जाहिरात

US School Firing : अमेरिकेत पुन्हा गोळीबार, शाळेत घुसून केलेल्या गोळीबारात निष्पाप मुले लक्ष्य

US School Scooting :  अमेरिकेतील (America) मिनियापोलिस शहरात (Minneapolis) पुन्हा एकदा गोळीबाराची (shooting) घटना घडली आहे.

US School Firing : अमेरिकेत पुन्हा गोळीबार, शाळेत घुसून केलेल्या गोळीबारात निष्पाप मुले लक्ष्य
US School Firing : अमेरिका पुन्हा एकदा गोळीबारानं हादरले आहे.
मुंबई:

US School Scooting :  अमेरिकेतील (America) मिनियापोलिस शहरात (Minneapolis) पुन्हा एकदा गोळीबाराची (shooting) घटना घडली असून, एका कॅथलिक शाळेत (Catholic school) झालेल्या या हल्ल्यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 20 जण जखमी झाले आहेत. मिनियापोलिस शहरात गेल्या 24 तासांतील गोळीबाराची ही तिसरी घटना आहे, ज्यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नेमकं काय घडलं?

सकाळी 8:15 वाजता शाळेत प्रार्थना सभा (mass) होणार होती. त्यापूर्वीच हा गोळीबार झाल्याचे शाळेच्या वेबसाईटवर नमूद आहे. हल्लेखोराने गोळीबार केल्यावर तात्काळ त्याला पोलिसांनी घेरले आणि नंतर त्याने आत्महत्या केल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे, आता 'कोणताही धोका नाही' (no active threat) असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

शाळेच्या पहिल्याच आठवड्यात हिंसाचार

मिनियापोलिसमधील ॲनन्सिएशन कॅथलिक स्कूलमध्ये (Annunciation Catholic School) बुधवारी (बुधवार, दिनांक 27 ऑगस्ट 2025) सकाळी हा गोळीबार झाला. शाळेचा पहिला आठवडा सुरू असतानाच ही घटना घडल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे. घटनेनंतर लगेचच पोलिसांनी आणि एफबीआयच्या (FBI) जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ बाहेर काढण्यात आले.

अनेक हल्ले, वाढती चिंता

या गोळीबारात 1 व्यक्तीचा मृत्यू झाला असून 6 जण जखमी झाल्याचे मिनियापोलिसच्या हेनेपिन हेल्थकेअर (Hennepin Healthcare) रुग्णालयाने म्हटले आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये 5 मुलांचा समावेश आहे. मात्र, नंतर काही तासांतच शहरात आणखी दोन ठिकाणी गोळीबार झाला, ज्यात आणखी 2 लोकांचा मृत्यू झाला. या घटनांमुळे शहरात वाढत्या हिंसेची गंभीर समस्या समोर आली आहे.

( नक्की वाचा : PM Modi : ट्रम्प यांचा मोदींना चार वेळा कॉल, पण मोदींनी घेतला नाही; ‘या' कारणामुळे घेतला निर्णय? )
 

सरकारनं काय सांगितलं?

मिनेसोटा राज्याचे राज्यपाल टिम वॉल्झ (Tim Walz) यांनी या घटनेला 'भयंकर' म्हटले आहे. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्विट करून सांगितले की, "ज्या मुलांचा शाळेचा पहिला आठवडा या भयानक हिंसक घटनेने खराब झाला, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करत आहे." अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनीही या घटनेची माहिती घेतली असून, व्हाईट हाऊस या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगितले.

मागील काही काळापासून अमेरिकेत अशा गोळीबाराच्या घटना वाढल्या आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा अमेरिकेतील शस्त्र कायद्यांवर (gun laws) प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com