जाहिरात
This Article is From May 20, 2024

इस्त्रायलचं टेन्शन, अमेरिकेचा शत्रू, 5000 विरोधकांना फाशी; कसं होतं इब्राहिम रईसींचं आयुष्य?

2022 मध्ये हिजाब घालण्यास विरोध केल्यानंतर महसा अमीनी यांचा मृत्यू आणि त्यानंतर देशव्यापी विरोधानंतरही ते आपल्या सिद्धांतावर कायम होते.

इस्त्रायलचं टेन्शन, अमेरिकेचा शत्रू, 5000 विरोधकांना फाशी; कसं होतं इब्राहिम रईसींचं आयुष्य?

हेलिकॉप्टर अपघातात इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचं निधन झालं आहे. राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या हेलिकॉप्टरचं अजरबैजानच्या पश्चिमी भागातील जोफा भागातील डोंगराळ भागात अपघात झाला. 63 वर्षीय इराणचे राष्ट्राध्यक्ष दौऱ्यावर असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात इराणचे परराष्ट्र मंत्री हुसैन अमीर अब्दुल्लाहियनसह हेलिकॉप्टरमधील अन्य प्रवाशांचा मृत्यू झाला. या अपघातात संपूर्ण हेलिकॉप्टर जळून गेलं आहे. इब्राहिम रईसी यांच्या नावाशी अनेक विवाद जोडले गेले होते आणि अमेरिकेसोबतचे त्यांचं संबंध फारसे चांगले नव्हते. जाणून घेऊन इब्राहिम रईसी यांच्याबद्दल...

इब्राहिम रईसी कोण होते?
इब्राहिम रईसी यांची सर्वात आधी 2017 मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र विद्यमान उदारमतवादी अध्यक्ष हसन रुहानी यांच्याकडून रईसी यांचा पराभव झाला होता. मात्र 2021 मध्ये इब्राहिम रईसी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकली आणि इराणचे आठवे राष्ट्राध्यक्ष झाले. रईसी यांच्या विरोधकांना इराणच्या तपास एजन्सीने निवडणूक लढवण्यास रोखल्याची चर्चा होती. त्यांना 2.89 कोटी मतांपैकी साधारण 62 टक्के मतदान झालं होतं, मात्र ही संख्या इस्लामिक गणराज्यांच्या इतिहासातील सर्वात कमी टक्का होता. 

63 वर्षीय रईसी यांनी इराणच्या न्यायिक प्रणालीत अनेक पदं भूषविली आहेत. त्यांनी उप मुख्य न्यायाधीश (2004-2014), अटॉर्नी जनरल (2014-2016) आणि मुख्य न्यायाधीश (2019-2021) म्हणून सेवा दिल्या होत्या. रईसी हे इराणचे सुप्रीम लिडर आणि शिया धर्मगुरू अयातुल्ला अली खामनेईचे विश्वासू मानले जात होते. 

5000 विरोधकांना फाशी...
रईसी 1988 मध्ये इराणच्या गुप्त ट्रिब्युनलचे सदस्य झाले होते. याला डेथ कमिटीही म्हटलं जात होतं. त्यावेळी त्यांनी तब्बल पाच हजार नेत्यांना देशद्रोही ठरवलं होतं. या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार समुहानुसार, कमीत कमी 5,000 जणांना फाशी देण्यात आली होती. राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर एका संमेलनता रईसी यांना 1988 च्या सामूहिक फाशीबद्दल विचारलं तर याचं उत्तर त्यांनी दिलं नाही. सामूहिक फासी देणाऱ्यांमध्ये राजकीय कैदी, अतिरेकी आणि अन्य जणांचाही समावेश होता. फाशीच्या या घटनेनंतर अमेरिका आणि अन्य देशांनी रईसींवर बंदी आणली होती.

नक्की वाचा - Explainer : इराणच्या अध्यक्षांचा अपघाती मृत्यू भारतासाठी किती मोठा धक्का आहे?

इब्राहिम रईसी इराण यांची प्रतिमा कायम कट्टरतावादी राहिली आहे. 2022 मध्ये हिजाब घालण्यास विरोध केल्यानंतर महसा अमीनी यांचा मृत्यू आणि त्यानंतर देशव्यापी विरोधानंतरही ते आपल्या सिद्धांतावर कायम होते. महिनोनमहिने सुरू असलेल्या सुरक्षा कारवाईत 500 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आणि 22,000 हून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आलं. 

इस्त्रायलवर ड्रोन हल्ला...
रईसी आणि सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नेतृत्वात इराणने गेल्या महिन्यात इस्त्राइलवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले होते. सीरियाच्या दमिश्कमध्ये इराणी दूतावास परिसरात संशयास्पद इस्त्रायली हल्ल्यात इराणचे जनरल यांची हत्या केल्यानंतर करण्यात आला होता. इस्त्रायलवर 300 हून अधिक ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्यात आले होते.  


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com