"भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे", असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अमेरिकेने 21 दशलक्ष डॉलर्सचा निधी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ट्रम्प यांनी म्हटलं की, आपण भारताला 21 मिलियन डॉलर्स का द्यायचे? त्यांच्याकडे खूप पैसे आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) विभागाने भारताच्या निवडणुकांशी संबंधित 21 मिलियन डॉलर निधी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि या उपक्रमासाठी अमेरिकन करदात्यांच्या पैशाचा वापर का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Politics : CM फडणवीस - शिंदेंमध्ये शीतयुद्ध? या 5 कारणांमुळे महायुतीत फुट पडल्याची चर्चा)
ट्रम्प यांनी म्हटलं, "आपण भारताला 21 मिलियन डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे खूप पैसा आहे. ते जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत. आपण तिथे प्रवेश करू शकत नाही कारण कर खूप जास्त आहेत. मला भारत आणि त्यांच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे. पण अमेरिका मतदानासाठी भारताला 21 मिलियन डॉलर्स का देत आहे?"