
India Pakistan Ceasefire : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला उद्देशून एक निवेदन करणार आहेत (Indian Prime Minister Narendra Modi to address Nation) त्यांच्या संबोधनाच्या आधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. आपल्या संवादाची सुरुवातच त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आणी दोन्ही देशांमध्ये झालेल्या शस्त्रसंधीपासून केली. या शस्त्रसंधीचे सगळे श्रेय यांनी आपल्याकडे घेतले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी माध्यमांशी बोलताना गेल्या आठवड्यात बऱ्याच घडामोडी घडल्या असे म्हणत भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रसंधी (India Pakistan Ceasefire) व्यापार संधीच्या आडून घडवून आणल्याचे सांगितले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world