
US attack Iran : इराण आणि इस्त्रायलच्या युद्धात आता अमेरिका सामील झाली आहे. अमेरिकेने इराणचे तीन आण्विक स्थळं फोर्डो, नतांज आणि इस्फहानवर हवाई हल्ला केला आहे. हा हल्ला यशस्वी झाल्याचं सांगितलं जात आहे. डोनाल्ड्र ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर एक पोस्ट करीत याबाबत माहिती दिली.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी (US President Donald Trump post) सांगितलं की, सर्व अमेरिकन विमानं आता इराणच्या हवाई सीमेबाहेर निघाले आहेत आणि सुरक्षित घरी परतले आहेत. सर्वाधिक बॉम्ब फोर्डो नावाच्या ठिकाणी टाकण्यात आले. त्यांनी अमेरिकन सैन्याचं कौतुक केलं.
US President Donald Trump posts, "We have completed our very successful attack on the three Nuclear sites in Iran, including Fordow, Natanz, and Esfahan. All planes are now outside of Iran air space. A full payload of BOMBS was dropped on the primary site, Fordow. All planes are… pic.twitter.com/pNKQMt95U6
— ANI (@ANI) June 21, 2025
आपल्या महान योद्ध्यांचं खूप अभिनंदन. जगातील कोणतंही सैन्य ही कामगिरी करू शकत नाही. शेवटी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, आता शांतीची वेळ आली आहे. मात्र अद्याप इराणकडून हल्ल्याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world