जाहिरात
This Article is From Sep 03, 2024

700 कार, 300 बेडरुम... 30 बंगाल टायगर, मोदींचं स्वागत करणारे ब्रुनेईचे सुलतान कोण आहेत?

Who is sultan of Brunei ? : हसनल बेल्कियाह त्यांची संपत्ती आणि शानदार जीवनशैलीसाठी जगभर ओळखले जातात. त्यांच्याकडं जगातील सर्वात मोठा खासगी कारचा संग्रह आहे.

700 कार, 300 बेडरुम... 30 बंगाल टायगर, मोदींचं स्वागत करणारे ब्रुनेईचे सुलतान कोण आहेत?
मुंबई:

Who is sultan of Brunei ? : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Prime Minister Narendra Modi) ब्रुनेई दौऱ्यावर आहेत. भारत-ब्रुनेई यांच्यातील संबंध बळकट करणे हा पंतप्रधानांच्या दोन दिवसांच्या दौऱ्याचा उद्देश आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांच्या राजकीय संबंधांना 40 वर्ष पूर्ण झाल्याचं खास निमित्त देखील या दौऱ्याला आहे. ब्रिटनच्या महारानी एलिजाबेथ द्वितीय यांच्यानंतर जगात सर्वाधिक काळ शासन करणारे सम्राट सुलतान हसनल बोल्किया यांच्या निमंत्रणानंतर पंतप्रधान ब्रुनेईमध्ये गेले आहेत.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विलासी जीवनशैलीसाठी प्रसिद्ध

हसनल बेल्कियाह त्यांची संपत्ती आणि शानदार जीवनशैलीसाठी जगभर ओळखले जातात. त्यांच्याकडं जगातील सर्वात मोठा खासगी कारचा संग्रह आहे. त्याची अंदाजे किंमत 5 अब्ज डॉलर आहे. ब्रुनेईमधील तेल आणि गँस भांडारातून मिळणाऱ्या 30 अब्ज डॉलर संपत्तीसह ब्रुनेईच्या सुलतानांकडं 7,000 पेक्षा जास्त वाबनं आहेत. त्यामध्ये जवळपास 600 रोल्स रॉयल कारचा समावेश आहे. या प्रकारच्या वेगवेगळ्या उपलब्धीसाठी त्यांच्या नावाची अधिकृत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे. 

( नक्की वाचा : मुंबईची सुंदरी पडली 55 वर्षांच्या पाकिस्तानी उद्योगपतीच्या प्रेमात! हनीमूनचा Video Viral )
 

800 दशलक्ष डॉलरची एक कार

हसनल बोल्कियाच्या संग्रहातील प्रमुख वाहनांमध्ये अंदाजे 80 दशलक्ष डॉलर किंमतीची बेंटले डोमिनेटर SUV, होरायझन ब्लू पेंटसह पोर्श 911 आणि X88 पॉवर पॅकेज आणि 24-कॅरेट सोन्याचा मुलामा असलेल्या रोल्स-रॉयस सिल्व्हर स्पर II यांचा समावेश आहे. त्यांच्याकडील मौल्यवान वस्तूंमध्ये खास पद्धतीनं डिझाइन केलेली रोल्स-रॉईस आहे. ही कार सोन्यानं डिझाईन केलेली असून त्याचं छत ओपन आहे.  सुलतानने 2007 मध्ये त्याची मुलगी राजकुमारी माजेदेदा हिच्या लग्नासाठी देखील सोन्याचा मुलामा असलेली रोल्स रॉइस खरेदी केली होती.

  • ब्रुनेईच्या सुलतानांकडं 700 पेक्षा जास्त कार आहेत.
  • ब्रुनेई सुलतानांच्या राजवाड्यात 1700 बेडरुम आहेत.
  • हसनल बेल्किया यांच्या राजवाड्यात 257 बाथरुम आहेत.
  • सुलतानांचं खासगी प्राणीसंग्रहालय देखील आहे. त्यामध्ये 30 बंगाल टायगर्स राहतात. 

सुलतानांचा कार संग्रह त्यांच्या संपत्तीचा एक छोटा भाग आहे. ते ज्या इस्ताना नुरुल इमान पॅलेसमध्ये राहतात त्याची जगातील सर्वात मोठा निवासी महाल अशी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद आहे.  तब्बल 20 लाख स्क्वेअर फूट परिसरातील हा महाल 22 कॅरेट सोन्यानं सजलाय. या महालामध्ये  5 स्विमिंग पूल, 1,700 बेडरूम, 257 बाथरूम और 110 गॅरेज आहेत. त्यांच्या खासगी प्राणीसंग्रहालयात 30 बंगाल टायगर्ससह वेगवेगळ्या जातींच्या पक्ष्यांचा निवास आहे. तसंच त्यांच्याकडं एक बोईंग 747 विमानही आहे. 

( नक्की वाचा : 'पंतप्रधान झालो तर भारतावर अण्वस्त्र हल्ला करेन' थेट धमकी देणारा YouTuber कोण आहे? )
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: