जाहिरात

Crime News: एअरहॉस्टेसची दुबईत हत्या, कात्रीने 15 वार करत क्रूरपणे संपवलं; तरुणीने हत्येचं आधीच केलेलं भाकित

दुबईतील 'व्होको बोनिंग्टन' (Voco Bonnington) या पंचतारांकित हॉटेलमध्ये अनास्तासियाचा मृतदेह सापडला. आरोपीने तिच्या मानेवर आणि शरीरावर कात्रीने 15 वेळा वार केले होते.

Crime News: एअरहॉस्टेसची दुबईत हत्या, कात्रीने 15 वार करत क्रूरपणे संपवलं; तरुणीने हत्येचं आधीच केलेलं भाकित

दुबईमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये रशियन एअर होस्टेसची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या एक्स बॉयफ्रेंडने तिची निर्घृण हत्या केली. विशेष म्हणजे आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून ही तरुणी रशिया सोडून दुबईत पळून आली होती. मात्र तिथेही तिचा पाठलाग करून तिची हत्या करण्यात आली.

गेल्या दोन वर्षांपासून होणारा छळ आणि स्टॉकिंगला कंटाळून नवी सुरुवात करण्यासाठी दुबईत आलेल्या 25 वर्षीय रशियन एअर होस्टेसची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. अनास्तासिया निकुलिना (Anastasia Nikulina)* असे या तरुणीचे नाव आहे.

हॉटेलच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

दुबईतील 'व्होको बोनिंग्टन' (Voco Bonnington) या पंचतारांकित हॉटेलमध्ये अनास्तासियाचा मृतदेह सापडला. आरोपीने तिच्या मानेवर आणि शरीरावर कात्रीने 15 वेळा वार केले होते. हत्येनंतर आरोपीने तिच्या मृतदेहावर अँटीसेप्टिक डाय ओतून तिथून पळ काढला. एका नवीन विमान कंपनीत नोकरीच्या मुलाखतीसाठी ती दुबईत आली होती.

(नक्की वाचा-  Holiday on 15 January: 15 जानेवारीला राज्यात सुट्टी जाहीर; कुठे आणि कुणाला मिळणार लाभ?)

आरोपीने कसा रचला हत्येचा कट?

तपासात समोर आले की, आरोपी अल्बर्ट मॉर्गन याने एका साथीदारासह अनास्तासियाचा पाठलाग करत दुबई गाठली. आरोपीने हॉटेलचा एक गाऊन चोरला आणि आपण आपली चावी विसरलो आहोत असे सांगून एका सफाई कर्मचाऱ्याला खोली उघडण्यास तयार केले. खोलीत घुसल्यानंतर त्याने अनास्तासियावर चारित्र्याचा संशय घेत वाद घातला आणि तिची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपी तातडीने रशियाला पळून गेला. मात्र, दुबई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे ओळख पटवून रशियन प्रशासनाला सावध केले, ज्यानंतर त्याला सेंट पीटर्सबर्गमध्ये अटक करण्यात आली.

मृत्यूआधीचा तो व्हिडिओ

हत्येच्या तीन आठवड्यांपूर्वी अनास्तासियाने एक व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. त्यात तिने म्हटले होते, "मी हा व्हिडिओ त्या व्यक्तीचा पर्दाफाश करण्यासाठी बनवत आहे जो माझा छळ करत आहे आणि जो लवकरच मला मारून टाकेल. अल्बर्टने माझ्यावर अनेकदा हल्ले केले, पण पोलिसांनी माझ्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले."

(नक्की वाचा-  TMC Election: 7वी पास कोट्यधीश उमेदवार, दारात गाड्यांचा ताफा; निवडून आल्यास काय करणार? निबंध एकदा पाहाच)

अनास्तासियाने आरोपीला तिचा पिच्छा सोडण्यासाठी 10,000 पाउंड देखील दिले होते. मात्र तरीही त्याचा छळ थांबला नाही. अखेर या स्टॉकिंगचा अंत एका निष्पाप तरुणीच्या हत्येने झाला.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com