
पाकिस्तान मागील गेल्या काही वर्षांपासून मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था देखील डबघाईला आली आहे. नागरिकांना मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र आता पाकिस्तानचं नशीब बदलण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तानच्या सागरी हद्दीत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा मोठा साठा सापडल्याची माहिती समोर येत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
रिपोर्ट्सनुसार, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूचा हा साठा इतका मोठा आहे की पाकिस्तानचं नशीब बदलू शकते. डॉन न्यूज टीव्हीने शुक्रवारी एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, तेल आणि वायूच्या साठ्याच्या अस्तित्वाची पुष्टी करण्यासाठी मित्र देशाच्या सहकार्याने तीन वर्षांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
( नक्की वाचा : 700 कार, 300 बेडरुम... 30 बंगाल टायगर, मोदींचं स्वागत करणारे ब्रुनेईचे सुलतान कोण आहेत? )
भूगर्भीय सर्वेक्षणामुळे पाकिस्तानला तेल आणि नैसर्गिक वायूंच्या साठ्यांचे स्थान ओळखण्यास मदत झाली. पाकिस्तानच्या हद्दीतील तेलसंपत्तीबाबत संबंधित विभागांनी सरकारला माहिती दिली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, या संसाधनांचा फायदा घेण्यासाठी बोली आणि प्रस्तावांचा अभ्यास केला जात आहे. म्हणजेच भविष्यात याचं शोध कार्य सुरू केले जाऊ शकते.
(नक्की वाचा - उत्तर कोरियाचा सनकी हुकूमशाह भडकला, 30 सरकारी अधिकाऱ्यांना दिली फाशी)
मात्र, विहिरी खोदून प्रत्यक्षात तेल काढण्यासाठी अनेक वर्षे लागू शकतात. या संदर्भात पुढाकार घेऊन काम लवकर पूर्ण केल्यास देशाचे आर्थिक स्थिती बदलण्यास मदत होऊ शकते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. काही अंदाजानुसार हा शोध जगातील चौथ्या क्रमांकाचा तेल आणि वायूचा साठा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world