor Aamir Khan says, "...I would tell everyone to definitely cast their precious votes. BMC has made very good arrangements here..." https://t.co/dBOScEybTj pic.twitter.com/Lm7SpXTzBX
— ANI (@ANI) January 15, 2026
BMC Election 2026 LIVE: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बजावला मतदानाचा हक्क
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्नी लता एकनाथ शिंदे, पुत्र खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, प्रकाश संभाजी शिंदे (एकनाथ शिंदे यांचे छोटे बंधू आणि उमेदवार) यांनी मतदानाचा हक्क बजावला
Kalyan news Bogus Voting Incident at Gayatri School Polling Booth Woman Unable to Vote
Kalyan News: सुमन गायकवाड यांनी आपण मतदान केलेच नाही, असा पवित्रा घेतला. मात्र, यादीत त्यांच्या नावासमोर 'मार्क' असल्याने त्यांना मतदान करण्यापासून रोखण्यात आले.
Maharashtra Election 2026: ink Fact Check Can Ink Applied to Finger After Voting Really be wiped Off ndtv Fact Check
Maharashtra Voting INK Controversy Fact Check: खरंच मतदानानंतर लावलेली शाई पुसली जात आहे का? याबाबतच एनडीटीव्ही मराठीने फॅक्ट चेक केला आहे.
BMC Election 2026 LIVE: शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यास पुन्हा मतदान करता येणे शक्य नाही: राज्य निवडणूक आयोग
बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणे हे गैरकृत्य आहे. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचे आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल,असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. बोटावरची शाई पुसून कोणी गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला तरी संबंधित मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही, याबाबतची दक्षता यापूर्वीच घेण्यात आलीय. मतदाराने मतदान केल्यानंतर त्याबाबत नोंद घेण्यात आलेली असते. त्यामुळे केवळ शाई पुसून गैरकृत्य केलेल्या मतदाराला पुन्हा मतदान करता येत नाही. याबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना पुन्हा एकदा सर्व संबंधिताना देण्यात आल्या आहेत. मतदाराच्या बोटाला शाई लावण्याकरिता मार्कर पेनच्या वापराबाबत राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबर 2011 रोजी आणि 28 नोव्हेंबर 2011 रोजी आदेश निर्गमित केले आहेत. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्कर पेनचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल, अशा पद्धतीने मार्कर पेनने शाई लावण्यात यावी; तसेच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजूला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या असून आणि त्या मार्कर पेनवरही नमूद केल्या आहेत. त्यामुळे शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचे गैरकृत्य करू नये, असे आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केले आहे.
Election 2026: जळगावात मतदारांना नाव सापडेना
Jalgaon Municipal Corporation Election 2026: जळगावमध्ये अनेक मतदारांना मतदान केंद्रावर आपले नाव सापडले नाही. आपले नाव कुठल्या मतदान केंद्रावर आहे, याचा शोध घेण्यासाठी मतदारांना करावे लागतायत कष्ट. नावे शोधून देण्यासाठी मतदान केंद्रावर विशेष अधिकारी नियुक्त करण्याची मागणी.
Election 2026 LIVE: वंचित बहुजन आघाडीचा आरोप
- नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीतील मतदानाच्या प्रक्रियेदरम्यान वंचित बहुजन आघाडीकडून आक्षेप
- नागपूर महानगर पालिका निवडणूकीमध्ये अ, ब, क, ड अशा क्रमाने मशीन लागल्या पाहिजे; पण ड, क, ब, अ अशा क्रमाने मशीन लागल्या आहेत
- शहरातील अनेक बुथवर असाच प्रकार असल्याचा आरोप
Election 2026: कल्याणमध्ये पुन्हा बोगस मतदान
Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026: कल्याणमध्ये पुन्हा बोगस मतदान, खरे मतदार मतदानापासून वंचित. कल्याण पूर्वेतील सेंट लुड्स शाळेत मतदानासाठी आलेल्या रमेश पवार यांना त्यांचे नाव वापरून कोणीतरी आधीच मतदान केल्याचे निदर्शनास आले. मतदान ओळखपत्र दाखवून करून मतदान करून गेल्याचे अधिकाऱ्यांनी पवार यांना सांगितले.
BMC Election 2026 LIVE: सत्ता टिकवण्यासाठी सरकार काहीही करू शकते: राज ठाकरे मनसे अध्यक्ष
Mumbai | MNS chief Raj Thackeray says, "The ink that was used before is being replaced with a new pen, and there are complaints about this new pen. If you use a hand sanitizer, the ink disappears. Now, the only option left is to apply the ink, go outside, wipe it off, and then go… https://t.co/yRi4YIjryr pic.twitter.com/4P7ECMNify
— ANI (@ANI) January 15, 2026
Election 2026: अंबादास दानवेंविरोधात पत्रकार परिषद घेणार: चंद्रकांत खैरे
Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026: अंबादास दानवेंना अक्कल नाही! शिवसेना (उबाठा) नेते चंद्रकांत खैरे यांनी पुन्हा घेतले स्वपक्षीय नेत्यावर तोंडसुख. दानवेंच्याविरोधात मोठी पत्रकार परिषद घेणार असल्याची केली घोषणा. दानवे हे निवडणुकीतील प्रचारातून 4 दिवस गायब असल्याचाही केला आहे. दानवेंविरोधात मातोश्रीवर तक्रार केल्याचाही खैरेंचा दावा.
Election 2026 LIVE: मीही मतदान केलंय, बोटावरील शाई पुसतेय का?: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
#WATCH | Nagpur | On MNS chief Raj Thackeray's statement, Maharashtra CM Devendra Fadnavis says, "I have also been marked with a marker, is it erasing? The Election Commission should look into this issue and use something else, they can use oil paint if they want, the elections… https://t.co/YQeMZvhZV7 pic.twitter.com/mKN0wDfmDk
— ANI (@ANI) January 15, 2026
#WATCH | Nagpur | On Maharashtra local body elections, CM Devendra Fadnavis says, "This is an unit of our democracy, which is its foundation stone and therefore voting is very necessary. I appeal to everyone to cast their vote, because voting is not just your right, but also your… pic.twitter.com/fjk44x4cbC
— ANI (@ANI) January 15, 2026
Election 2026 LIVE: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मतदान करण्याचं केलं आवाहन
#WATCH | Nagpur | Amruta Fadnavis, wife of state CM Devendra Fadnavis, says, "This is an important part of the democracy and therefore, everyone should cast their vote. The people should practically think which party is working for development..." https://t.co/1L6HZzWm6D pic.twitter.com/4KRA0bUl8w
— ANI (@ANI) January 15, 2026
BMC Election 2026 LIVE: शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क
Mumbai | Shiv Sena UBT chief Uddhav Thackeray says, "Our entire family voted together, and we appeal to all voters in all constituencies where elections are being held to cast their votes."
— ANI (@ANI) January 15, 2026
He also says, "It should be revealed how the Election Commissioner is paid. The Mumbai… https://t.co/3x4hbSdOwy pic.twitter.com/hMl1K1X2QN
BMC Elections 2026: बॉलिवूडचे ज्येष्ठ निर्माते सलिम खान यांनी केले मतदान
#WATCH | Mumbai | Veteran actor and film producer Salim Khan casts his vote at a polling station for BMC elections. pic.twitter.com/spNnN5TyQU
— ANI (@ANI) January 15, 2026
Election 2026: काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे विधान
Akola Municipal Corporation Election 2026: अकोल्यात काँग्रेसचे 32 ते 35 नगरसेवक निवडून येतील, काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना वाटतेय खात्री
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक सकाळी 11.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक : सकाळी 7.30 वाजेपासून ते सकाळी 11.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
माजिवडा प्रभाग समिती - 18.26 टक्के
वर्तकनगर प्रभाग समिती 18.30 टक्के
लोकमान्य सावरकरनगर -19.8 टक्के
वागळे प्रभाग समिती - 17.02 टक्के
नौपाडा कोपरी - 19.27 टक्के
उथळसर- 21.41 टक्के
कळवा - 17.92 टक्के
मुंब्रा प्रभाग क्रमांक 26, 31 - 16.24 टक्के
मुंब्रा प्रभाग क्रमांक 30,32 - 18.25 टक्के
दिवा प्रभाग क्रमांक 27,28 - 22.29 टक्के
दिवा प्रभाग क्रमांक 29,33 - 20 25 टक्के
BMC Election 2026 LIVE: बृहन्मुंबई महानगरपालिकाने सांगितलं सत्य
BMC Election 2026 LIVE: बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2026साठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई पुसल्या जात असल्याचे वृत्त विविध माध्यमांतून प्रसारित होत आहे. तसेच महानगरपालिका आयुक्त यांनी ही बाब मान्य केल्याचेही वृत्तात सांगितले जात आहे. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे की, मतदानानंतर बोटावरील शाई पुसल्या जात असल्याबाबत महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी कोणत्याही प्रकारचे विधान अथवा वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे माध्यमांत प्रसारित होणाऱ्या वृत्तात कोणतेही तथ्य नाही.
Elections 2026: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी बजावला मतदानाचा हक्क
#WATCH Mumbai: Union Minister Ramdas Athawale said on the Maharashtra municipal elections 2026, "Today is the day of the Municipal Corporation elections in Mumbai... I have cast my vote with my family... We are fully confident that our victory is assured. Our democracy is very… pic.twitter.com/r0Gvoq4Aww
— ANI (@ANI) January 15, 2026
Election 2026: कल्याणमध्ये बोगस मतदान झाल्याचे उघड, मतदाराची नाराजी
Kalyan Dombivli Municipal Corporation Election 2026: कल्याणमधील ज्येष्ठ नागरिक सुमन भालचंद्र गायकवाड यांच्या नावावर कोणीतरी बोगस मतदान केल्याचे उघड, मतदानासाठी पोहोचल्या असता आधीच मतदान झाल्याचे आले निदर्शनास. मतदान करता न आल्याने गायकवाड सुमन यांनी व्यक्त केली नाराजी.
Election 2026: सांगलीमध्ये बोगस मतदानाचा प्रकार?
Sangli Municipal Corporation Election 2026: सांगलीमध्ये शाहिद शेख या तरुणाच्या नावावर आधीच कोणीतरी मतदान केल्याचा प्रकार. प्रभाग 9 मधील सहयाद्री नगर येथील महापालिकेच्या शाळेतील प्रकार.
Election 2026: बोगस मतदाराला मारहाण
Jalgaon Municipal Corporation Election 2026: जळगावमध्ये मतदानकेंद्राबाहेर राडा. अपक्ष उमेदवार पियुष पाटील यांनी बोगस मतदाराला पकडून केली मारहाण. बोगस मतदार असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले. शिवसेना शिंदे गटाने बोगस मतदार पाठवल्याचा आरोप. शिवसेना शिंदे गटाच्या एका कार्यकर्त्यालाही अपक्ष उमेदवाराच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा शिवसेनेचा आरोप.
BMC Election 2026 Police Issue notice Shivsena ubt Activist Arvind Sawant confronts The Police
ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याला वरळी पोलीस स्थानकातून तडीपारीची नोटीस दिल्याने अरविंद सावंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
BMC Election 2026 LIVE: अभिनेता जॉन अब्राहमने बजावला मतदानाचा हक्क
Election 2026: साध्या पाण्यानंही शाई पुसली जात असल्याचा मतदाराचा दावा
Panvel Municipal Corporation Election 2026: साध्या पाण्याने आणि टिश्यू पेपरने पुसल्यासही बोटाची शाई जात असल्याचा सुनील शिरीषकर या मतदाराचा दावा
Election 2026: सकाळी 11.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
- Jalgaon Municipal Corporation Election 2026: जळगावमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 13.39% मतदान
- Pimpri Chinchwad Municipal Corporation Election 2026: पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 16.03% मतदान
- Dhule Municipal Corporation Election 2026: धुळ्यामध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 14.23% मतदान
- Mumbai Municipal Corporation Election 2026: मुंबईमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.73 % मतदान
- Nanded Municipal Corporation Election 2026: नांदेडमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.14 % मतदान
- Navi Mumbai Municipal Corporation Election 2026: नवी मुंबईमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 19.68% मतदान
- Thane Municipal Corporation Election 2026: ठाण्यामध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 19% मतदान
- Amravati Municipal Corporation Election 2026: अमरावतीमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 17.01% मतदान
- Malegaon Municipal Corporation Election 2026: मालेगावमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 20.92% मतदान
- Latur Municipal Corporation Election 2026: लातूरमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 18.22% मतदान
- Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026:छत्रपती संभाजीनगरमध्ये सकाळी 11.30 वाजेपर्यंत 18.88 % मतदान
Akola Municipal Corporation Election 2026: मतदाराचा मृत्यू
Akola Municipal Corporation Election 2026: अकोल्यामध्ये मतदानासाठी गेलेल्या व्यक्तीचा मृत्यू. प्रभाग क्रमांक 18 मधील शहा बाबू हायस्कूल येथील मतदान केंद्रावर सकाळी 8 वाजता मतदानासाठी गेलेल्या गौतम भगवान गरड (वय 62) यांचा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. गौतम गरड यांचे पानपट्टीचे दुकान होते.
Election 2026 LIVE: नाशिकच्या देवळाली गावात मतदान केंद्राबाहेर गोंधळ
- नाशिकच्या देवळाली गावात मतदान केंद्राबाहेर गोंधळ
- पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप
- शिंदेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित व्यक्तीला दिला चोप
- शासकीय कर्मचारी असल्याचं भासवले जात होते
- संबंधित व्यक्तीला नाशिक पोलिसांनी घेतले ताब्यात
Election 2026 LIVE: शिवसेना शिंदे गटाचा आरोप
नाशिकमध्ये अनेक EVMमध्ये बिघाड, मत दिलं कमळालाच जात असल्याचा शिंदे गटाच्या शिवसेनेचा आरोप
- नाशिकमध्ये मतदान प्रक्रियेवर शिवसेना शिंदे गटाने घेतला आक्षेप
- अनेक केंद्रांवर ईव्हीएममध्ये बिघाड
- गोविंदनगरच्या ग्रामोदय केंद्रावर कोणालाही मत दिले की कमळ चिन्हाला जात असल्याचा शिवसेनेचा आरोप
- शिंदे गटाचे महानगरप्रमुख आणि प्रभाग 24चे उमेदवार प्रवीण तिदमे यांचा आरोप
Raj Thackeray Allegations Voting Ink Removable with Sanitizer BMC Election 2026
BMC Election 2026: पूर्ण प्रशासन हे सत्तेसाठी कामाला लागलं आहे. आम्ही आमच्या परीने जे करायचं ते करत आहोत. अशा निवडणुका लोकशाहीची लक्षणे नाहीत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली.
Election 2026 LIVE: मुंबईची जनता विकासासोबत : विनोद तावडे
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची प्रतिक्रिया
- कोणी कितीही तोडफोडीचे राजकारण केले तरी महाराष्ट्राची जनता प्रगल्भ आहे, त्यांना विकास हवाय आणि मुंबईत जनता विशेषत: विकासासोबत आहे.
- मुंबईकर भावनिकतेच्या राजकारणाला थारा देणार नाही
Municipal Corporation Election 2026 Fact Check ink applied to the finger with a marker after voting wiped off?
मतदान करताना बोटावर लावली जाणारी शाई लगेच पुसली जात असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.
BMC Election 2026 LIVE बोटावरील मार्करची खुण सहज पुसली जातेय, पाहा व्हिडीओ
BMC Election 2026 LIVE: अभिनेता सुनील शेट्टीने बजावला मतदानाचा हक्क
Election 2026:भाजपा एका मतामागे 5ते 7 हजार रुपये देत असल्याचा आरोप
Parbhani Municipal Corporation Election 2026: खासदार संजय जाधव यांनी म्हटले की, "मंत्री मेघना बोर्डीकर यांनी माय बापाच्या इमानदारीने सांगावं खरंच पैसे वाटले की नाही. जर पैसे वाटप केले तर शिवसेनेचा महापौर होईल. भाजपा एका मतामागे पाच ते सात हजार रुपये देत असल्याचाही जाधव यांचा आरोप.
Election 2026: भाजप उमेदवाराची मतदानासाठी एक तास वाढवून देण्याची मागणी
Solapur Municipal Corporation Election 2026: सोलापुरातील प्रभाग 4 मधील ईव्हीएम मशीन तासभर बंद, मतदारांची रांग वाढू लागली; भाजप उमेदवार अनंत जाधव यांनी मतदानासाठी एक तास वाढवून देण्याची केली मागणी.
Election 2026 : रवी राणा यांनी सायकलचा वापर का केला?
Amravati Municipal Corporation Election 2026 : युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख रवी राणा मतदानासाठी सायकलवरून रवाना. पर्यावरण राखण्याचा संदेश देण्यासाठी मतदान केंद्रावर सायकलने जात असल्याची दिली प्रतिक्रिया.
Election 2026 LIVE:पुण्यातील धक्कादायक प्रकार
पुणे : धायरी येथील प्रभाग क्रमांक 34 येथील शाळा नारायणराव सणस विद्यालय येथे मतदानाची शाई पुसत असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप दिला
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मारहाणीबाबत विचारणा केली
प्रभाग क्रमांक 34मध्ये अनेक महिला आणि मुले बोगस मतदान करून बोटावरील शाई लिक्विडने पुसून पुन्हा बोगस मतदान करत आहे.
यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे
Election 2026 : EVMमध्ये पुन्हा गोंधळ?
Nashik Municipal Corporation Election 2026 : नाशिकच्या प्रभाग क्रमांक 24 मध्ये धनुष्यबाणसमोरील बटण दाबल्यानंतर भाजप उमेदवाराच्या नावासमोरील लाईट लागत असल्याचा आरोप. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आरोप, निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली लेखी तक्रार. प्रभाग क्रमांक 24 मधील ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर गोंधळ.
Election 2026: सकाळी 9.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
Kolhapur Municipal Corporation Election 2026: कोल्हापूरमध्ये सकाळी 9.30 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान.
Latur Municipal Corporation Election 2026: लातूरमध्ये सकाळी 9.30 वाजेपर्यंत 7.3% मतदान
Municipal Corporation Election 2026 : मीरा-भाईंदरमध्ये सकाळी 9.30 वाजेपर्यंत 7.73% मतदान
Maharashtra Election 2026:शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली भीती
Maharashtra Election 2026: छत्रपती संभाजीनगर - मतदान केल्यानंतर मतदारांच्या बोटाला मार्कर पेनने शाई लावणे पहिल्यांदाच घडत असल्याने काही ठिकाणी बोगस मतदान होण्याची शिवसेना नेते आणि मंत्री संजय शिरसाठ यांनी व्यक्त केली भीती.
Election 2026 LIVE: नारेगाव राड्याप्रकरणी गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांची माहिती
- छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी मतदान केंद्रांना भेट दिलीय.
- कालपासून शहरातील घडामोडींवर आणि गोंधळावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितलं.
- नारेगावमध्ये काल रात्री झालेल्या राड्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिलीय.
- एका मतदान केंद्रावर 25पेक्षा अधिक मोबाइल जप्त करण्यात आल्याची माहिती देखील आयुक्तांनी दिली आहे.
Election 2026: मतदार यादीतून नाव गायब
Vasai Virar Municipal Corporation Election 2026: विरारमधल्या जुचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात मतदानाला आलेल्या मतदारांचे स्लिपवर मतदान केंद्राचं नाव मात्र मतदार यादीतून नाव गायब. अनेकांची नावे नसल्याने मतदार मतदान न करताच परत गेले. भूमिपुत्र संघटनेचा आरोप.
Election 2026: सकाळी 9.30 वाजेपर्यंतची मतदानाची टक्केवारी
Jalna Municipal Corporation Election 2026: सकाळी 9:30 वाजेपर्यंत जालन्यात 8.24% मतदान
Jalgaon Municipal Corporation Election 2026: जळगावमध्ये सकाळी 9.30 वाजेपर्यंत 5.5% मतदान
Navi Mumbai Municipal Corporation Election 2026: नवी मुंबईमध्ये सकाळी 9.30 पर्यंत 8.18% मतदान
Dhule Municipal Corporation Election 2026: ईव्हीएम मशीन बंद
Dhule Municipal Corporation Election 2026: धुळ्यातील प्रभाग क्रमांक 6 मधले ईव्हीएम मशीन बंद पडले, ईव्हीएमवरील उमेदवारांची नावे अल्फाबेटिकली लावली नसल्याने सर्वपक्षीय उमेदवारांनी नोंदवला आक्षेप.
Maharashtra Election 2026: भाजप पैसे वाटत असल्याचा शिवसेना(उबाठा) कार्यकर्त्यांचा आरोप
Maharashtra Election 2026: इचलकरंजी महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या प्रभाग पाचमध्ये भाजप पैसे वाटत असल्याचा शिवसेना(उबाठा) कार्यकर्त्यांचा आरोप. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये धक्काबुक्की
Election 2026 LIVE: शिवसेना (UBT) -मनसेचे भगवा गार्ड तैनात
- शिवसेना UBT आणि मनसे यांच्या वतीने दुबार मतदार आल्यास मतदानापासून रोखण्यासाठी भगवा गार्ड तैनात करण्यात आलाय.
- दादर बोरिवली येथेही भगवा गार्ड तैनात
- बोरिवली शांती आश्रम येथील मतदान केंद्राबाहेर भगवा गार्ड आले असता त्यांना पोलिसांनी रोखले,बाचाबाची झाली आहे.
Election 2026 LIVE: EVMबाबत राहुल शेवाळे काय म्हणाले?
राहुल शेवाळे, नेते शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांची प्रतिक्रिया:
ज्या-ज्या ठिकाणी मतदान केंद्रावर तांत्रिक अडचण येतेय,त्या-त्या ठिकाणी निवडणूक आयोगांनी सुधारणा करून नागरिकांना मतदानाचा अधिकार बजावू द्यायला हवा.
निवडणूक आयोगासोबत बैठक झाली त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की नवीन मशीन आहेत, अशा कोणत्या समस्या होणार नाहीत.
Ameet Satam | कोविड काळात मंदिरं बंद ठेवणाऱ्यांना आज मंदिरे आठवली - अमित साटम | BMC Elections 2026
BMC Election 2026 LIVE अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) अश्विनी जोशी केले मतदान
मुंबई : अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) अश्विनी जोशी यांनी चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ येथील मतदान केंद्रावर मतदान
BMC Election 2026 LIVE:... तर जागच्या जागी कार्यक्रम: सुनील राऊत
उबाठा गटाचे आमदार सुनील राऊत यांची प्रतिक्रिया
"मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला. मात्र यावेळी मराठी जनता दोन्ही ठाकरे बंधूंच्या पाठीशी उभी आहे.
आम्हाला माहिती मिळालीय की मुंबई बाहेरून मोठ्या संख्येने बोगस मतदार मतदानासाठी येणार आहे.
मात्र आमची पुलिंग एजंट हे ट्रेन आहेत. अशा पद्धतीचा प्रकार जर कुठे झाला तर त्यांचा जागच्या जागी कार्यक्रम केला जाईल."
Election 2026 LIVE:
पुणे : अभिनेता सुबोध भावेने मतदानाचा हक्क बजावला
BMC Election 2026 LIVE: खासदार अरविंद सावंत आणि पोलिसांची बाचाबाची
खासदार अरविंद सावंत आणि पोलिसांची बाचाबाची
वरळी पोलीस स्थानकाचे पोलीस आणि अरविंद सावंत यांची मध्यरात्री बाचाबाची
ठाकरेंच्या सेनेच्या पदाधिकाऱ्याला वरळी पोलीस स्थानकातून तडीपारीची नोटीस दिल्याने अरविंद सावंत आक्रमक
पदाधिकाऱ्याची चूक काय? अरविंद सावंत यांची पोलिसांना विचारणा
कायदा सुव्यवस्था तुमच्या हातात म्हणून बेबंधशाही करणार का? अरविंद सावंत यांचा सवाल
BMC Election 2026 LIVE:छत्रपती संभाजीनगर: सेंट मीरा हायस्कूल बूथवर गोधळ
छत्रपती संभाजीनगर: सेंट मीरा हायस्कूल बूथवर गोधळ
भाजप कार्यकर्ते आणि इतर उमेदवारामध्ये राडा
बुथवर बसवण्यात आलेल्या मुलांना कोडवर्ड सांगणारे टीशर्ट घातल्यावरून आक्षेप
Election 2026 LIVE: पुण्यात भाजप उमेदवार निवेदिता एकबोटे यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न
BMC Election 2026 LIVE: मुंबईतील सर्वाधिक मतदान टक्केवारी असलेले टॉप 10 वॉर्ड (सकाळी 7.30 ते सकाळी 9.30 वाजेपर्यंतची टक्केवारी)
वॉर्ड 18 : 11.57%
वॉर्ड 29 : 10.63%
वॉर्ड 9 : 10.5%
वॉर्ड 105: 10.49%
वॉर्ड 84 : 10.34%
वॉर्ड 11 : 10.14%
वॉर्ड 25 : 10.03%
वॉर्ड 5 : 9.92%
वॉर्ड 19 : 9.91%
वॉर्ड 30 : 9.82%
Vasai Virar Municipal Corporation Election 2026: हितेंद्र ठाकूर मोठा आरोप
Vasai Virar Municipal Corporation Election 2026: एका घरातील मतदारांची नावे तीन वेगवेगळ्या केंद्रावर, घराच्या बाजूला दोन मतदान केंद्रं असूनही भलत्याच ठिकाणी करावे लागले मतदान, बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांचा आरोप. ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदान कमी होणार असल्याचीही वर्तवली ठाकूर यांनी भीती.
मनसेचे माजी आमदार राजू पाटील भाजप-शिवसेना नेत्यांवर टीका
Kalyan-Dombivli Municipal Corporation Election 2026: सांस्कृतिक नगरी डोंबिवलीचे नाव या लोकांनी खराब करून टाकले! इथल्या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे!! मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची भाजप आणि शिवसेना नेत्यांवर टीका.
Election 2026 LIVE: मतदानाची टक्केवारी
- मुंबईत सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.98 टक्के मतदान
- पुण्यात 9 वाजेपर्यंत 5.50 टक्के मतदान
- सांगलीमध्ये 9.30 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान
Election 2026 LIVE: भाजपने एका मतामागे 5 हजार रुपये वाटल्याचा आरोप
Pune Municipal Corporation Election 2026: भाजपने एका मतामागे 5 हजार रुपये वाटल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आमदार रोहीत पवार यांचा आरोप
BMC Election 2026 LIVE: उमेदवाराच्या नवऱ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न
Kolhapur Municipal Corporation Election 2026: राजकीय प्रतिस्पर्ध्यांनी कोल्हापुरात उमेदवाराच्या नवऱ्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला, काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा आरोप
प्रकाश आंबेडकर यांनी बजावला मतदानाचा अधिकार
Akola Municipal Corporation Election 2026: वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महानगरपालिका शाळा क्रमांक 22 मध्ये बजावला मतदानाचा अधिकार
Sangli Election 2026: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले मतदान
Sangli Election 2026: शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केले मतदान. मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयात केले मतदान
ठाण्यात बोगस मतदानाचा संशय
Thane Municipal Corporation Election 2026: ठाण्यात बोगस मतदानाचा संशय, दुर्गादास शेट्टी यांचे कोणीतरी भलत्यानेच केल्याचे आले निदर्शनास. नियमानुसार बॅलेट पेपरवर शेट्टी यांचे करून घेतले मतदान.
Election 2026 LIVE: सांगलीमध्ये 9.30 वाजेपर्यंत 6.45 टक्के मतदान
Sangli Municipal Corporation Election 2026: सांगलीमध्ये सकाळी 9.30 वाजेपर्यंत 6.45% मतदान
Election 2026 LIVE: मृत खासदाराचे नाव मतदार यादी
छत्रपती संभाजीनगर: माजी शिवसेना नेते आणि दोन वेळा खासदार राहिलेले मोरेश्वर सावे यांचे 2015 मध्ये निधन झाले असतानाही त्यांचे नाव अद्याप मतदार यादीत असल्याचे उघड झाले आहे. या गंभीर त्रुटीमुळे निवडणूक प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Election 2026: इम्तियाज जलील यांचा मोठा दावा
BMC Election 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये आज देखील राडा होईल, राडा कोण करणार आहे, त्यांची नावं पोलीस आयुक्तांना दिली आहेत. संध्याकाळी याच लोकांनी राडा केल्याचं समोर येईल: इम्तियाज जलील यांचा मोठा दावा
Election 2026: मुंबईवर महायुतीचा भगवा फडकेल: दादा भुसे
BMC Election 2026: मुंबईवर महायुतीचा भगवा फडकेल, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला विश्वास. मालेगावात शिवसेना 84 पैकी 24 जागा लढवत असून सर्व जागांवर शिवसेना विजयी होईल असे दादा भुसे यांनी म्हटले.
Election 2026 LIVE: लोक आम्हाला मतदान करतील: सचिन अहिर
आज लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचे काम लोक करणार आहे. ही निवडणूक विकासाच्या मुद्यावर ते लढू शकले नाहीत. हिंदू मुस्लीम केले. याला प्रतिउत्तर म्हणून आज आदित्य ठाकरे यांनी प्रेझेंटेशन केले.
आम्ही चांगले प्रचार केले आहेत. आम्हाला लोक मतदान करतील: सचिन अहिर
Election 2026 LIVE: मेघना बोर्डीकर यांची प्रतिक्रिया
Meghana Bordikar Parbhani Election 2026: परभणीत भाजपचा स्ट्राइक रेट 70 ते 80 टक्के राहील असे राज्यमंत्री आणि भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी म्हटले. निकाल लागल्यानंतर कोणाला सोबत घ्यायचं याचा विचार करू, असे मेघना बोर्डीकर यांनी म्हटले.
Election 2026 LIVE: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा दावा
मुंबईत दुसरा कोणताही ब्रँड चालणार नाही तर देवेंद्र फडणवीस यांचं नेतृत्व आणि नियोजनाचा परिणाम दिसून येईल, असा दावा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केलाय.
Election 2026 LIVE: ईव्हीएम एक तासापासून बंद
Ulhasnagar EVM Machine Problem: उल्हासनगर कॅम्प 5 मधील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील ईव्हीएम मशीन एक तासापासून बंद
Election 2026 LIVE: बंद पडलेल्या EVM बाबत मोठी अपडेट
पुणे : बंद पडलेले EVM मशीन बदलण्यात आले
निवडणूक आयोगाचे इंजिनिअर बंद पडलेले ईव्हीएम मशीन बदलण्यासाठी प्रभाग क्रमांक २६ मध्ये दाखल
बंद पडलेले ईव्हीएम मशीन घेऊन गेले
Panvel Prashant Thakur Voting: भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहकुटुंब केले मतदान
भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनी सहकुटुंब केले मतदान
Election 2026 LIVE:
सेंट मेरी या शाळेमध्येच वनमंत्री गणेश नाईक यांच्या कुटुंबांचे मतदार यादीत नाव आहे,नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांचे स्पष्टीकरण
Election 2026 LIVE:
अकोल्यातील सीताबाई महाविद्यालयात पिंक मतदान केंद्रावरील EVM 10 मिनिटे बंद
Election 2026 LIVE: ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बजावला मतदानाचा हक्क
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क
आई, पत्नी आणि मुलीसह शहरातील भगवान विद्यालयाच्या मतदान केंद्रावर मतदान करत बजावला हक्क
अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया
- सर्वात अगोदर मी मतदान केले, आमचे मतदान निष्ठेचे आणि संघर्षाचे आहे
- राडा झाला त्यामुळे रात्रभर झोपलो नाही, 100 उमेदवारांचे फोन आले की कशा पद्धतीने भाजपा पैसे वाटतंय.
- पैशाचा माज उन्मती एकट्या भाजपाला आहे
- कामाच्या जोरावर नाही तर पैशावर मतदान भाजपा करतंय
- आम्हाला मंडप काढायला सांगितले, पण त्यांचे तसेच आहेत
- निवडणूक आयोग कुंभकर्णाच्या झोपेत आहे
- विकासाचा खोटा फुगा उभा केला जातोय, परिस्थिती वेगळी
- छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतही भगवा गार्ड तयार करण्यात आलंय
- काल आमच्या भगवा गार्ड पथकाने अनेक पैसे वाटणारे लोक पकडले आहेत
Election 2026 LIVE:
BMC Election 2026 LIVE: कल्याण ग्रामीणचे शिवसेना आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवलीतील मोठा गाव महापालिकेच्या शाळेत लोकमान्य टिळक प्राथमिक विद्यालय मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं
Election 2026 LIVE: ठाण्यातील सरस्वती शाळामध्ये EVM एक तासापासून बंद
MC Election 2026 LIVE: ठाण्यातील सरस्वती शाळामध्ये EVM एक तासापासून बंद होतं.
मनसे नेते अविनाश जाधव यांनी म्हटलं की, जर अशा प्रकारे मशीन बंद पडत असेल तर यांचा फटका मतदार राजाला बसणार आणि मतदानाचा टक्का ठाण्यात 50 ते 55 टक्के इतकाच होणार, नौपाडा विभागातील अनेक लोक म
Election 2026 LIVE: चंद्रकात पाटील यांनी बजावला मतदानाचा हक्क
कोथरूडमधील एकलव्य महाविद्यालयात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात पाटील यांनी मतदान केले.
चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया
- वर्ष 2014मध्ये मोदीजी पंतप्रधान होईपर्यंत आरोप प्रत्यारोप यांचा प्रभाव पडायचा पण आता तो पडत नाही
- आरोप प्रत्यारोप बुडबुडे आहेत
- मोदीजी यांचे चिन्ह कमळ बदलून मोदीजी यांचा चेहरा ठेवा, असं मला एका आजीने सांगितलं.
- गणेश बिडकर आणि इतर सहकारी 24मध्ये मोठ्या मार्जिनने जिंकतील
- 115 जागांना तर आमच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही
- 115 जागांवर तुम्ही पैजा लावायला हरकत नाही
- मुंबई पुण्यासह सहा महापालिकांमध्ये आमचा विजय आहे
Election 2026 LIVE:
नागपूर : काँग्रेसचे कार्यालय जाळले, भाजप कार्यकर्त्यांवर आरोप
प्रभाग 31मधील काँग्रेस उमेदवार शिवानी चौधरी यांचे कार्यालय जाळण्यात आले
Election 2026 LIVE: मतदारांचा खोळंबा
BMC Election 2026 LIVE: ठाण्यातील पाचपाखडी भागातील सरस्वती शाळेतील मतदान केंद्र 41मध्ये मशीन बंद पडली असून एक तासापासून मतदान बंद आहे,मतदारांचा खोळंबा
Election 2026 LIVE: मुलुंड: माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सहकुटुंब मतदान केले

Election 2026 LIVE: केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले मतदान
VIDEO | Maharashtra Civic Polls 2026: Minister of State Murlidhar Mohol casts his vote for Pune Municipal Corporation elections. He says, "Voting is underway for local bodies and municipal corporation in Pune. I came here alongwith my family and used by right to vote. I believe… pic.twitter.com/Z6EBOePKTs
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
Election 2026 LIVE:बीएमसी निवडणुकीबाबत माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांची प्रतिक्रिया VIDEO
VIDEO | Mumbai: On the BMC polls, former Union Minister Ram Naik says, “This municipal election was long overdue. People are enthusiastic, but actual voter turnout remains to be seen. I have always campaigned and voted early at my polling station... As for trends, the BJP and its… pic.twitter.com/dV8wUiGoDW
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
Election 2026 LIVE: केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी बजावला मतदानाचा हक्क
VIDEO | Mumbai: Union Minister Piyush Goyal leaves after casting his vote in the BMC polls at a polling booth.#BMCpolls #Mumbai #PiyushGoyal
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
(Full VIDEO available on https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/HM1BzJqQHq
Election 2026 LIVE: सचिन तेंडुलकर मतदानासाठी सहकुटुंब मतदान केंद्रावर दाखल
#WATCH | Mumbai: Legendary cricketer Sachin Tendulkar shows his inked finger after casting his vote for the BMC elections.
— ANI (@ANI) January 15, 2026
He says, "This is a very important election. It gives us a chance where we can express our opinion through votes. Everyone should come out and cast their… https://t.co/a3GAx722A7 pic.twitter.com/dweQFzV796
Election 2026 LIVE: पुण्यात 5 मतदान केंद्रांवर मशीन बंद
पुण्यात अनेक ठिकाणी EVM मशीन बंद पडल्या
एकूण पाच मतदान केंद्रांवर EVM मशीन बंद
प्रभाग क्रमांक 24,25 ,26 आणि 33 मध्ये मतदारांचा खोळंबा
मतदानाला एक तास होणार उशीर
Election 2026 LIVE: छत्रपती संभाजीनगर: गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ
छत्रपती संभाजीनगर: गुजराती कन्या विद्यालयामध्ये गोंधळ
मशीन बंद पडल्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ
तब्बल 1 तास ईव्हीएम मशीन बंद असल्याने नागरिकांचा गोंधळ
मशीनमध्ये बिघाड झाला आणि त्यानंतर मशीन दुरुस्त करण्यास जवळपास एक तास विलंब झाला
Election 2026 LIVE: पुण्यात EVMचा गोंधळ
पुण्यात दोन मतदान केंद्रावर मशीन बंद
प्रभाग 26 अभ्यासिका वसंत दादा मतदान केंद्र मशीन बंद असल्यामुळे मतदान प्रक्रिया बंद
Election 2026 LIVE: पुणे : रवींद्र धंगेकर सहपरिवार बजावला मतदानाचा हक्क
मुलगा प्रणव धंगेकर आणि पत्नी प्रतिभा धंगेकर यांच्यासोबत रवींद्र धंगेकर यांनी केलं मतदान
रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी आणि मुलगा दोघेही निवडणुकीच्या रिंगणात
शिवसेनेकडून रवींद्र धंगेकर यांची पत्नी आणि मुलगा लढवत आहेत निवडणूक
Election 2026 LIVE: मशीनमधून शॉक लागत असल्याची माहिती
ठाणे: प्रभाग क्रमांक 3 मध्ये सेंट झेवियर्स शाळेत रूम नंबर 10 आणि 12 या ठिकाणी मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता.
मशीनमधून शॉक लागत असल्याची माहिती
हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी सुमारे अर्धा तासाचा कालावधी गेला.
BMC Election 2026 LIVE: किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया
दुबार मतदारांचा घोळ आधीच घालून ठेवलाय. पाडु नावाचं मशीन आणलंय, मुंबईकर प्रतिकूल पारिस्थितीत मतदान करतायेत: किशोरी पेडणेकर
Pune PMC Election 2026 EVM Fault in Pune Nashik Jalgaon NCP Leader Ankush kakde raised Issue
Municiple Corporation Election News: ईव्हीएम मशीनमध्ये दाखवत असलेली वेळ ही सात वाजून 44 मिनिट म्हणजे 14 मिनिट जास्त दाखवत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
BMC Election 2026 LIVE: लालबाग परिसरामध्ये मशीन बंद
लालबाग परिसरामध्ये 8 वाजेपर्यंत EVM मशीन बंद होत्या.
त्यामुळे या परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं
मतदारांमध्ये देखील संतप्त प्रतिक्रिया दिसून आली
BMC Election 2026 LIVE: मतदारांचे नाव यादीत नाही?
मुंबई : जमनाबाई मतदान केंद्रातून मतदार मतदान न करताच माघारी
अनेकांचे नाव मतदार यादीत सापडत नाहीय
मतदार काही मिनिटे थांबून माघारी निघाले
Election 2026 LIVE: पुण्यात ईव्हीएम मशीन बंद
सेंट हिल्डज स्कूल गुरुवार पेठ अजून मतदान सुरू नाही
मशीन बदलून देण्याची प्रक्रिया सुरू
मतदानाच्या पहिल्या तासात मतदारांचा खोळंबा
BMC Election 2026 LIVE: अमित साटम यांचे टीकास्त्र
अमित साटम यांची प्रतिक्रिया
- सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेऊन एक सुरक्षित आणि सुशिक्षित मुंबई होण्यासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली
- मराठी माणसाचं अस्तित्व नाही, पालिकेत सत्तेसाठी धडपड दिसत आहे.
- मराठी माणसाचा विकास कोणी केला हे सर्वाना माहिती आहे.
- मुंबा देवीचे दर्शन घेण्याचा अधिकार सर्वाना आहे.
- कोरोनात मंदिर बंद केली, आज देव आठवतोय.
- आजचा दिवस मुंबईच्या दृष्टिकोनातून ऐतिहासिक दिवस आहे.
- मुंबई पालिका भ्रष्टाचार मुक्त होण्यासाठी बाप्पाकडे प्रार्थना केली.
Election 2026 LIVE: माजी मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला
#WATCH | Pune, Maharashtra: Former Union Minister and senior BJP leader Prakash Javdekar says, "Today, there are municipal elections in Maharashtra, and I cast my vote during my morning walk. This is the primary duty of every citizen, and therefore, everyone should come and vote… https://t.co/cfaTAAizzR pic.twitter.com/FLyNfPvSkw
— ANI (@ANI) January 15, 2026
Election 2026 LIVE: मतदाराची प्रतिक्रिया
#WATCH | Maharashtra: After casting her vote, a Mumbaikar says, "We should all come out and cast our votes for the future of Maharashtra. I came here along with my family to cast our votes at 7:30 AM." https://t.co/hzytqBJkFQ pic.twitter.com/E9ZibZC8Th
— ANI (@ANI) January 15, 2026
#WATCH | Maharashtra: Members of a family show their inked fingers after casting their votes at a polling station in Mumbai for the BMC elections. pic.twitter.com/OEZz4rjsY6
— ANI (@ANI) January 15, 2026
BMC Election 2026 LIVE: 83 वर्षांच्या आजी मतदानासाठी दाखल
#WATCH | Maharashtra: An 83-year-old woman arrived at the polling station in Mumbai to cast her vote in the BMC elections. pic.twitter.com/QiXz3Gvqnu
— ANI (@ANI) January 15, 2026
BMC Election 2026 LIVE: अभिनेता अक्षय कुमारचे मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन
VIDEO | Mumbai: On BMC polls, actor Akshay Kumar says, “Today is the BMC election and, as Mumbaikars, this is the day when we have the remote control. Therefore, all the people of Mumbai must come out and vote, rather than complaining later about things not being in good shape.… pic.twitter.com/CibMsSkTsC
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
Election 2026 LIVE: सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदान केले
VIDEO | Nagpur: After casting his vote in the NMC polls, RSS Chief Mohan Bhagwat says, “In a democratic setup, voting is needed to elect the government, and hence it is the duty of every citizen. With balanced opinion and consideration for people’s welfare, it is our duty to vote… pic.twitter.com/XyOBYlr6bk
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
BMC Election 2026 LIVE: ठाकरेंना धडा शिकवण्याची संधी: आशिष शेलार
VIDEO | BMC Polls 2026: Maharashtra Minister Ashish Shellar casts his vote, says, "It is a very important election for municipal corporation, for development of Mumbai city, for the budget of over Rs 40,000 crore. We have to make our Mumbai a developed Mumbai. I appeal the… pic.twitter.com/EfstgjgLzj
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
BMC Election 2026 LIVE: महायुतीचा विजय नक्की होईल: शायना एनसी
VIDEO | Mumbai: After casting her vote in the BMC polls, Shiv Sena leader Shaina NC says, “With the blessings of Maa Mumbadevi, Ganpati Bappa, and the strong on-ground work of Eknath Shinde, we are confident of Mahayuti’s victory. People are troubled by issues like the… pic.twitter.com/RbyDdkuU9p
— Press Trust of India (@PTI_News) January 15, 2026
Election 2026 LIVE: मतदारांचा खोळंबा
- विरार पूर्व येथील प्रभाग क्रमांक 1 मधील शिरगाव 21 क्रमांकाच्या केंद्रावर मतदान यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड
- सकाळचे 8 वाजून गेले तरी अद्याप मतदान प्रक्रिया सुरू नाही
- शिरगाव येथील अंगणवाडी केंद्रामधील मतदान केंद्रात तांत्रिक बिघाड
- मतदारांचा खोळंबा
Forest Minister Ganesh Naik's name not found in voter list in Navi Mumbai Municipal Corporation 2026 Election
वनमंत्र्यांबाबत असा गोंधळ होत असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Election 2026 LIVE: EVMमध्ये बिघाड
अमरावती शहरातील गर्ल्स हायस्कूल मतदान केंद्र 23 येथील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड
Election 2026 LIVE:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 32 प्रभागांमधील 128 जागांसाठी मतदान
शहरातील एकूण 17 लाख 13 हजार 891 मतदार हक्क बजावणार
Election 2026 LIVE:
धुळे : तृतीयपंथी उमेदवार पार्वती जोगींनी मतदानाचा हक्क बजावला
Election 2026 LIVE:जळगाव : EVM मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप
- जळगाव शहरात मतदान सुरू होण्यापूर्वी एका मतदान केंद्रावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
- महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 15 येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला.
- ईव्हीएम मशीनचा मांडणीचा क्रम नियमांनुसार नसल्याने तो तत्काळ दुरुस्त करण्याची मागणी उमेदवार प्रतिनिधींनी केली.
- यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवार प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला.
- काही वेळाने निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएम मशीनचा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला.
- दरम्यान, मशीनचा क्रम तसेच पोलिंग एजंटला बसण्याची योग्य व्यवस्था नसल्याबाबतही उमेदवार प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली.
Election 2026 LIVE: वनमंत्री गणेश नाईक आणि कुटुंबीयांचे नाव यादीत नाही
BMC Election 2026 LIVE: वनमंत्री गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांचं नाव मतदार यादीत नसल्याने गोंधळ, मतदान केंद्र सापडेना
Election 2026 LIVE: सोलापुरात EVMमध्ये बिघाड
सोलापुरातील ITI महाविद्यालय मतदान केंद्रात मतदान प्रक्रिया अद्याप सुरूच नाही
EVM मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मागील अर्धा तासापासून मतदान नाही
अद्याप या केंद्रावर एकही मतदान झालेले नाही
निवडणूक कर्मचाऱ्याकडून मशीन दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न सुरू
Election 2026 LIVE: जिजामाता शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान मशीन बंद
जालन्यात मतदान मशीन बंद पडल्याने प्रभाग क्रमांक 10 मधील मतदानाला 15 मिनिट उशीराने सुरुवात
Election 2026 LIVE:
डोंबिवली: भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मतदान केंद्रावर सहकुटुंब मतदान केलं
Election 2026 LIVE: कडेकोट पोलीस बंदोबस्त
मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी 83 जागांसाठी 301 उमेदवार रिंगणात
Election 2026 LIVE:
परभणी : परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकसाठी मतदानाला सुरुवात
सकाळी 7.30 वाजेपासून मतदानाला सुरुवात
16 प्रभागातील 65 जागांसाठी होतंय मतदान
149 इमारतीमध्ये 341 मतदान केंद्र उभारण्यात आले आहेत
मतदान प्रक्रियेसाठी कर्मचाऱ्यांसह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
अधिकाऱ्यांसह 2000 पोलिसांचा बंदोबस्त निवडणुकीसाठी तैनात
Election 2026 LIVE: उमेदवार राजेंद्र दानवे मतदान केंद्रावर भडकले
छत्रपती संभाजीनगर : माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे बंधू तथा उमेदवार राजेंद्र दानवे मतदान केंद्रावर भडकल्याचे पाहायला मिळालं.
आमच्या लोकांना मंडप लावू दिला जात नाही. मात्र भाजपच्या लोकांना मंडप लावू दिला जातोय, मागील निवडणुकी वेळेसही मंडप हटवला होता.मात्र भाजपच्या नेत्यांच्या सांगण्यावरून त्यांचा मंडप ठेवला जातो:उमेदवार राजेंद्र दानवे
Election 2026 LIVE: ईव्हीएममध्ये बिघाड
छत्रपती संभाजीनगर : प्रभाग क्रमांक 3 येथे EVMमध्ये बिघाड झाल्याची माहिती
Election 2026 LIVE:
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुका, मतदान प्रक्रियेला सुरुवात
Election 2026 LIVE: पुण्यात कडेकोट बंदोबस्त
पुणे : तब्बल 4 हजार 11 मतदान केंद्रांवर आज 35 लाखांहून अधिक पुणेकर करणार मतदान
थोड्याच वेळात मतदानाला होणार सुरुवात
3 हजार 500 हून अधिक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
पोलिसांकडून EVM मशीन देखील आली तपासण्यात
Election 2026 LIVE:
- जालना महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे
- जालन्यात 291मतदान केंद्रावर सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे.
- महानगरपालिका निवडणुकीत जालन्यात 2 लाख 45 हजार 929 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील
- 65 नगरसेवक पदासाठी एकूण 454 उमेदवार रिंगणात आहेत.
Election 2026 LIVE: पुणे: टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कूलमधील मतदान केंद्रावरील तयारी
#WATCH | Pune, Maharashtra: Preparations and mock poll underway at a polling booth in New English School on Tilak Road.
— ANI (@ANI) January 15, 2026
Voting will begin from 7.30 am in 29 different Municipal Corporations across Maharashtra today. pic.twitter.com/1Hnk4wrhRS
Election 2026 LIVE:
नागपूर :महानगरपालिका निवडणुकीसाठी नूतन भारत विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर मतदानासाठी सजावट करण्यात आली.

Election 2026 LIVE: पुण्यात चौरंगी लढत
पुणे: तब्बल 9 वर्षांनंतर महापालिका निवडणुकीसाठी आज मतदान
- पुणे शहरात 41 प्रभागातून 165 नगरसेवक येणार निवडून
- पुण्यात चौरंगी लढत
- भाजपला दोन्ही राष्ट्रवादीचे आव्हान तर शिवसेना आणि काँग्रेस, उबाठा, मनसे देखील निवडणुकीच्या रिंगणात
- एकूण निवडणूक लढवणारे उमेदवार: 1153
- पुणे शहरातील एकूण मतदार: 35 लाख 52 हजार 637
- पुरुष मतदार: 18 लाख 32 हजार 789
- महिला मतदार: 17 लाख 13 हजार 360
- शहरातील एकूण मतदार केंद्र: 4011
- इतर मतदार: 488
- बिनविरोध निवडून येणाऱ्या उमेदवारांची संख्या: 2
Election 2026 LIVE: ठाण्यात सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला होणार सुरुवात
- ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेला सकाळी 7 वाजेपासून सुरुवात होणार आहे.
- ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनिट माध्यमातून मतदान होणार आहे.
- मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात.
BMC Election Voting 2026 aqua line to help mumbaikars on 15 January Metro Line 3 Will Run till Midnight
मतदानासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांसाठी मेट्रो प्रशासनाने आरे - कफ परेड रोड भुयारी मेट्रो 3 सेवा मध्यरात्रीपर्यंत वाढवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Election 2026 LIVE
16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीस संबंधीत ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरुवात होईल.
BMC Election 2026: Public Holiday Declared on January 15; Banks, Private Offices, and Schools to Remain Closed for Voting
BMC Election 2026 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. याबाबत सरकारनं एक महत्त्वाचा आदेश जारी केलाय.
BMC Elections 2026: मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या पोस्टने वेधले लक्ष
या वेळी फक्त ठाकरेच ! pic.twitter.com/NNxYcRNX6g
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 15, 2026
Elections 2026: मतमोजणी कधी होणार?
16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणीस संबंधीत ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरवात होईल.
Elections 2026: पोलीस बंदोबस्त
महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा पोलीस बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 3 अपर पोलीस अधीक्षक, 63 पोलीस उप अधीक्षक, 56 पोलीस निरीक्षक, 858 सहायक पोलीस निरीक्षक / पोलीस उपनिरीक्षक आणि 11 हजार 938 पोलीस अंमलदारांचा समावेश आहे. त्याचबरोबर एकूण 42 हजार 703 होमगार्ड देखील तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेच्या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या एकूण 57 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत.
BMC Elections 2026: किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे 227 प्रभाग असून यांसह सर्व महानगरपालिका मिळून 893 प्रभाग आहेत. त्यात एकूण 2 हजार 869 जागांचा समावेश आहे. त्यासाठी एकूण 15 हजार 908 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
Elections 2026
बृहन्मुंबई वगळता अन्य सर्व 28 महानगरपालिकांच्या निवडणुका बहुसदस्यीय पद्धतीने होत आहेत.
Elections 2026: इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची व्यवस्था
महानगरपालिका निवडणुकांसाठी पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (EVN) व्यवस्था करण्यात आलीय. त्यात 43 हजार 958 कंट्रोल युनिट आणि 87 हजार 916 बॅलेट युनिटची उपलब्धता केलीय. बृहन्मुंबई महानगरपालिकेसाठी 11 हजार 349 कंट्रोल युनिट आणि 22 हजार 698 बॅलेट युनिटची व्यवस्था केलीय.
KDMC Election 2026: How to Find Your Name in Voter List Online? Scan QR Code and Get Polling Booth Details Instantly
KDMC voter list: कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन आणि पोलीस यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली आहे.
Elections 2026
एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 81 लाख 94 हजार 292 पुरुष, 1 कोटी 66 लाख 80 हजार 449 महिला; तर 4 हजार 596 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठीच्या एकूण 39 हजार 92 मतदान केंद्रांपैकी एकूण 3 हजार 196 संवेदनशील मतदान केंद्र घोषित करण्यात आली आहेत.
Elections 2026
मतदान सकाळी 7.30 वाजेपासून ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
Maharashtra Civic Body Polls 2026 LIVE
बृहन्मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई, वसई- विरार, कोल्हापूर, कल्याण- डोंबिवली, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, लातूर, परभणी, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर, नांदेड- वाघाळा, सांगली- मीरज, कुपवाड, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, इचलकरंजी आणि जालना महानगरपालिकेसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे.
Election LIVE Updates
निवडणूक रिंगणात एकूण 15 हजार 908 इतके उमेदवार आहेत; तसेच पुरेशा पोलीस बंदोबस्ताची देखील व्यवस्था करण्यात आलीय.
Election 2026 Live News Updates
एकूण 2 हजार 869 जागांसाठी महानगरपालिकेच्या निवडणूक होत आहेत, एकूण 3 कोटी 48 लाख 79 हजार 337 मतदारांसाठी एकूण 39 हजार 92 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.