Pahalgam Terrorist Attack : शाहिद आफ्रिदीने पुन्हा गरळ ओकली, "भारत स्वतःच्या लोकांना मारतो..."

Pahalgam Kashmir Terrorist Attack: समा न्यूज चॅनलवर बोलताना शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याचं खापर भारतावर फोडलं आहे. प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात जाईल असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीने केलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shahid Afridi on Pahalgam Attack :  पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटून शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यावरून विष ओकलं आहे. पहलगाम हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. मात्र शाहिद आफिदीने उलट्या बोंबा मारल्या आहेत. एका पाकिस्तानी न्यूज चॅनेलशी बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, "भारत स्वतःच्या लोकांना मारतो आणि पाकिस्तानवर आरोप करतो."

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समा न्यूज चॅनलवर बोलताना शाहिद आफ्रिदीने पहलगाम हल्ल्याचं खापर भारतावर फोडलं आहे. प्रत्येक भारतीयाची तळपायाची आग मस्तकात जाईल असं वक्तव्य शाहिद आफ्रिदीने केलं आहे. "भारतात फटाका फुटला तर ते लोक पाकिस्तानला दोष देतात. पहलगाममध्ये, दहशतवादी तासभर लोकांना मारत राहिले आणि 8 लाखांपैकी एकही भारतीय सैनिक मदतीला आला नाही. त्यानंतर 10 मिनिटांतच पाकिस्तानला दोष देण्यात आला." 

(नक्की वाचा-  Pahalgama Attack: भारताकडून 16 पाकिस्तानी न्यूज चॅनल आणि यूट्युब चॅनलवर बंदी, चेक करा लिस्ट)

"शाहिद आफ्रिदीने भारतावर स्वतःच्या लोकांना मारण्याचा आणि नंतर पाकिस्तानवर आरोप करण्याचा आरोपही केला. 'भारत स्वतःच आपल्या लोकांना मारतो. कोणताही देश किंवा धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही. आम्ही नेहमीच शांततेचे समर्थन करतो. इस्लाम आपल्याला शांती शिकवतो आणि पाकिस्तान कधीही अशा कारवायांना पाठिंबा देत नाही", असंही शाहिद आफ्रिदीने म्हटलं. 

"पाकिस्तानने नेहमीच भारताशी चांगले संबंध राखण्याचा प्रयत्न केला आहे. 2016  च्या टी-20 विश्वचषकात मी कर्णधार होतो आणि मला माहित नव्हते की आपण भारतात जाणार की नाही. भारत त्यांच्या कबड्डीच्या संघाला पाकिस्तानला पाठवतो. पण ते त्यांचा क्रिकेट संघ पाठवू शकत नाहीत. जर तुम्हाला बंद करायचे असेल तर सगळंच पूर्णपणे बंद करा", असं आव्हान देखील शाहिद आफ्रिदीने दिलं आहे.

(नक्की वाचा-  Ramdas Athawale: '...तर पाकिस्तानसोबत युद्ध करा', केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संताप, काय केलं आवाहन?)

2020 मध्येही पाकव्याप्त काश्मीर (POK) भेटीदरम्यान आफ्रिदीने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भारतात धार्मिक छळ केल्याचा आरोप केला होता. ट्विटरवर त्याने लिहिले होते की, "काश्मिरींच्या वेदना समजून घेण्यासाठी एखाद्याला कोणत्याही विशिष्ट धर्माचा असण्याची गरज नाही. फक्त योग्य ठिकाणी योग्य भावना असणे आवश्यक आहे. काश्मीर वाचवा."