Mumbai News: मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठाने एका बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या शिक्षेत कपात केली आहे. 2016 मधील एका 5 वर्षांच्या चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, उच्च न्यायालयाने ही शिक्षा 12 वर्षांवर आणली असून, त्यामागे आरोपीने तुरुंगात स्वतःमध्ये केलेले सुधार आणि त्याची शैक्षणिक प्रगती हे आधार मानले आहेत.
न्यायालयाने शिक्षा कमी का केली?
उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने विशेष पॉक्सो (POCSO) न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करताना अनेक बाबी नोंदवल्या. जेव्हा हा गुन्हा घडला (2016 मध्ये), तेव्हा आरोपीचे वय केवळ 20 वर्षे होत. आरोपीचा कोणताही जुना गुन्हेगारी रेकॉर्ड नव्हता. तो डिसेंबर 2016 पासून सलग तुरुंगात असून कोविड-19 महामारीच्या काळातही त्याला सोडाण्यात आले नव्हते.
(नक्की वाचा- UP News: रात्री झोपी गेलेली तरुणी बनली 'नागीण'! सकाळी बेडरुमधील दृश्य पाहून अख्ख गाव हादरलं)
गांधीजींवरील निबंध आणि सुधारण्याची वृत्ती
आरोपीने तुरुंगात असताना विविध शैक्षणिक उपक्रमांत भाग घेतला होता. विशेष म्हणजे, त्याने तुरुंगात आयोजित निबंध स्पर्धेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यावर निबंध लिहिला होता. त्याच्या या कृतीतून त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता दिसत असल्याचे न्यायालयाने मान्य केले. "आमच्या मते 12 वर्षांची शिक्षा न्यायाच्या उद्देशाने पुरेशी ठरेल," असे खंडपीठाने आपल्या आदेशात नमूद केले.
(नक्की वाचा- Ajit Pawar Plane Crash VIDEO: अजित पवारांच्या अपघाताचं नवीन CCTV Footage, विमानतळावर नेमकं काय घडलं?)
काय होती घटना?
9 डिसेंबर 2016 रोजी 5 वर्षांची मुलगी पाणी आणण्यासाठी शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या घरी गेली होती. तिथे आरोपीने तिच्यावर अत्याचार केला होता. घाबरलेल्या मुलीने घरी सर्व हकीकत सांगितल्यावर तिच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली. पुढे ट्रायल कोर्टात 8 वर्षांच्या पीडित मुलीने दिलेली साक्ष अत्यंत विश्वासार्ह आणि सुसंगत असल्याचे उच्च न्यायालयानेही मान्य केले आहे. न्यायालयाने हे स्पष्ट केले की, आरोपीने आतापर्यंत तुरुंगात घालवलेला काळ त्याच्या या 12 वर्षांच्या शिक्षेतून वजा केला जाईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world