जाहिरात

What Is Fattah 1 Missile? इस्रायलवर सोडलेले 'फतेह' नेमके आहे तरी काय ? जाणून घ्या वैशिष्ट्ये

ऑक्टोबर 2024 मध्ये, इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने जबरदस्त हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणने  फतह-1 हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावा केला होता.

What Is Fattah 1 Missile? इस्रायलवर सोडलेले 'फतेह' नेमके आहे तरी काय ? जाणून घ्या वैशिष्ट्ये
नवी दिल्ली:

इराण आणि इस्रायल यांच्यातील सध्या सुरू असलेला संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. तेहरानने इस्रायलविरुद्ध हायपरसॉनिक फतह 1 (Fattah 1 hypersonic missile) क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे.  इराणने इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारले ( Iran Israel War) असून याला त्यांनी 'ऑपरेशन ऑनेस्ट प्रॉमिस 3' (Operation Honest Promise 3) नाव दिले आहे.  इराण इस्रायल संघर्षाचा आज सहावा दिवस असून इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खामेनी यांनी इस्रायलवर आता दयामाया नाही असे म्हणत इशारा दिला आहे. इराणने इस्रायलवर हवाई हल्ला केला असून या हल्ल्यांमध्ये प्रामुख्याने फतेह 1 क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला हे महाविध्वंसक क्षेपणास्त्र आहे तरी काय पाहूया. 

नक्की वाचा : इराण दाबणार जागतिक तेलपुरवठ्याची मान? भारतामध्ये निर्माण होणार भयंकर परिस्थिती!

2024 मध्येही झाला होता वापर

इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव गेल्या काही वर्षांत कमालीचा वाढला आहे. या दोन देशांच्या संघर्षात इराणने वापरलेल्या फतह क्षेपणास्त्राची बरीच चर्चा ऐकू येते.  ऑक्टोबर २०२४ मध्ये इराणने इस्रायलवर हवाई हल्ला केला होता. त्यावेळीही इराणने इस्रायलवर फतह क्षेपणास्त्रं सोडली होती. तेव्हापासूनच या क्षेपणास्त्राच्या क्षमता आणि परिणामकारकतेबद्दल बरीच चर्चा ऐकू यायला सुरूवात झाली.  

 फतह-1 क्षेपणास्त्राची वैशिष्ट्ये 

फतह-1 हे एक हायपरसॉनिक बॅलिस्टिक मिसाइल आहे, जे इराणने विकसित केले आहे. ' फतह' या शब्दाचा अर्थ 'विजेता' किंवा 'यशस्वी' असा होतो. या क्षेपणास्त्राची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

हायपरसॉनिक वेग: हे क्षेपणास्त्र ध्वनीच्या गतीपेक्षा (Mach 5) किमान पाचपट अधिक वेगाने प्रवास करू शकते. क्षेपणास्त्राचा अतिप्रचंड वेग असल्याने शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणाली (उदा. इस्रायलची 'आयर्न डोम' यंत्रणा)  हा मारा रोखण्यात अनेकदा अयशस्वी होते.

अचूकता: हायपरसॉनिक गतीमुळे हे मिसाइल कमी वेळात आपले लक्ष्य गाठू शकते आणि त्याची अचूकता देखील चांगली असते, ज्यामुळे ते शत्रूच्या महत्त्वपूर्ण लष्करी ठिकाणांना ते लक्ष्य करू शकते.

नक्की वाचा : इराणमध्ये Live प्रसारणच्या दरम्यान इस्रायलचा बॉम्बवर्षाव, बातम्या सांगताना अँकर पळाली, पाहा Video

मार्ग बदलण्याचे कौशल्य (Maneuverability): बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे सहसा पूर्वनिर्धारित मार्गाने प्रवास करतात, परंतु  फतह-1 सारखी हायपरसॉनिक क्षेपणास्त्रे उड्डाण करताना आपला मार्ग बदलू शकतात. यामुळे त्यांचा माग काढणे  आणि त्यांना अडवणे आणखी कठीण होते.

पल्ला (Range):  फतह-1 चा पल्ला किती आहे याबाबत निश्चित माहिती नसली तरी, इराणच्या क्षेपणास्त्रांचा पल्ला 2 हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यही भेदू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. हे अंतर पाहाता इराण सहजपणे इस्रायलवर हल्ला करू शकतो.  

क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालींना चकमा देण्याची क्षमता: या क्षेपणास्त्राची गती आणि मार्ग बदलण्याची क्षमता यामुळे इस्रायलच्या 'आयर्न डोम', 'डेव्हिड्स स्लिंग', 'अॅरो 2' आणि 'अॅरो 3' सारख्या हवाई संरक्षण प्रणालींना ती चकवू शकतात असा इराणचा दावा आहे.

ऑक्टोबर 2024 मध्ये, इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांच्या सहाय्याने जबरदस्त हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणने  फतह-1 हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा दावा केला होता. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने म्हटलंय की त्यांनी डागलेल्या 90 टक्के क्षेपणास्त्रांनी इस्रायलमधील लक्ष्ये अचूकपणे भेदली होती. इराणने त्यावेळी केलेल्या नेवाटीम येथील हवाई दलाचा तळ, नेत्झारिम येथील इस्रायली लष्कराची ठिकाणे आणि टेल नोफ इंटेलिजेंस युनिटला लक्ष्य केले होते. मात्र, इराणचे हे दावे इस्रायलने फेटाळून लावले होते. 
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com