जाहिरात

Iran vs US : महासागरात रक्ताचा सडा! भारतातून परतणारी इराणची युद्धनौका अमेरिकेने उडवली; शेकडो सैनिकांना जलसमाधी

US Submarine Sinks Iranian Warship: श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ अमेरिकेच्या पाणबुडीने इराणच्या 'आयआरआयएस देना' युद्धनौकेवर टार्पेडो हल्ला केला. या भीषण हल्ल्यात 87 नौसैनिकांचा मृत्यू झाला असून 148 जण बेपत्ता आहेत.

Iran vs US : महासागरात रक्ताचा सडा! भारतातून परतणारी इराणची युद्धनौका अमेरिकेने उडवली; शेकडो सैनिकांना जलसमाधी

Iran VS America War: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता आशियाई समुद्रापर्यंत येऊन पोहोचला आहे. हिंदी महासागरात श्रीलंकेच्या तटाजवळ अमेरिकेच्या एका अण्वस्त्रसज्ज पाणबुडीने इराणची प्रगत युद्धनौका 'आयआरआयएस देना' (IRIS Dena) हिला लक्ष्य केले. या हल्ल्यात इराणचे अतोनात नुकसान झाले असून, अमेरिकेने या हल्ल्याचा थेट व्हिडिओ जारी करून जगाला इशारा दिला आहे.

87 मृत्यू आणि 148 नाविक बेपत्ता

श्रीलंकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला इतका भीषण होता की युद्धनौकेचे दोन तुकडे होऊन ती काही मिनिटांतच खोल समुद्रात बुडाली. श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत 32 क्रू सदस्यांना सुखरूप वाचवले आहे. 87 नौसैनिकांचे मृतदेह हाती लागले असून, अद्याप 148 नाविक बेपत्ता आहेत. समुद्राची खोली आणि पाण्याची स्थिती पाहता त्यांच्या वाचण्याची शक्यता धुसर असल्याचे बोलले जात आहे.

अमेरिकेने जारी केला 'लाईव्ह' व्हिडिओ

या हल्ल्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने जारी केलेला व्हिडिओ. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या हल्ल्याची पुष्टी करताना याला 'क्वाईट डेथ' असे संबोधले आहे. पाणबुडीच्या पेरिस्कोपमधून टार्पेडो डागतानाचा आणि त्यानंतर झालेल्या महाकाय स्फोटाचा व्हिडिओ जगासमोर ठेवला आहे. लष्करी इतिहासात पाणबुडी हल्ल्याचे असे रिअल-टाइम फुटेज जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

भारताच्या 'मिलान 2026' वर सावट?

विशेष म्हणजे, 'आयआरआयएस देना' ही युद्धनौका भारतात विशाखापट्टणम येथे आयोजित 'मिलान 2026' (MILAN 2026) या बहुराष्ट्रीय नौदल युद्धअभ्यासात सहभागी होण्यासाठी आली होती. तिथून परतत असतानाच अमेरिकेने ही कारवाई केली. डिफेन्स एक्सपर्ट्सच्या मते, अमेरिकन पाणबुडी इराणच्या या जहाजाचा भारतापासूनच पाठलाग करत असावी. इराणच्या प्रगत रडार यंत्रणेलाही या पाणबुडीचा सुगावा लागला नाही, हे अमेरिकेचे मोठे सामरिक यश मानले जात आहे.

Iran Warship

Iran Warship

(नक्की वाचा-  Iran Israel War: इराणमधील मिनाबच्या फोटोंनी जग हादरले, ट्रम्प यांची पुतणी देखील सुन्न)

अमेरिकेचा इशारा

"अमेरिका जगाच्या पाठीवर कुठेही वार करू शकते," या शब्दांत पीट हेगसेथ यांनी इराणला थेट इशारा दिला आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावर तणाव वाढला असून, भारत आणि श्रीलंका या देशांच्या सागरी सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com