Pakistan News : काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात मोठे निर्णय घेतले. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. भारतातील पाकिस्तानी नागरिकांनी त्यांच्या मायदेशी हकालपट्टी केली जात असताना दुसरीकडे पाकिस्तानात मात्र भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. रावळपिंडीमध्ये तीन प्रमुख सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टरांनी संप पुकारला आहे. परिणामी पाकिस्तानातील सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. पंजाब सरकारच्या सार्वजनिक रुग्णालयांना आऊटसोर्स करण्याच्या योजनेविरोधात यंग डॉक्टर असोसिएशनने गेल्या आठवड्यापासून संप पुकारला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, संप पुकारणाऱ्या डॉक्टरांनी यंग डॉक्टर असोसिएशन पंजाबच्या आवाहनानंतर तीन रुग्णालयांमधील ओपीडी सेवांचा बहिष्कार केला. यामध्ये होली फॅमिली रुग्णालय, बेनजीर भुट्टो रुग्णालय आणि रावळपिंडी टीचिंग रुग्णालय यांचा समावेश आहे. ओपीडी सेवा ठप्प झाल्यामुळे तिन्ही रुग्णालयांमधील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र 'डॉन' यांनी सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, विभागीय प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयांना भेट दिली. मात्र कथितपणे ओपीडीमध्ये सेवा सुरू करण्यासाठी यंग डॉक्टर असोसिएशनची मनधरणी करण्यासाठी काहीही करण्यात आलं नाही.
नक्की वाचा - Pahlgam Attack : पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील 50 पर्यटन स्थळ बंद, वाचा संपूर्ण यादी
रावळपिंडी टीचिंग रुग्णालयातील रुग्णांकडून संपावर नाराजी व्यक्त केली जात आहे. ते म्हणाले, सरकारकडून चांगली वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्याचा दावा केला होता, मात्र सरकार यात अपयशी ठरली आहे. ते पुढे म्हणाले, डॉक्टर दर महिन्याला संपावर जातात. बेनजीर भुट्टो रुग्णालयातील रुग्ण रियाज खान म्हणाले, अधिकतर गरीब जनता उपचारासाठी सरकार रुग्णालयात येते. मात्र येथे काहीच सुविधा नाहीत.
'डॉन' या पाकिस्तानी वृत्तपत्राशी बोलताना बेनजीर भुट्टो रुग्णालयातील यंग डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ अजीज म्हणाले, मंगळवारी रावळपिंडीतील तीन प्रमुख महाविद्यालयीन रुग्णालयांमध्ये ओपीडीच्या संपाचा नववा दिवस होता. मात्र यावेळी रुग्णालय प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क केला नाही. अजीज पुढे म्हणाले, हा विरोध पगारासाठी नाही. हा संप रुग्णालयाच्या आऊटसोर्सिंगविरोधात आहे. आम्ही आरोग्य सेवांमधील खासगीकरणाचं समर्थन करणार नाही. जर रुग्णालयं आऊटसोर्स करण्यात आली तर गरीब रुग्णांना स्वस्त दरात उपचार मिळू शकणार नाही. आमचा संघर्ष जनकल्याण आणि सरकारी संस्थांमधील सुरक्षेसाठी आहे. जोपर्यंत सरकार आऊटसोर्सिंगची योजना अधिकृतरित्या रद्द करण्याचे निर्देश देत नाही, तोपर्यंत ओपीडीमधील संप सुरू राहील.
नक्की वाचा - Kashmir Zipline Video : 7 मिनिटांच्या अंतराने वाचलो, हल्ल्यावेळी झिपलाइन व्हिडिओ करणाऱ्या ऋषि भट्टचा धक्कादायक अनुभव
पोलिसांनी विविध आरोपांसाठी 200-300 संपकरींविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल केला आहे. मंगळवारी मीडियाशी बोलताना यंग डॉक्टर असोसिएशन पाकिस्तानच्या अध्यक्षांनी सरकारी रुग्णालयांच्या कर्मचाऱ्यांविरोधात दाखल केलेल्या एफआयआरवर नाराजी व्यक्त केली आहे. आपल्या वैध्य मागण्यांसाठी ते शांततापूर्ण विरोध करीत असल्याचं यंग डॉक्टर असोसिएशनचं म्हणणं आहे. स्थानिक मीडियानुसार, गेल्या आठवड्यात यंग डॉक्टर असोसिएशनच्या पंजाब शाखेच्या प्रांतीय राजधानीच्या सर्व मुख्य रस्त्यांवर संप पुकारत लाहोर बंद करण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे पंजाब सरकारला प्रांतातील सरकारी आरोग्य सुविधा आउटसोर्स करण्याच्या निर्णयाचा आढावा घेण्यास भाग पाडले जाईल, असं स्थानिक माध्यमांनी सांगितलं.