जाहिरात

Thailand Bangkok earthquake : म्यानमार ते थायलँड भूकंपाने उद्ध्वस्त, 144 जणांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी

अमेरिकेच्या जियोलॉजिकल सर्व्हेने अंदाज व्यक्त केला आहे की, म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 10 हजारांहून जास्त असू शकतो.

Thailand Bangkok earthquake : म्यानमार ते थायलँड भूकंपाने उद्ध्वस्त, 144 जणांचा मृत्यू, 800 हून अधिक जखमी

Thailand Bangkok earthquake : भारताच्या शेजारील देश म्यानमारमध्ये अत्यंत शक्तीशाली भूकंपाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. म्यानमारमधील भूकंपाचा परिणाम थायलँडची राजधानी बँकॉकमध्येही पाहायला मिळाला. भूकंपाचं केंद्र म्यानमार होतं आणि याची तीव्रता 7.7 रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे बँकॉकमधील कित्येक बहुमजली इमारती पत्त्यासारख्या कोसळल्या. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेक जणं अडकल्याची भीती आहे. 

या भूकंपामुळे 144 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून 800 नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार आणि थायलँडमधील भीषण भूकंपामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. याशिवाय बाधित देशांना मदत देण्याचा विश्वास व्यक्त केला. भारताने शनिवारी म्यानमारला तब्बल 15 टन मदत साहित्य पाठवणार आहे. हे साहित्य वायु दलामार्फत पाठविण्यात येणार आहे. यामध्ये टेन्ट, स्लीपिंग बॅग, जनरेटर सेट, चादरी, जेवण, वॉटर प्युरीफायर, सोलर लॅम्प आधी गोष्टींचा समावेश आहे. 

Myanmar Earthquake VIDEO : थायलंड, म्यानमार शक्तीशाली भूकंपाने हादरले; इमारती, पूल कोसळले, 20 जणांचा

नक्की वाचा - Myanmar Earthquake VIDEO : थायलंड, म्यानमार शक्तीशाली भूकंपाने हादरले; इमारती, पूल कोसळले, 20 जणांचा

अमेरिकेच्या जियोलॉजिकल सर्व्हेने अंदाज व्यक्त केला आहे की, म्यानमारमधील भूकंपामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 10 हजारांहून जास्त असू शकतो. म्यानमार आणि बॅकॉकमध्ये भूकंपाचं किती नुकसान झालं याचा अधिकृत आकडा समोर आलेला नाही. मात्र आतापर्यंत आलेल्या व्हिडिओमध्ये कित्येक इमारती कोसळल्याचं दिसत आहे. यावरुन प्रचंड नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

म्यानमारमध्ये आलेल्या भूकंपाचा परिणाम 900 किलोमीटरपर्यंत थायलँडमधील बँकॉकपर्यंत पाहायला मिळाला. पोलीसांनी सांगितलं की, बँकॉकमध्ये 30 हून अधिक इमारतींचं काम सुरू होतं. या इमारती कोसळल्या असून 43 हून अधिक मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे.