
Uttarakhand Badrinath Massive Avalanche: उत्तराखंडमधील चमोली येथे मुसळधार बर्फवृष्टीमुळे माना गावाजवळ अचानक हिमस्खलन झाल्याने 57 कामगार गाडले गेल्याची दुर्घटना घडली आहे. माना गावाच्या वरती हिमनदी तुटल्याने सीमा रस्ते संघटनेचे (BRO) 41 कामगार खाली गाडले गेले. तर 16 कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे आणि अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम वेगाने केले जात आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन, आयटीबीपी आणि बीआरओच्या टीम घटनास्थळी आहेत. बचावकार्य वेगाने सुरू आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, माना गावाच्या वरती हिमनदी तुटल्याने सीमा रस्ते संघटनेचे (BRO) 41 कामगार खाली गाडले गेले. तर 16 कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे आणि अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम वेगाने केले जात आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन, आयटीबीपी आणि बीआरओच्या टीम घटनास्थळी आहेत. बचावकार्य वेगाने सुरू आहे.
एसडीआरएफचे पोलिस महानिरीक्षक रिधीम अग्रवाल म्हणाले की, 28 फेब्रुवारी 2025 रोजी बद्रीनाथ धामजवळील माना येथे हिमस्खलन झाले. हिमस्खलनाच्या घटनेत एकूण 57 बीआरओ कामगार गाडले गेले. कमांडंट बीआरओच्या मते, आतापर्यंत 16 कामगार सुरक्षित आहेत, तर 41 कामगार बेपत्ता आहेत. एसडीआरएफची एक टीम जोशीमठहून रवाना झाली आहे. लंबागडमध्ये रस्ता अडवल्यामुळे लष्कराशी संपर्क साधून रस्ता खुला करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दुसऱ्या पथकाला सहस्रधारा हेलिपॅडवर सतर्क ठेवण्यात आले आहे. हवामानात सुधारणा होताच, एसडीआरएफच्या उंचावरील बचाव पथकाला हेलिकॉप्टरने जवळच्या उपलब्ध ठिकाणी सोडले जाईल. एसडीआरएफ ड्रोन टीमलाही सज्ज ठेवण्यात आले आहे. प्रचंड बर्फवृष्टीमुळे, सध्या ड्रोन ऑपरेशन्स शक्य नाहीत.
(नक्की वाचा- Swargate Case: ...तर 'ती' वासनेचा बळी झाली नसती! स्वारगेट स्थानकात सुरु होते 'हे' काळे धंदे; वाचा स्फोटक रिपोर्ट)
दरम्यान, गेल्या 24 तासांपासून उत्तराखंडमधील अनेक उंच भागात बर्फवृष्टी होत आहे. तर सखल भागात पाऊस सुरूच आहे. केदारनाथ धाम, त्रियुगीनारायण, तुंगनाथ, चोपटा आणि इतर उंच भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने डोंगराळ भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची परिस्थिती कायम राहील.
निलम शिंदेंच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा, अमेरिकेत जाण्यासाठी व्हिसा मंजूर
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world