इस्रायल आणि हमास यांच्यातला संघर्ष जगाला नवा नाही. मात्र या संघर्षा दरम्यान अनेक जणांना बंधक केलं जातं. एकमेकांचे असे अनेक बंधक या दोन्ही देशांकडे आहेत. त्यात आता युद्धबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्याच वेळी हमासने एक व्हिडीओ समोर आणला आहे. या व्हिडीओत एक इस्रायली मुलगी दिसत आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये या मुलीला बंधी बनवण्यात आलं होतं. ती पेशाने इस्रायलची सैनिक आहे. लिरी अल्बाग असं तिचं नाव असून ती अवघ्या 19 वर्षाची आहे. तिचा व्हिडीओ समोर आल्याने तिचे कुटुंबीय भावूक झाले आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हमासने हा व्हिडीओ प्रदर्शित केला आहे. जवळपास साडे तिन मिनिटांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत लिरी अल्बाग ही सैनिक हिब्रू भाषेत बोलताना दिसत आहे. ती या व्हिडीओत आपल्या सरकारला आपल्याला वाचवायला सांगत आहे. आपल्याला इथून सुखरूप सोडवा अशी याचना करताना ती दिसत आहे. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी हा व्हिडीओ सार्वजनिक करू नये अशी मागणी सरकारकडे केली आहे.
लिरी अल्बागचे कुटुंबीय आता तिला वाचवण्यासाठी पुढे आले आहेत. त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना आवाहन केलं आहे. की आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. जे बंधक बनवण्यात आले आहेत त्यांच्या बरोबर मुलां सारखी वागणूक देणं गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अल्बाग ही 18 वर्षाची असताना तिचे हमासच्या दहशतवाद्यांनी अपहरण केले होते. तिच्या बरोबर अन्य सहा महिलांचेही अपहरण करण्यात आले होते. ज्या लोकांचे अपहरण केले होते त्या पैकी बऱ्याच जणांचे व्हिडीओ हमासने समोर आणले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - Ajit Pawar: 'माझीच मला लाज वाटते' अजित पवार असं का म्हणाले?
2023 मध्ये दहशतवाद्यांनी जवळपास 251 जणांना बंधक केलं होतं. त्यातले 96 जण हे आजही गाजामध्ये आहेत. त्यातल्या 34 जणांची हत्या केली असल्याचे इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध विराम व्हावा यासाठी कतार मध्यस्थी करत आहे. मात्र त्याला अजूनही मुर्त रूप आलेले नाही. त्यात ज्या इस्रायली सैनिकांना बंधक बनवले गेले आहे त्यांच्या सुटकेसाठी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर दबाव वाढवण्यात आला आहे. त्यात जे बंधक आहेत त्यांना पुन्हा देशात आणण्यासाठी आपण प्रयत्न करत असल्याचे नेतन्याहू यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world