येत्या काळात मुंबईकरांना आर्थिक फटका बसण्याची चिन्ह आहेत. एसटीच्या भाडेवाढीबरोबरच आता टॅक्सी आणि रिक्षाच्या (Rickshaw taxi fare hike) भाडेदरात वाढ करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. 23 जानेवारी रोजी राज्य परिवहनाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला होता. मात्र रिक्षा-टॅक्सीची भाडेवाढ केव्हापासून होणार याबाबतची नेमकी तारीख सांगण्यात आली नव्हती. अखेर (Mumbai News) राज्य सरकारने याबाबतची घोषणा केली आहे.
जे टॅक्सी व ऑटोरिक्षा परवानाधारक सुधारीत भाडेदरानुसार भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन करून घेतील. त्या ऑटोरिक्षा, टॅक्सीना ही भाडेवाढ लागू होईल. भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन दिनांक 1 फेब्रुवारी 2025 पासून दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत करून घेणे आवश्यक राहील. (भाडेमिटरचे रिकॅलीब्रेशन होईपर्यंत सुधारीत अधिकृत टॅरिफ कार्ड दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंतच अनुज्ञेय राहील.) मोटार वाहन अधिनियमनुसार बृहन्मुंबई विदयुत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या (बेस्ट) 1850 बसेसचे 6 टप्पा प्रवासी वाहतूक परवान्याचे नुतनीकरण करण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून नवे दर लागू होतील.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मुंबई महानगर क्षेत्र प्राधिकरणाच्या क्षेत्रामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी आणि लास्ट माईल कनेक्टिविटी अनुषंगाने नवीन 2 काळी-पिवळी मीटर टॅक्सी स्टॅण्ड, 68 ऑटोरिक्षा स्टॅण्ड आणि 9 शेअर-ए ऑटोरिक्षा स्टँड उभारण्यास प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षांचे भाडेदर सूत्र विहित करण्याबाबत शासनाने खटुआ समितीची स्थापना केली होती. समितीने सादर केलेल्या अहवालास शासनाने 9 मार्च 2020 रोजीच्या निर्णयाद्वारे मान्य केले आहे. त्यानुसार काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) व ऑटोरिक्षा (सीएनजी) भाडे निश्चितीच्या सुत्रानुसार व वाहनाची सरासरी किंमत, ग्राहक निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर आदी बाबी विचारात घेऊन भाड्याची परिगणना केली जाते. मोटार वाहन कायदा, 1988 कलम 68 अन्वये, राज्य शासनाकडून मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरण समिती गठित करण्यात आलेली आहे.
नक्की वाचा - Budget 2025 Date : बजेटची तारीख आणि वेळ का बदलण्यात आली? तुम्हाला माहिती आहे का कारण?
असे आहेत सुधारित दर :
काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. 18.66 रुपये वरून 20.66 रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे.
आता काळी-पिवळी मीटर टॅक्सी (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रूपये 28 रुपये वरून 31 रुपये भाडेदर असणार आहे.
कुलकॅबसाठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये 26.71 वरून 37.2 रुपये (20 टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर सुधारणा करण्यात आली.
आता कुल कॅबसाठी किमान देय प्रति 1.5 कि.मी. भाडे रुपये 40 वरून 48 रुपये (20 टक्के वाढीप्रमाणे) भाडेदर असणार आहे.
ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी पूर्वीचे प्रति कि.मी. भाडे रुपये 15.33 रुपये वरून 17.14 रुपये भाडेदर सुधारणा करण्यात आली आहे.
आता ऑटोरिक्षा (सीएनजी) साठी किमान देय प्रति 1.5 कि.मी भाडे रूपये 23 वरून 26 रुपये भाडेदर असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world