जाहिरात

India Pakistan relations : पाक अण्वस्त्र शक्ती वाढवतोय; अमेरिकेच्या DIA अहवालातून मोठी माहिती समोर

अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या (DIA) च्या अहवालात पाकिस्तान अण्वस्त्र वाढवत असल्याची माहिती समोर आली आहे. 

India Pakistan relations : पाक अण्वस्त्र शक्ती वाढवतोय; अमेरिकेच्या DIA अहवालातून मोठी माहिती समोर

रामराजे शिंदे, प्रतिनिधी

अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या (DIA) च्या अहवालात पाकिस्तान अण्वस्त्र वाढवत असल्याची माहिती समोर आली आहे. अमेरिकेच्या World wide threat assessment report 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्य शक्तीवर भाष्य करण्यात आलं आहे.  पहलगाममधील हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली. पाकिस्तानकडून कुरघोडी करण्यात आल्या तर त्याला नेमकं प्रत्युत्तर दिलं जाईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदीही म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या काळात भारत-पाकिस्तानमधील संंबंध अधिक चिघळण्याची शक्यता आहे. दरम्यान अमेरिकेच्या डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सीच्या अहवालात महत्त्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भारतसंदर्भात काय म्हटलंय…
भारत चीनला आपला “सगळ्यात मोठा शत्रू” मानतो, तर पाकिस्तानला “सुरक्षेच्या दृष्टीकोनातून धोका असलेले राष्ट्र मानतो”. पाकिस्तानच्या या धोक्यांना नियंत्रित करण्याची गरज आहे. भारत मेक इंडिया मोहीम राबवत आहे. भारत-चीन सीमा वादाबाबत, 2024 मधील तणाव कमी झाला असला तरी सीमेवरील दीर्घकालीन वाद कायम आहे. भारत रशिया संबंध 2025 मध्येही कायम - भारत रशियन बनावटीच्या लष्करी उपकरणांवर कमी अवलंबून आहे, परंतु रशियन सुट्या भागांवर (spare parts) अजूनही अवलंबून आहे. भारत हा हिंद महासागरात आपली ताकद वाढवत आहे.  मित्र राष्ट्रांसोबत भारत हिंद महासागरात सैन्य अभ्यास करून आपली ताकद वाढवत आहे.

Explainer : अमेरिकेतील सर्वात जुनं विद्यापीठ अन् सर्वोच्च घटनात्मक पदामध्ये संघर्ष, विद्यार्थ्यांची चिंता वाढली

नक्की वाचा - Explainer : अमेरिकेतील सर्वात जुनं विद्यापीठ अन् सर्वोच्च घटनात्मक पदामध्ये संघर्ष, विद्यार्थ्यांची चिंता वाढली

पाकिस्तान संदर्भात काय म्हटलंय...
पाकिस्तान भारताला आपल्या “अस्तित्वासाठी धोका” मानतो. यामुळे पाकिस्तान आपल्या लष्करी आधुनिकीकरणावर, विशेषत: युद्धभूमीवरील अण्वस्त्रे विकसित करत आहे. यामध्ये बायोलॉजिकल हत्यारांचा देखील समावेश आहे. यासाठी पाकिस्तानला चीन मदत करत आहे. पाकिस्तान अण्वस्त्रांचं भांडार वाढवत आहे. पाकिस्तान दलालांमार्फत हत्यार खरेदी करत आहे. 2024 मध्ये पाकिस्तानकडे अंदाजे 170 अण्वस्त्रं होती आणि 2025 पर्यंत हा आकडा 200 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आपल्या सामरिक गरजांसाठी चीनकडून आर्थिक आणि लष्करी मदत घेत आहे. पाकिस्तान चीनकडून, शस्त्रास्त्रे आणि तंत्रज्ञान घेत आहे. चीन व्यतिरिक्त पाकिस्तानला हाँगकाँग, सिंगापूर, तुर्की आणि संयुक्त अरब अमिरात देखील मदत करत असल्याचं अहवाल सांगण्यात आलं आहे. 

पाकिस्तानच्या अंतर्गत समस्या...
पाकिस्तानला तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) आणि बलुच नॅशनलिस्ट दहशतवाद्यांकडून (Baloch nationalist militants) अंतर्गत धोके आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये तालिबान आणि पाकिस्तानी सैनिक यांच्यात झालेल्या चकमकीत आठ तालिबान्यांचा मृत्यू झाला. मार्च 2025 मध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात सैन्य संघर्ष पाहायला मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

चीन-पाकिस्तान संबंध...
पाकिस्तान आणि चीन यांच्यातील लष्करी सहकार्य वाढत आहे. ज्यामध्ये संयुक्त लष्करी सराव (नोव्हेंबर 2024 मधील हवाई सराव) करण्यात आला. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर (CPEC) प्रकल्पांवर काम करणाऱ्या चिनी कामगारांवरील दहशतवादी हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमध्ये तणाव कायम आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com