
Iran-Israel conflict : पश्चिम आशियातील इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष सध्या चांगलाच चिघळला आहे. दोन्ही देशांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र डागली जात आहेत. इराण-इस्रायलच्या वादात भारताचा शेजारी पाकिस्तानची एन्ट्री झाली आहे. इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब टाकला, तर पाकिस्तान इस्रायलवर अण्वस्त्र हल्ला करेल, असा दावा इराणच्या एलिट दलांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जनरल मोहसेन रेजाई यांनी एका इराणी टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा हल्ला केला आहे. इराण आणि इस्रायलमध्ये झालेल्या क्षेपणास्त्रांच्या हल्ल्यात दोन्ही देशांमध्ये सुमारे 248 जणांचा मृत्यू ( इराणमध्ये 230, इस्रायलमध्ये 18) झाला आहे.
इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे वरिष्ठ अधिकारी आणि इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सदस्य रेजाई म्हणाले, 'इस्रायलने इराणवर अणुबॉम्ब वापरल्यास, ते (पाकिस्तान) इस्रायलवर अणुबॉम्बने हल्ला करतील अशी पाकिस्तानने आम्हाला खात्री दिली आहे.'
( नक्की वाचा : Israel Vs Iran: इराण-इस्रायलच्या युद्धात पाकिस्तानचे हाल! अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ )
इराण-इस्रायल संघर्षाचे अपडेट
ICAN (आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन मोहीम) नुसार, इस्रायल आणि पाकिस्तान हे सध्या अण्वस्त्रे असलेल्या नऊ देशांपैकी आहेत.
रेजाई म्हणाले की, पाकिस्तानने 'इराणच्या मागे उभे राहण्याची' शपथ घेतली आहे आणि मुस्लिम जगाला एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी 2024 च्या सुरुवातीला दोन्ही देशांमध्ये झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांनंतरच्या सलोख्याकडे लक्ष वेधले. त्यांनी असाही दावा केला की, इराणची क्षमता अद्याप जगासमोर उघड झालेली नाही.
इस्रायलविरुद्ध अण्वस्त्रे वापरण्याबाबत पाकिस्तानकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही, परंतु पाकिस्तानने इस्रायलविरुद्धच्या लढ्यात इराणला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे हा संघर्ष आगामी काळात आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी या युद्धाबाबत बोलताना सांगितलं की, 'इस्रायलमुळे निर्माण झालेल्या संघर्षांबद्दल पाश्चिमात्य जगाने चिंता केली पाहिजे'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world