जाहिरात

Viral Video: अमेरिकेत प्लंबर-मेकॅनिकची कमाई किती? कमवतात इतके पैसे की जगतात अलिशान आयुष्य, पाहा एकूण कमाई

जर तुमच्याकडे योग्य कौशल्य असेल, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नाव, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवू शकतो.

Viral Video: अमेरिकेत प्लंबर-मेकॅनिकची कमाई किती? कमवतात इतके पैसे की जगतात अलिशान आयुष्य, पाहा एकूण कमाई
  • अमेरिकेत प्लंबर, इलेक्ट्रिशियन आणि मेकॅनिक सारख्या कामांना मोठी कामाई आणि आर्थिक प्रतिष्ठा मिळते
  • भारतीय कौशल्यवान कामगार अमेरिकेत काम करून चांगली कमाई करून भारतात मोठी रक्कम पाठवतात
  • अमेरिकेत कुशल कामगारांना त्यांच्या कामासाठी चांगले पैसे दिले जातात
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

अमेरिकेत जावून काम करणं हे अनेकाचं स्वप्न असतं. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही. अशा स्थितीत काही जण वाट्टेल ते करून अमेरिका गाठण्याची तयारी करतात. डंकी सारखा खतरनाक मार्ग अवलंबतात. तर काही जण अधिकृत पणे नोकरी करण्यासाठी अमेरिकेत जातात. त्याला कारण ही तसे आहे. अमेरिक डॉलर सर्वांनाच आकर्षित करतात. तिथे मिळेल ते काम करून भारतात पैसे पाठवणाऱ्यांची संख्या ही मोठी आहे. अशा वेळी तिथे कुठलं ही काम छोटं किंवा मोठं नाही. कामाई किती होते हे महत्वाचे आहे. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एक साधा प्लंबर किंवा मेकॅनिक किती कामाई करतो हे सांगितलं आहे.  

अमेरिकेतील जीवनशैलीशी संबंधित हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. भारत आणि इतर देशांमधील लोक हा व्हिडिओ पाहून आवाक झाले आहे. या व्हिडीओतून बरेच काही शिकण्यासारखे आहे. अमेरिकेत अनेक जण प्लंबर, इलेक्ट्रिशियन किंवा गॅरेज मेकॅनिक म्हणून काम करतात. बघायला हे छोटं काम वाटतं. पण हेच काम करून त्यांची कामाई मात्र मोठी आहे. अनेक भारतीय हे काम अमेरिकेत करतात. हे काम करून ते अलिशान लाईफ जगतात. शिवाय भारतात ही मोठी रक्कम ते पाठवतात. 

नक्की वाचा- Sleep health tips: रात्री कोणीतरी तुम्हाला पाहतय! हा भास नाही तर या मागे आहे वैज्ञानिक कारण, वाचा सविस्तर

अमेरिकेत राहणाऱ्या अमृता सिंग या भारतीय महिलेने याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी हा व्हिडीओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून (@amrita_life_in_usa) टाकला आहे. त्यांनी यात आपल अभूनव सांगितला आहे. तिच्या गॅरेजचा दरवाजा तुटला होता. तो दुरूस्त करायचा होता.  त्यासाठी तिने एका मेकॅनिकला बोलावलं होतं. या मेकॅनिकने अवघ्या 20 मिनिटांत त्या गॅरेजचे काम केले. त्यासाठी त्याने जवळपास 100 डॉलर्स आकारले. म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये तब्बल 9,500 रुपये त्याने घेतले. भारतात ही रक्कम खूप मोठी आहे. असं असलं तरी अमेरिकेत ही रक्कम अत्यंत सामान्य आहे. तिथे कुशल कामगारांच्या (Skilled Workers) कौशल्याला प्रचंड किंमत दिली जाते. 

नक्की वाचा - Weight Loss: भन्नाट देसी डाएट! एका झटक्यात तरुणीने घटवले 26 किलो वजन, वाचा तिचा 'देसी' डाएट प्लॅन

अशी दिवसातून अनेक कामं ही लोक करत असतात. हे कारागिर केवळ मोठी कमाईच करत नाहीत, तर महागड् गाड्यांतून अमेरिकेत फिरताना दिसतात. ऐवढेच नाही तर  संपूर्ण कर (Tax) देखील भरतात. आपल्या समाजात ज्या कामांना अनेकदा 'छोटे' समजले जाते, त्या कामांना अमेरिकेत प्रचंड आदर आणि पैसा मिळतो असं त्यांनी या व्हिडीओतून सांगितलं आहे. आपल्याकडे आजही तरुण सरकारी नोकरी किंवा कॉर्पोरेट जॉब्सच्या मागे धावताना दिसतात.  तर कौशल्यावर आधारित कामांना दुय्यम स्थान देतात. परंतु, अमेरिकेचे हे जीवनशैली मॉडेल आपल्याला शिकवते की, जर तुमच्याकडे योग्य कौशल्य असेल, तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नाव, पैसा आणि प्रतिष्ठा मिळवू शकतो.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com