जाहिरात

Masood Azhar : भारतानं केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरची पिलावळ नष्ट, वाचा कोणते नातेवाईक झाले ठार

Masood Azhar : सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार जवळच्या व्यक्ती या हल्ल्यात ठार झाले आहेत. 

Masood Azhar : भारतानं केलेल्या हल्ल्यात मसूद अजहरची पिलावळ नष्ट, वाचा कोणते नातेवाईक झाले ठार
मुंबई:

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी ठिकाणांवर भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात 70 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेले आहेत. या हल्ल्यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा सदस्य आणि चार जवळच्या व्यक्ती या हल्ल्यात ठार झाले आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

कोणते नातेवाईक ठार?

बीबीसी उर्दूनं दिलेल्या माहितीनुसार भारतीय सैन्यानं दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अजहरच्या कुटुंबातील 10 सदस्य आणि चार जवळच्या व्यक्ती ठार झाले.  भारतानं पाकिस्तानमधील बहावलपूरमध्ये केलेल्या हल्ल्यात हे सर्वजण ठार झाले. 

जैश-ए-मोहम्मदनं केलेल्या दाव्यानुसार बुधवारी झालेल्या हल्ल्यात मसूद अजहरची मोठी बहीण आणि तिचा नवरा, पुतण्या आणि त्याची पत्नी, अन्य पुतणी आणि तिच्या कुटुंबातील पाच सदस्य या हल्ल्यात ठार झाली. त्याचबरोबर मसूद अजहरची एक जवळची व्यक्ती, त्याची आई आणि अन्य दोन जवळच्या व्यक्ती देखील या हल्ल्यात मारले गेले आहेत. 

( नक्की वाचा : Operation Sindoor : आजवरच्या सर्जिकल स्ट्राईकपेक्षा 'ऑपरेशन सिंदूर' चं वेगळेपण काय? संपूर्ण माहिती वाचून वाटेल अभिमान! )
 

कोण आहे मसूद अजहर?

1999 साली एअर इंडियाचे आसयी-814 या विमानाचे अपहरण करण्यात आले होते. या विमानातील नागरिकांच्या सुटकेच्या बदल्यात भारतीय जेलमध्ये बंद असलेल्या मसूदची सुटका करण्यात आली. त्यानंतर त्यानं बहवालपूरमध्ये जैशचा अड्डा तयार केलाय. भारतामध्ये झालेल्या अनेक दहशतवादी हल्ल्यात या संघटनेचा हात आहे. तसंच मसूद या हल्ल्याचा प्रमुख मास्टरमाईंड आहे. 

जैश आणि लश्करची प्रमुख कार्यालये उद्ध्वस्त

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखण्यात आली होती आणि ती सफलतेने पूर्ण करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कारवाईवर लक्ष ठेवून होते. या हल्ल्यामध्ये बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आणि मुरीदकेमधील लश्कर-ए-तोयबाचे मुख्यालय उडवण्यात आले. ही दोन्ही मुख्यालये पाकिस्तानातील पंजाब प्रांतामध्ये आहेत.  

या 9 ठिकाणांवर केला हल्ला

मरकज सुभान अल्लाह, बहावलपुर - जैश-ए-मोहम्मद
मरकज तैयबा, मुरीदके - लश्कर ए तोयबा
सरजल, तेहरा कलां - जैश-ए-मोहम्मद
महमूना जोया, सियालकोट - हिजबुल मुजाहीदीन
मरकज अहले हदीस, बरनाला - लश्कर ए तोयबा
मरकज अब्बास, कोटली - जैश ए मोहम्मद
मस्कर राहील शाहिद, कोटली -हिजबुल मुजाहीदीन
शावई नाला कँप, मुजफ्फराबाद - लश्कर ए तोयबा
सैयदना बिलाल कँप, मुजफ्फराबाद - जैश ए मोहम्मद

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com