
Operation Sindoor : उरी सर्जिकल स्ट्राईक 2016, बालाकोट एअरस्ट्राईक 2019, किंवा भारतानं आजवर राबवलेल्या सर्व ऑपरेशनपेक्षा ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) वेगळे आहे. हे ऑपरेशन भारतानं आजवर केलेल्या सर्व लष्करी कारवाईपेक्षा वेगळे, व्यापक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत होते. शत्रूचा अंदाज चुकवणारी भारतीय लष्कराची क्षमता या निमित्तानं पुन्हा एकदा संपूर्ण जगाला दिसली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'ऑपेरेशन सिंदूर' हे भारतानं बालाकोटच्या एअर स्ट्राईकनंतर राबवलेली सर्वात मोठी सीमापार कारवाई होती. त्याचबरोबर भारताच्या लष्करी कारवाईतील धोरणात्मक बदल देखील या निमित्तानं स्पष्ट झाला आहे.
स्पष्ट संदेश
भारतीय सैन्यानं केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' ची व्याप्ती ही आजवरच्या सर्व कारवाईपेक्षा मोठी होती. त्यामधून दहशतवादी आणि त्यांच्या सर्व आकांना स्पष्ट संदेश मिळाला आहे. भारताने हल्ला करण्याचा अधिकार यामधून राखून ठेवलाय. कोणतंही टार्गेट आपल्या आवक्याच्या बाहेर नाही हा संदेश दहशतवाद्यांना मिळाला आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.
( नक्की वाचा : Operation Sindoor: भारताचा एअर स्ट्राईक पाहून PSL खेळत असलेल्या इंग्लंडच्या खेळाडू घाबरला! म्हणाला.. )
भारतानं पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला. मुझफ्फराबाद, कोटली, बहावलपूर, रावळकोट, चकस्वरी, भिंबर, नीलम व्हॅली, झेलम आणि चकवाल यांचा समावेश होता. नऊ ठिकाणी एकूण 24 क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यामुळे हे भारतानं आजवर राबलेले सर्वात व्यापक आणि एका दिवसातील सर्वात अचूक ऑपरेशन बनले आहे.
भारताच्या कारवाईत 70 दहशतवादी ठार झाले असून 60 पेक्षा जास्त जखमी झाले आहेत, अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली. या हल्ल्यांसाठी निवडण्यात आलेल्या प्रत्येक ठिकाणी बराच काळापासून गुप्तचर यंत्रणांचं लक्ष होतं. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी उपग्रहाच्या माध्यमातून मिळावलेली माहिती, गुप्त संदेश तसंच प्रत्यक्ष हेरांचा योग्य वापर करत लष्कर-ए-तोयबा, आणि जैश-ए-मोहम्मद यांच्या तळाची नेमकी माहिती मिळवली होती.
( नक्की वाचा : Operation Sindoor : 25 मिनिटं, 21 ठिकाणं; दहशतवाद्यांच्या नांग्या ठेचणारं ऑपरेशन कसं राबवलं? )
काय होतं लक्ष?
ज्या इमारतींचा वापर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यासाठी, शस्त्र जमा करण्यासाठी, त्यांना आवश्यक असलेली रसद गोळा करण्यासाठी, गुप्त हल्ल्यांची योजना बनवण्यासाठी होत होता त्याच इमारतीमा लक्ष करण्यात आले. हा हल्ला करण्यापूर्वी अनेक दिवस ड्रोनच्या मदतीनं या इमारतींवर लक्ष ठेवण्यात आले होते. या इमारतींचा वापर दहशतवाद्यांकडून केला जातोय, ही खात्री झाल्यानंतरच हा हल्ला करण्यात आला.
कोणत्या शस्त्रांचा वापर?
'ऑपरेशन सिंदूर' मध्ये हवाई दल, नौदल आणि भूदल या तिन्ही सैन्यदलाचा वापर करण्यात आला. भारताच्या अंतर्गत भागातून हवाई दलांच्या विमानांनी ही शस्त्र आणण्यात आली.
SCALP क्षेपणास्त्रं: ही लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं (250 किमी पेक्षा जास्त) मजबूत ठिकाणांवर हल्ला करण्यासाठी वापरली जातात. भूमिगत बंकर तसंच कमांड सेंटर्सवर हल्ला करण्यासाठी याचा वापर करण्यात आला.
HAMMER बॉम्ब: हे अत्यंत अचूक बॉम्ब उंच इमारतींवर हल्ला करण्यासाठी वापरले गेले. ज्या इमारतींमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात आले, तसंच त्यांच्या मोहरक्यांचा तळ आहे याची माहिती सुरक्षा यंत्रणांकडं होती, त्या इमारतींवर हे बॉम्ब टाकण्यात आले.
लोइटरिंग म्यूनिशन्स : या ड्रोनचा दुहेरी उपयोग झाला. लाईव्ह फुटेजमधून पाळत ठेवणे, तसंच अचानक समोर आलेल्या महत्त्वाच्या हलत्या लक्ष्यांवर हल्ला करणे या दोन कामांसाठी याचा उपयोग झाला.
हल्ल्याच्या वेळी काय झालं?
एका सरकारी अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार एका तासाच्या आत सर्व क्षेपणास्त्रांनी त्यांच्या ठरलेल्या लक्ष्यांवर निशाणा साधला. हे सर्व हल्ले एकाचवेळी झाले. त्यांनी लक्ष्य केलेल्या ठिकाणं पूर्णपणे जमीनदोस्त झाली. पाकिस्तानच्या अंतर्गत भागात करण्यात आलेला हा हल्ला आजवरच्या हल्ल्यांपेक्षा वेगळा, अनेपेक्षित आणि अधिक व्यापक होता. हा हल्ला इतका अनपेक्षित होता की त्यामधून सावरण्याची कोणतीही संधी दहशतवाद्यांना मिळाली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world