- अमेरिका ने सभी विदेशी कमर्शियल ट्रक ड्राइवरों के लिए वर्कर वीजा जारी करना तत्काल बंद कर दिया है.
- यह निर्णय भारत से अवैध रूप से आए हरजिंदर सिंह के कारण फ्लोरिडा में हुए गंभीर एक्सीडेंट के बाद लिया गया है.
- हरजिंदर सिंह पर लापरवाही से नियम तोड़कर ट्रक चलाते हुए हत्या का आरोप है. वह अवैध तरीके से अमेरिका गया था.
एका भारतीयामुळे अमेरिकेने एक कठोर निर्णय घेतला आहे. अमेरिकेने सर्व परदेशी ट्रक चालकांना व्हिसा देणे तात्काळ थांबवले आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी गुरुवारी, 21 ऑगस्ट रोजी या निर्णयाची घोषणा केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, "आम्ही तात्काळ प्रभावाने व्यावसायिक ट्रक चालकांसाठी वर्कर व्हिसा जारी करण्यावर बंदी घालत आहोत." हा निर्णय हरजिंदर सिंग नावाच्या एका भारतीय नागरिकाने केलेल्या चुकीमुळे घेण्यात आला आहे. जो अवैध मार्गाने अमेरिकेत घुसला होता आणि त्याच्यामुळे झालेल्या अपघाताने 3 लोकांचा जीव गेला होता.
अमेरिकेतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात दिसणाऱ्या विदेशी ट्रक चालकांमुळे अमेरिकेतील नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होत आहे, तसेच स्थानिक ट्रक चालकांच्या उपजीविकेवरही परिणाम होत आहे, असे रुबियो यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या कारवाईचे मुख्य कारण फ्लोरिडा येथे झालेला एक मोठा अपघात आहे.
(नक्की वाचा- खिशातील नोटांमुळे टीबीसारख्या अनेक गंभीर आजाराचा धोका; रीसर्चमधून धक्कादायक माहिती उघड)
हरजिंदर सिंग नावाचा व्यक्ती एका मोठ्या ट्रक-ट्रेलरसह रस्त्यावर अवैध 'यू-टर्न' घेत होता, ज्यामुळे मागून येणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील 3 लोकांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हरजिंदर सिंगवर वाहन चालवताना हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरजिंदर सिंग हा मूळचा भारतातील आहे. तो मेक्सिकोच्या मार्गाने अवैधपणे अमेरिकेत घुसला होता, असा त्याच्यावर आरोप आहे. अमेरिकन माध्यमांमध्ये हे प्रकरण खूप चर्चेत आहे आणि रिपब्लिकन पार्टीच्या नियंत्रणाखाली असलेल्या फ्लोरिडामधील अधिकाऱ्यांनी हा मुद्दा प्रकर्षाने उचलून धरला आहे.
(नक्की वाचा- Pune News: पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचं नाव बदललं, महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय)
हरजिंदर सिंगने आपले व्यावसायिक ड्रायव्हिंग लायसन्स कॅलिफोर्नियामधून घेतले आहे, जिथे त्याचे वास्तव्य होते. कॅलिफोर्नियावर सध्या ट्रम्प यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या डेमोक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण आहे, जो स्थलांतरणावर ट्रम्प यांच्या धोरणांना विरोध करतो. या घटनेनंतर ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नर गेविन न्यूसोम यांना या अपघातासाठी जबाबदार धरले आहे. कारण कॅलिफोर्नियानेच हरजिंदर सिंगला लायसन्स दिले होते. यावर गव्हर्नर न्यूसोम यांच्या कार्यालयाने प्रत्युत्तर दिले की, ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील संघीय सरकारनेच हरजिंदर सिंगला वर्क परमिट दिले होते. यावरून दोन राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे.