
अमेरिकेच्या संरक्षण गुप्तचर संस्थेने (US Defense Intelligence Agency) 2025 साठी आपल्या जागतिक धोका मूल्यांकन अहवालात (Worldwide Threat Assessment Report) म्हटले आहे की, भारत चीनला आपला "प्राथमिक प्रतिस्पर्धी" मानतो, तर पाकिस्तानला "सुरक्षा समस्या" मानतो. भारताला जागतिक स्तरावर भक्कम करणे, चीनचा ताकदीने सामना करणे आणि लष्करी शक्ती वाढवणे यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष केंद्रित केले आहे असे ही या अहवालात म्हटले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
अहवालात या महिन्यात भारत-पाकिस्तानमध्ये झालेल्या संघर्षाचा संदर्भ दिला आहे. भारतीय हवाई हल्ल्यांमध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (PoK) दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केले गेले होते. अहवालात नमूद केले आहे, की "एप्रिलच्या अखेरीस जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर, भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्राने हल्ले केले. या हल्ल्यामुळे 7 ते 10 मे दरम्यान दोन्ही सैन्यांकडून क्षेपणास्त्र, ड्रोन आणि गोळीबार तसेच मोठ्या तोफांचा वापर केला असं या अहवालात आहे.
अहवालात असेही म्हटले आहे की, भारत चिनी प्रभावाचा सामना करण्यासाठी आणि आपली जागतिक नेतृत्वाची भूमिका वाढवण्यासाठी हिंदी महासागर प्रदेशात द्विपक्षीय संरक्षण भागीदारीला प्राधान्य देत आहे. यात भारत-चीन सीमा विवादाचाही उल्लेख केला आहे. भारत चीन सीमा निश्चितीबाबत दीर्घकाळापासून सुरू असलेला वाद सोडवला नाही, परंतु 2020 च्या संघर्षापासून काही प्रमाणात तणाव कमी झाला आहे.
"भारत निश्चितपणे आपला देशांतर्गत संरक्षण उद्योग उभारण्यासाठी, तसेच सैन्याचे आधुनिकीकरण करण्यासाठी या वर्षी आपली 'मेड इन इंडिया' (Made in India) ही योजना पुढे चालुच ठेवेल. भारताने 2024 मध्ये आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण सुरू केले. भारताने आपली क्षेपणास्त्र अधिनुक केली आहेत. या अहवालात भारत-रशिया संबंधांवर (India-Russia Relations) वक्तव्य केले आहे. भारताने 2025 मध्येही रशियासोबतचे आपले संबंध कायम ठेवले आहेत. भारताचे रशियासोबतचे संबंध आर्थिक आणि संरक्षण उद्दिष्टे साध्य करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात.
पाकिस्तानवरील विभागात, अमेरिकन अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानी सैन्याची (Pakistan Army) सर्वोच्च प्राधान्ये प्रादेशिक शेजाऱ्यांसोबतच्या सीमापार चकमकी, तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि बलुच राष्ट्रवादी दहशतवाद्यांकडून वाढते हल्ले, दहशतवादविरोधी प्रयत्न आणि अणु आधुनिकीकरण (Nuclear Modernization) असण्याची शक्यता आहे. 2024 मध्ये दहशतवाद्यांनी पाकिस्तानात 2,500 हून अधिक लोकांना ठार केले आहे." अहवालात म्हटले आहे, "पाकिस्तान भारताला एक 'अस्तित्वात्मक धोका' मानतो आणि भारताच्या पारंपारिक लष्करी लाभाला कमी करण्यासाठी युद्धभूमीतील अणुशस्त्रांच्या विकासासह आपले लष्करी आधुनिकीकरण प्रयत्न सुरू ठेवेल असं या अहवालात म्हटले आहे." पाकिस्तान आपल्या अणु शस्त्रागाराचे आधुनिकीकरण करत आहे. असं ही या अहवालात आहे. त्यासाठी त्यांना चीनची मदत होत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world