
अदाणी समूहा विरोधात तत्कालीन बायडेन प्रशासनाने कारवाई केली होती. ही कारवाई बायडेन प्रशासनाच्या न्याय विभागामार्फत करण्यात आली होती. या कारवाई विरोधात चौकशी केली जावी अशी मागणी अमेरिकेतल्या 6 खासदारांनी केली आहे. त्यांनी याबाबत अमेरिकेचे अटॉर्नी जनरल एजी बॉन्डी यांना एक पत्र लिहीले आहे. हे पत्र 10 फेब्रुवारीला पाठवण्यात आलं आहे. लांस गुडेन, पैट फॉलन, माइक हरिडोपोलोस, ब्रैंडन गिल, विलियम आर टिममन्स IV, ब्रायन बाबिन, डी.डी.एस या खासदारांनी हे पत्र लिहीले आहे. भारत हा अमेरिकेसाठी महत्वाचा देश आहे. अशा वेळी बायडेन प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे दोन्ही देशांच्या संबंधाना नुकसान होवू शकते असं या पत्रात म्हटलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खासदारांनी पत्रातून कोणते मुद्दे मांडले
अदाणी ग्रुपच्या विरोधात चौकशीसाठी कोणताही आधार नाही.या प्रकरणात अमेरिकेचे कोणतेही नुकसान झालेले नाही .डाव्या विचारांच्या दबावाखाली चौकशीचा निर्णय झाला. विदेशी ताकदींच्या प्रभावामुळे चौकशीचे आदेश दिले गेले. या चौकशीमुळे भारत- अमेरिके संबंधाना धोका निर्माण झाला. भारता बरोबर संबंध बिघडले तर त्याचा सरळ फायदा चीनला होईल. ट्रम्प आणि मोदी सरकारमध्ये चांगले सहकार्य राहीले आहेत. ट्रम्प सत्तेत येण्या आधीच हे चौकशीचे आदेश का देण्यात आले? अमेरिकेत गुंतवणूक करणाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाते. बायडेन प्रशासनाची विदेशी ताकदींबरोबर काही साटेलोटे होते का? असे प्रश्नही या पत्रातून उपस्थित करण्यात आले आहेत. बायडेन प्रशासन काही कारण नसताना काही प्रकरणाची चौकशी करत होते. तर काही प्रकरणात बायडेन प्रशासनाने लक्ष दिले नाही असंही या पत्रातून स्पष्ट करण्यात आलं.
अदाणी समूहाबाबत कारवाईची चौकशी व्हावी
अदाणी समूहाबाबत झालेल्या कारवाईबाबत अमेरिकेच्या खासदारांनी प्रश्न उपस्थित केले आहे. याबाबत आता चौकशी झाली पाहीजे अशी मागणी या खासदारांनी केली आहे. बायडेन सरकारच्या काळात काही निर्णय हे संशयास्पद असल्याचं या खासदारांनी म्हटलं आहे. या सरकारने काही मोजक्याच प्रकरणांची चौकशी केली. तर काही प्रकरणांकडे पाहीलं ही नाही. त्यामुळे अमेरिकेची प्रतिमाही मलिन झाली. शिवाय भारता सारख्या सहयोगी देशाबरोबर संबंध ही खराब होण्याची स्थिती निर्माण झाली असं या खासदारांनी सांगितलं आहे.
भारत हा अनेक दशकांपासून अमेरिकेचा सहकारी देश राहीला आहे. जगातील सर्वात जुनी लोकशाही ही भारतात आहे. त्यामुळे भारताबरोबर आपले संबध हे खोलवर रुजले आहेत, असंही या खासदारांनी म्हटलं आहे. आर्थिक, व्यापारी आणि राजकीय दृष्टीकोना पलिकडचे संबंध या दोन्ही देशांचे आहेत. मात्र या संबंधामध्ये तडा जाईल असे निर्णय बायडेन प्रशासनाने घेतले आहे. त्यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडण्यास मदतच होणार आहे असा दावाही या पत्रातून या खासदारांनी केला आहे.
बायडेन प्रशासनेना असे अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. त्या पैकीच एक निर्णय हा अदाणी समूहाबाबतचा आहे. या कंपनीचे अधिकारी हे भारतात बसतात. शिवाय हे संपुर्ण प्रकरण हे आरोपांच्या आधारावर आहे. बायडेन प्रशासनाने वास्तव जाणून न घेता अदाणी समूहाच्या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आहे. या निर्णयामुळे अमेरिकेच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवतो. काही कारण नसताना बायडेन प्रशासनाने हे प्रकरण पुढे आणले आणि वाढवले असा आरोपही या खासदारांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - AI मुळे नोकऱ्या जाणार नाहीत तर मिळणार! PM मोदींनी जगाला समजावून सांगितलं
भारत आणि अमेरिकेचे संबंध चांगले आहेत. मोदी आणि ट्रम्प यांनी हे संबंध अधिक मजबूत केले आहेत. ट्रम्प यांनी भारताबरोबर चांगले संबंध ठेवण्याला प्राधान्य दिलं आहे. प्रशांत महासागरात चीनचे वाढत्या वर्चस्वाला भारताने आव्हान दिले आहे. या विषयावर भारत अमेरिके बरोबर आहे. असं ही हे खासदार या पत्रात म्हणातात. शिवाय बायडेन प्रशानाने जी कारवाई केली त्याच्या चौकशीची मागणी आम्ही करत आहोत. सत्य काय आहे हे समोर येण्यासाठी या प्रकरणातील सर्व कागदपत्र आम्हाला द्यावीत अशी विनंती ही करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world