
"भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल खूप आदर आहे", असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी अमेरिकेने 21 दशलक्ष डॉलर्सचा निधी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत ट्रम्प यांनी म्हटलं की, आपण भारताला 21 मिलियन डॉलर्स का द्यायचे? त्यांच्याकडे खूप पैसे आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) विभागाने भारताच्या निवडणुकांशी संबंधित 21 मिलियन डॉलर निधी रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या निर्णयाचे समर्थन केले आहे आणि या उपक्रमासाठी अमेरिकन करदात्यांच्या पैशाचा वापर का करण्यात आला असा प्रश्न उपस्थित केला आहे.
(नक्की वाचा- Maharashtra Politics : CM फडणवीस - शिंदेंमध्ये शीतयुद्ध? या 5 कारणांमुळे महायुतीत फुट पडल्याची चर्चा)
#WATCH | US President Donald Trump says, "Why are we giving $21 million to India? They have a lot more money. They are one of the highest taxing countries in the world in terms of us; we can hardly get in there because their tariffs are so high. I have a lot of respect for India… pic.twitter.com/W26OEGEejT
— ANI (@ANI) February 18, 2025
ट्रम्प यांनी म्हटलं, "आपण भारताला 21 मिलियन डॉलर्स का देत आहोत? त्यांच्याकडे खूप पैसा आहे. ते जगातील सर्वात जास्त कर आकारणाऱ्या देशांपैकी एक आहेत. आपण तिथे प्रवेश करू शकत नाही कारण कर खूप जास्त आहेत. मला भारत आणि त्यांच्या पंतप्रधानांबद्दल खूप आदर आहे. पण अमेरिका मतदानासाठी भारताला 21 मिलियन डॉलर्स का देत आहे?"
( नक्की वाचा : मंत्रिमंडळ बैठकीचा अजेंडा लिक करणाऱ्यांची खैर नाही! मुख्यमंत्र्यांचा गंभीर इशारा )
अब्जाधीश एलोन मस्क यांच्या नेतृत्वाखालील यूएस डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी (DOGE) ने खर्च कपातीची मालिका जाहीर केली आहे. ज्यामध्ये "भारतातील निवडणुकांमध्ये मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी" वाटप केलेल्या 21 मिलियन डॉलर्सचा समावेश आहे. भाजपने आता रद्द केलेल्या निधीला भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील बाह्य हस्तक्षेप म्हटले आहे.
भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, "मतदारांसाठी 21 मिलियन डॉलर्स? हा भारताच्या निवडणूक प्रक्रियेत बाहेरून केलेला हस्तक्षेप आहे. याचा फायदा कोणाला होईल? सत्ताधारी पक्षाला निश्चितच नाही!"
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world