जाहिरात

Sundar Pichai Salary : दिवसाला 5.8 कोटी, 11 आकडी पगार; गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना सर्वात मोठी पगारवाढ 

या जबरदस्त पगारवाढीमुळे सुंदर पिचाई जगातील सर्वाधिक पगार असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक बनले आहेत.

Sundar Pichai Salary : दिवसाला 5.8 कोटी, 11 आकडी पगार; गुगलचे CEO सुंदर पिचाई यांना सर्वात मोठी पगारवाढ 
  • गूगल ने अपने सीईओ सुंदर पिचाई का कुल वेतन अगले तीन वर्षों में 692 मिलियन डॉलर तक बढ़ाया है
  • पिचाई को तीन वर्षों में मासिक आधार पर 84 मिलियन डॉलर के प्रतिबंधित स्टॉक और 2 मिलियन डॉलर वार्षिक वेतन मिलेगा
  • गूगल ने पिचाई को वेमो और विंग एविएशन के स्टॉक भी दिए हैं, जिनकी कुल कीमत 175 मिलियन डॉलर के आसपास है
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Google CEO Sundar Pichai Salary Hiked  : अल्फाबेटची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या गुगलने त्यांचे सीईओ सुंदर पिचाई यांचे एकूण वेतन पुढील तीन वर्षांत $692 मिलियन डॉलर (रु.63,61,79,82,000) पर्यंत (जवळपास 6300 कोटी) वाढवले ​​आहे. याचा अर्थ त्यांचा महिन्याचा पगार 175 कोटी इतका असेल आणि दिवसाला 5.8 कोटी इतका पगार मिळेल. ज्यामुळे ते जगातील सर्वाधिक पगार असलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक बनले आहेत, असे फायनान्शियल टाईम्सने शनिवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटलं आहे.


संपूर्ण सॅलरी पॅकेज कसं असेल?

  • प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, पॅकेजचा मोठा भाग १२६ मिलियन डॉलर किमतीच्या परफॉर्मन्स स्टॉक युनिट्स (PSUs) मधून येतो. जे दोन टप्प्यात समसमान वाटप केले जातील. हे PSUs S&P १०० च्या तुलनेत अल्फाबेटच्या एकूण शेअरहोल्डर रिटर्नशी जोडलेले आहेत. जर परफॉर्मन्स टार्गेट्स पूर्ण झाले तर ते दुप्पट होऊन $२५२ मिलियन डॉलरपर्यंत पोहोचू शकतं, जर टार्गेट्स पूर्ण झालं नाही तर काहीही मिळणार नाही. 
  • याशिवाय पिचाई यांना तीन वर्षात मासिक पगारात ८४ मिलियन डॉलरचे प्रतिबंधित स्टॉक्स मिळतील. सोबतच २ मिलियन डॉलरचं वार्षिक वेतनही मिळेल. टेक्नॉलॉजी क्षेत्रातील या दिग्गज कंपनीने आपल्या ऑटोनोमस वेंचर्सच्या विकासाशी संबंधित ३५० मिलियन डॉलरपर्यंत नवे स्टॉक इंन्सेटिव्ह सादर केले आहेत. 
  • गुगलचे सीईओ यांना वेमोसाठी १३० मिलियन डॉलरचे स्टॉक आणि विंग एव्हिएशनचे ४५ मिलियन डॉलरचे शेअर मिळतील.

अल्फाबेटच्या बोर्डाने सांगितलं, या नव्या पगारातून  पिचाई यांच्यावरील कंपनीचा विश्वास दिसून येतो. ऑगस्ट २०१५ मध्ये पिचाई सीईओ झाल्यानंतर गुगलच्या बाजार भांडवलीकरणात साधारण सात पटीने वाढ झाली. गुगल ५३५ बिलियन डॉलरने वाढून ३.६ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचला. जानेवारी महिन्यात हा काही काळासाठी ४ ट्रिलियन डॉलरपर्यंतही पोहोचला होता. भारतीय वंशाचे ५३ वर्षीय पिचाई यांनी २००४ पासून गुगलशी जोडले गेले. त्यांनी क्रोम विकसित केलं आणि अँड्रॉइडचं नेतृत्व केल्यानंतर वरिष्ठ पदावर पोहोचले. 

नक्की वाचा - DA Hike 2026 : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता होळीलाच, थकबाकी आणि वाढीव भत्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पिचाई विरुद्ध नडेला विरुद्ध टीम कुक यांची सॅलरी...

या आठवड्याच्या सुरुवातील पिचाई यांनी साधारण ९.८ मिनियन डॉलरचे ३२,५०० क्लास सीचे शेअर विकले. पिचाई आणि त्यांच्या पत्नीजवळ १.६७ मिलियन गुगल शेअर आहेत. ज्याचं मूल्य शुक्रवारी बंद भाव २९८ डॉलर प्रति शेअरनुसार, ४९८ मिलियन डॉलर आहे. पिचाईंच्या तुलनेत मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी वित्त वर्ष २०२५ मध्ये ९६.५ मिलियन डॉलर कमावले. तर अॅप्पलच्या टिक कुकने ७४.३ मिलियन डॉलर कमावले. 

  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com