जाहिरात
Story ProgressBack

मोदींमुळे माझे लग्न मोडले! 4 बायका आणि 16 मुलांचा बाप असलेल्या मौलवीने सांगितले आपले दु:ख

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तारीक मसूद आपले दु:ख सांगताना दिसत आहे. त्याने म्हटले आहे की," माझंही एक लग्न होणार होते, मात्र मोदींचे सरकार सत्तेत आले त्यामुळे व्हिसा मिळू शकला नाही..." नेमके काय आहे प्रकरण ?

Read Time: 2 min
मोदींमुळे माझे लग्न मोडले! 4 बायका आणि 16 मुलांचा बाप असलेल्या मौलवीने सांगितले आपले दु:ख
पाचव्यांदा लग्न करू न शकल्याबद्दल व्यक्त केली खंत (Photo -Tariq Masood X)

पाकिस्तानमधील इस्लामी अभ्यासक तारीक मसूद याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये त्याने पाचव्यांदा लग्न करू न शकल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. पाचव्यांदा लग्न न करू शकल्याचा दोष त्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिल्याने भारतातील मंडळी मसूदवर तुटून पडली आहेत. मसूदने म्हटले की मोदी सत्तेत आल्याने त्यांना व्हिसा मिळाला नाही. व्हिसा न मिळाल्याने त्याचे पाचवे लग्न होता-होता राहिले. वर्ष 2014 साली मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पहिल्यांदा सत्तेत आले. वर्ष 2019 साली तरी सत्ताबदल होऊन आपल्याला व्हिसा मिळेल, अशी मसूद याला आशा होती. मात्र वर्ष 2019 साली मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा सत्तेत आले. तारीक मसूद हा पाकिस्तानातील लोकांना एकापेक्षा जास्त लग्न करण्यासाठी सातत्याने प्रोत्साहन देत असतो. तारीक मसूदने स्वत: चार वेळा लग्न केले आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

माझेही एक लग्न होणार होते, पण...

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तारीक मसूद आपले दु:ख सांगताना दिसत आहे. त्याने म्हटले आहे की," माझंही एक लग्न होणार होते, मात्र मोदींचे सरकार सत्तेत आले त्यामुळे व्हिसा मिळू शकला नाही. जेव्हा मोदींचे सरकार नव्याने सत्तेत आले होते तेव्हा मी म्हटले पुढचे सरकार स्थापन होईल तेव्हा पाहू. मात्र पुढच्या निवडणुकीतही मोदींचेच सरकार आले. मोदीच माझे लग्न मोडण्यासाठी जबाबदार आहेत. आता 10 वर्ष कोण वाट पाहील. जर ते पुन्हा आले तर मला असेच बसावे लागेल. मी असे लग्न करू शकत नाही. " 

(नक्की वाचा: अबब! कारमध्ये शिरला 6 फुट लांब महाकाय अजगर, ड्रायव्हरला फुटला घाम VIRAL VIDEO)

वादग्रस्त विधानांमुळे मसूद चर्चेत

तारीक मसूद हा आपल्या विखारी विधानांमुळे चर्चेत असतो. यापूर्वी त्याने टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाबाबतही विधाने केली होती. भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांनी वर्ष 2010 मध्ये लग्न केले होते. हे दोघे वेगळे झाल्यानंतर मसूदने म्हटले होते की, "नवरा बायकोमध्ये कधी पटते तर कधी पटत नाही. जेव्हा पटते तेव्हा ते एकत्र राहतात. जेव्हा पटत नाही तेव्हा ते विभक्त होतात. याला भारत-पाकिस्तान युद्धाचे स्वरुप देण्यासारखे असे याने कोणते मोठे वादळ ओढावले आहे".

(नक्की वाचा : 8वीच्या विद्यार्थ्याने जत्रेवर लिहिला असा निबंध, लोकांनी कपाळावर मारला हात; म्हणाले...)

VIDEO: अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, सोनं येणार 60 हजारांवर?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination