
Indian Student Killed in US: अमेरिकेतील डल्लास (Dallas) शहरात एका भारतीय विद्यार्थ्याची गोळीबार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबाद येथील चंद्रशेखर पोले (Chandrashekar Pole) नावाच्या 27 वर्षीय विद्यार्थ्याला एका अज्ञात हल्लेखोराने गोळी मारली. चंद्रशेखर ज्या गॅस स्टेशनवर पार्ट-टाईम (part-time) काम करत होता, तिथेच ही घटना घडली.
शिक्षणासाठी गेला, अपूर्ण राहिले स्वप्न
चंद्रशेखर पोले हा 2023 मध्ये उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला गेला होता. हैदराबादमध्ये त्याने दंत शल्यचिकित्सेची (Dental Surgery) पदवी पूर्ण केली होती. अमेरिकेत त्याने सहा महिन्यांपूर्वीच आपले मास्टर्स शिक्षण पूर्ण केले होते. पूर्णवेळ नोकरीच्या शोधात असताना तो गॅस स्टेशनवर अर्धवेळ (part-time) काम करत होता. त्याच्या स्वप्नांची पूर्तता होण्याआधीच ही दुःखद घटना घडली.
( नक्की वाचा : Baba Vanga: 2026 मध्ये तिसरे महायुद्ध, AI आणि एलियन्सचा धुमाकूळ; बाबा वेंगाच्या 4 भीतीदायक भविष्यवाणी )
कुटुंबियांकडून मदतीची मागणी
या घटनेनंतर चंद्रशेखरच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांनी केंद्र सरकारला चंद्रशेखरचा मृतदेह अमेरिकेतून तातडीने भारतात परत आणण्यासाठी मदत करण्याची विनंती केली आहे.
या दुःखद घटनेनंतर बीआरएस (BRS) आमदार सुधीर रेड्डी आणि माजी मंत्री टी. हरीश राव यांनी आज हैदराबादमधील चंद्रशेखरच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. माजी मंत्री टी. हरीश राव यांनी या घटनेला 'अत्यंत दुःखद' म्हटले असून, पोले यांचा मृतदेह तातडीने त्यांच्या गावी आणण्यासाठी सरकारने पाऊले उचलावीत, अशी मागणी केली.
हरीश राव यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, "ज्या मुलाकडून मोठे यश मिळवण्याची अपेक्षा होती, तो आता राहिला नाही, हे पाहून पालकांना होणारे दुःख हृदयद्रावक आहे." बीआरएस (BRS) पक्षाच्या वतीने त्यांनी राज्य सरकारकडे चंद्रशेखरांचे पार्थिव लवकरात लवकर त्यांच्या गावी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world