जाहिरात

US election 2024 : राजकारणात येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प काय करीत होते? पत्नी आणि मूलं किती?

निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन  पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे.

US election 2024 : राजकारणात येण्यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प काय करीत होते? पत्नी आणि मूलं किती?
नवी दिल्ली:

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीसाठी आज सायंकाळपासून मतदान सुरू होईल. निवडणुकीत डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन  पक्षाचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांमध्ये मोठा संघर्ष पाहायला मिळत आहे. डोनाल्ड ट्रम्पबद्दल सांगायचं झाल्यास गेल्या काही वर्षात ते जबरदस्त वक्ता आणि कुशल नेता म्हणून पुढे आले आहेत. मात्र अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी सलग तीन वेळा उमेदवारी दाखल करणारे डोनाल्ड ट्रम्प कोणत्याही राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील नाहीत. ते एका रियल इस्टेट व्यावसायिकाच्या घरात जन्माला आले. अशा व्यक्तीचा राजकीय क्षेत्रात प्रवेश कसा झाला? सोबतच डोनाल्ड ट्रम्प यांचं कौटुंबिक जीवन कसं आहे?

न्यूयॉर्कमधील रियल इस्टेट व्यावसायिक फ्रेड ट्रम्प यांच्या कुटुंबात डोनाल्ड ट्रम्प यांचा जन्म झाला. ते यांचे चौथे पूत्र आहेत. १९६८ मध्ये पेन्सिल्वेनिया विद्यापीठाच्या व्हार्टन शाळेतून अर्थशास्त्राची पदवी घेतल्यानंतर ते वडिलांच्या रियल इस्टेट व्यवसायात सामील झाले. ट्रम्प यांनी वडिलांसोबत मिळून अनेक प्रोजेक्ट केले आणि आपलं नाव एक ब्रँड म्हणून विकसित केलं. २००० मध्ये द अप्रेंटिस नावाच्या टीव्ही शोमुळे त्यांना मोठी ओळख मिळाली. या कार्यक्रमाचे होस्ट म्हणून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. यावेळी त्यांना आपल्या व्यावसायिक कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. 

राजकारणात कशी झाली एन्ट्री?
1980 मध्ये त्यांना राजकारणात आवड निर्माण झाली. ट्रम्प यांनी २०१५ मध्ये रिपब्लिकन पक्षाअंतर्गत राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवाराची घोषणा केली. त्यांच्या अभियानाची शैली आक्रमक आणि वादग्रस्त होती. मात्र तरीही त्यांना व्यापक समर्थन मिळालं. २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार हिलेरी क्लिंटन यांना हरवून विजयी झाले. आणि हिच डोनाल्ड ट्रम्प यांसाठी राजकीय जीवनाची खरी सुरुवात होती. 

Kamala Harris vs Donald Trump : प्रचाराचे मुद्दे कोणते? निर्णायक ठरणाऱ्या 5 राज्यांमध्ये कोण मारणार बाजी? 

नक्की वाचा - Kamala Harris vs Donald Trump : प्रचाराचे मुद्दे कोणते? निर्णायक ठरणाऱ्या 5 राज्यांमध्ये कोण मारणार बाजी? 

२०२० च्या राष्ट्रपती निवडणुकीत जो बायडेन यांनी ट्रम्पना हरवलं. त्यांनी निवडणुकीच्या निकालांना आव्हान दिलं आणि निवडणुकीत फसवणुकीचा आरोप लावला. मात्र हा आरोप सिद्ध होऊ शकला नाही. त्यांच्या समर्थकांनी ६ जानेवारी २०२१ मध्ये कॅपिटल हिलवर हल्ला केला. कॅपिटल हिलवरील हल्ल्यानंतर ट्रम्प यांचं राजकीय करिअर जवळपास संपुष्टात आलं होतं.  

2022 मधील निवडणुकीत रिपब्लिकनची वाईट परिस्थितीसाठी दोषी ठरवल्यानंतरही ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदासाठी पुन्हा एकदा उमेदवारीची घोषणा केली आणि लवकरच पक्षाच्या अग्रस्थानी पोहोचले. ट्रम्प यांना मार्च महिन्यात पक्षाकडून राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी मिळाली आणि जुलै महिन्यात रिपब्लिकन नॅशनल कन्वेंशनमध्ये अधिकृतरित्या त्यांना उमेदवारी मिळाली. अनेक न्यायालयीन प्रकरणांमुळे महिन्यांपर्यंत राजकारणात निष्क्रीय असतानाही त्यांची ऐतिहासिक वापसी झाली होती. 

कसं आहे कौटुंबिक जीवन?
ट्रम्प यांचं खासगी आयुष्यही अनेकदा चर्चेत राहीलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तीन लग्नं केली आहेत. त्यांची पहिली पत्नी इवाना ट्रम्प, दुसरी मार्ला मेपल्स आणि आता त्यांच्या सोबत असलेली मेलानिया ट्रॅम्प. त्यांना पाच मूलं आहे. डोनाल्ड ज्युनियर, इवांका, एरिक, टिफनी आणि बॅरेन अशी त्यांची नावं आहेत. ट्रम्प यांच्यावर यौग अत्याचार आणि विवाहबाह्य संबंधांचा आरोप आहे.