जाहिरात

पाकिस्तानी सायबर ग्रुपने पुन्हा केले भारताला लक्ष्य, संरक्षण विभागाशी निगडीत गोपनीय माहिती चोरली?

X वरील पाकिस्तानी सायबर फोर्स नावाच्या हँडलवर दावा करण्यात आला आहे की हॅकर्सनी मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसिसची गोपनीय माहिती चोरली आहे.

पाकिस्तानी सायबर ग्रुपने पुन्हा केले भारताला लक्ष्य, संरक्षण विभागाशी निगडीत गोपनीय माहिती चोरली?
मुंबई:

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती निर्णाम झाली आहे. पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून आता सायबर हल्लेखोरांनी सुरक्षण मंत्रालयातील काही लोकांची गोपनीय माहिती चोरल्याची भीती निर्माण झाली आहे. यामध्ये या लोकांची लॉग-इन क्रेडेन्शिअलही चोरली असल्याची भीती आहे.  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

 X वरील पाकिस्तानी सायबर फोर्स नावाच्या हँडलवर दावा करण्यात आला आहे की हॅकर्सनी मिलिट्री इंजिनिअरिंग सर्व्हिसेस आणि मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अ‍ॅनालिसिसची गोपनीय माहिती चोरली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या सायबर हल्लेखोरांनी संरक्षण मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या आर्म्ड व्हेईकल निगम लिमिटेडची वेबसाईटही खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. 

नुकसानीचा ऑफलाईन आढावा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हॅकर्सच्या हल्ल्यात कोणत्या विभागाचे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेण्यात येत असून आर्म्ड व्हेईकल निगम लिमिटेडची वेबसाईट ऑफलाईन करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सायबर सुरक्षा तज्ज्ञ इतर कोणता हल्ला झाला आहे का ? त्यामुळे किती नुकसान झाले आहे याचा आढावा घेण्यासाठी सायबरस्पेसवर बारकाईने नजर ठेवून आहेत. खासकरून अशा गोष्टींवर लक्ष ठेवले जात आहे ज्या पाकिस्तानशी निगडीत असून त्या देशासाठी धोका निर्माण करू शकतात. सोबतच सायबर हल्ले रोखण्यासाठी सायबर सुरक्षा यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठीचे उपायही केले जात आहे. 

( नक्की वाचा : Pahalgam Terror Attack : साम, दाम, दंड, भेद... भारताची पाकिस्तानवर वार करणारी चाणक्य नीती काय आहे? )
 

पाकिस्तान सायबर फोर्सच्या हँडलवर बंदी

पाकिस्तान सायबर फोर्सच्या हँडलवर आता बंदी घालण्यात आली आहे. या हँडलवर आर्म्ड व्हेईकल निगम लिमिटेडच्या एका वेबपेजचा फोटो पोस्ट करण्यात आला होता. यामध्ये एक भारतीय रणगाडा पाकिस्तानी रणगाड्यात बदलण्यात आलेला दाखवण्यात आला होता. या हँडलवर एक यादीही प्रसिद्ध करण्यात आली होती. ही यादी भारतीय सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांची यादी होती. सोबतच एक संदेश लिहिण्यात आला होता, ज्यात म्हटले होते की, 'तुमची सुरक्षा हा एक भ्रम आहे, MES डेटा आमच्या ताब्यात आहे. ' या सायबर हल्लेखोरांनी असाही दावा केला आहे की मनोहर पर्रीकर इन्स्टीट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड अॅनालिसिसच्या वेबसाईटवरील 1600 वापरकर्त्यांचा 10 जीबीहून अधिकचा डेटापर्यंत ते पोहोचू शकले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: