Hamas Chief Yahya Sinwar: हमासचा 'मास्टरमांइड' याह्या सिनवार इस्त्रायलच्या लष्करी हल्ल्यात ठार, योगायोग की टार्गेट?

Hamas Chief Yahya Sinwar: इस्रायलने हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह नंतर आता हमासचा प्रमुख याह्या सिनावरची (Hamas Chief Yahya Sinwar) हत्या केल्याच समोर आलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी दिल्ली:

इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाला जवळपास एक वर्ष उलटून गेले. इस्रायलने हिजबुल्लाह चीफ हसन नसरल्लाह नंतर आता हमासचा प्रमुख याह्या सिनावरची (Hamas Chief Yahya Sinwar) हत्या केल्याच समोर आलं आहे. पण, ही हत्या त्याला टार्गेट करुन केलीये की, हा योगायोग आहे. याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. इस्रायलने गाझा पट्टीतले हल्ले वाढवले आहेत. गुरुवारी इस्रायली लष्कराने हमासचे अड्डे हेरुन त्यावर एअर स्ट्राईक केला. त्यामुळे टार्गेट नव्हे तर तो योगायोगाने मृत्यू झाला. 

इस्रायलने गुरुवारी दावा केला की, अलीकडच्या काळात इस्त्रायलने गाझामध्ये अनेक हल्ले केले. मात्र गुरुवारी, इस्रायली  लष्करांनी हमासचे अड्डे हेरुन त्यावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात हमासचा मास्टरमांइड याह्या सिनावरचा मृत्यू झाला. इस्रायलने असाही दावा केला की, तो या मिशनचा खरा टार्गेट नव्हताच.  तो ज्या इमारतीत होता, त्या इमारतीत याह्या सिनवार उपस्थित असल्याची कल्पना इस्रायली लष्कराला सुद्धा नव्हती.

नक्की वाचा - इराणचा बदला घेण्यासाठी कसा करणार इस्रायल हल्ला? काय आहे दोन्ही देशांची शक्ती?

बुधवारी पॅलेस्टाईन समुहाचे बरेचजण याह्या सिनावरसह एका इमारतीत दाखल झाले.  ज्याची चुणूक इस्रायल सैनिकांना लागली होती. पण, त्यात सिनावरही असेल याची कोणाला कल्पनाही नव्हती. त्याचक्षणी  इस्रायल सैनिकांनी त्या इमारतीवर हवाई हल्ला केला. इस्त्रायली सैन्याने तपास करून मृतदेहांची ओळख पटवल्यावर, त्यांना धक्काच बसला. त्याच्या आनंदाला सीमा नव्हती. कारण त्यांचा मोठा शत्रू ही त्या मृतदेहांमध्ये होता. इस्रायलचं म्हणणं आहे की, इस्रायलवर 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार याह्या सिनवार इतर दोन लोकांसह मारला गेला. 7 ऑक्टोबर रोजी झालेल्या, हमासच्या हल्ल्यानंतरच गाझामधील युद्ध सुरू झालं. ठार झालेल्या इतर दोन जणांची ओळख अद्याप उघड झालेली नाही.

IDF नेमकं काय म्हणाले?
IDF नुसार, IDF आणि ISA (शिन बेट अंतर्गत सुरक्षा एजन्सी) यांनी दिलेल्या माहितीनुसार, याह्या सिनावरची हत्या झाली त्या ठिकाणी गेल्या वर्षी आणि या आठवड्याच्या सुरुवातीला हल्ले करण्यात आले होत. त्या ठिकाणी अनेक अभियानं यापूर्वी राबवली गेली होती. त्यामुळेच सिनावरची हत्या करणं सोपं झालं. आणि इस्रायलचा हवाई हल्ला यशस्वी ठरला.

Advertisement