जाहिरात

इस्रायलचा गाझामधील शाळेवर Air Strike! 30 जणांचा मृत्यू, 100 पेक्षा जास्त जखमी

इस्रायलचा गाझामधील शाळेवर Air Strike! 30 जणांचा मृत्यू, 100 पेक्षा जास्त जखमी
Isreal Attacks Gaza
मुंबई:


Isreal Air Strike on Gaza : इस्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेत (Israel Hamas War) सुरु असलेल्या संघर्षाला शनिवारी नवं वळण मिळालं. इस्रायलनं गाझामधील दीर-अल-बलाह शाळेवर केलेल्या हल्ल्यात 30 पॅलिस्टीनींचा मृत्यू झाला असून 100 पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पॅलिस्टीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. तर इस्रायलच्या सैन्यानं हमासच्या कमांड सेंटरवर हल्ला केल्याचं स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांवर हल्ला झालाय त्यामधील बहुतेक जण विस्थापित असल्याचं इस्रायलनं सांगितलं आहे. 

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

इस्रायलच्या सैन्यानं एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. त्यानुसार, 'मध्य गाझामधील खदीजा शाळेच्या परिसरात असलेल्या हमास कमांड सेंटरवर हा हल्ला करण्यात आला आहे. या शाळेचा वापर सैनिकांच्या विरोधात हल्ला करण्यासाठी वापरण्यात येणारी शस्त्रं ठेवण्यासाठी केला जात होता. तसंच या हल्ल्याबाबत नागरिकांना यापूर्वीच इशारा देण्यात आला होता.'

या हल्ल्यात झालेल्या नागरिकांच्या मृ्त्यूसाठी हमासचे दहशतवादी जबाबदार असल्याचं इस्रायलच्या सैन्यानं म्हंटलं आहे. या दहशतवाद्यांनी शाळेलाच त्यांचं केंद्र केलं होतं. त्यामुळे तिथं हल्ला करावा लागला. घनदाट लोकसंख्येच्या परिसरात असलेल्या शाळा आणि हॉस्पिटलमधून हमास काम करत आहे, असा आरोप इस्रायलनं केला आहे. 

( नक्की वाचा : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय झाला बदल? कमला हॅरिसमुळे ट्रम्प यांना फायदा की तोटा? )
 

हमासनं आरोप फेटाळले

इस्रायलचे सर्व आरोप हमासनं फेटळाले आहेत. या शाळेत विस्थापित नागरिक राहत होते, असं हमासनं म्हंटलं आहे. यापूर्वी पॅलेस्टाईच्या अधिकृत मीडियानं दिलेल्या माहितीनुसार खान युनिस या शहरात इस्रायलच्या सैन्यानं शनिवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात 14 पॅलेस्टाईनचे नागरिक मारले गेले आहेत. त्या सर्वांचे मृतदेह नासिर मेडिकल कॉम्पलेक्समध्ये आणण्यात आली आहेत.

पॅलेस्टाईनमध्ये यापूर्वी देखील झालेल्या या पद्धतीच्या हल्ल्यात पायाभूत सुविधांना फटका बसला आहे. इस्रायली सैन्यानं नागरिकांच्या झालेल्या नुकसानाबद्दल हमासला दोषी ठरवलं आहे. हमास दाट लोकसंख्या असलेल्या परिसरतील शाळा, हॉस्पिटलमध्ये लपून काम करतं, असा इस्रायलचा दावा आहे. हमासनं हा दावा नेहमीच फेटळला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com