अमेरिका बुधवारपासून जगभरात रेसिप्रोकल टॅरिफ धोरण लागू करणार आहे. याचा परिणाम भारतासह संपूर्ण जगावर होईल. भारतीय शेअर बाजारावरी त्याचा परिणाम दिसून आला आहे. मंगळवारी शेअर बाजारात मोठ्या घसरणीची नोंद झाली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट म्हणाल्या की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्यापार सल्लागारांसोबत टॅरिफ धोरण लागू करण्यासाठी काम करत आहेत. 2 एप्रिल रोजी याचे दर जाहीर केला जातील. अमेरिकन नागरिकांसाठी आणि अमेरिकन नोकरदार वर्गासाठी हा एक चांगला करार आहे. अमेरिकेकडून 2 एप्रिल रोजी रात्री उशीरा किंवा गुरुवारी सकाळी परस्पर शुल्क लागू केले जातील. याचा भारताच्या व्यापारावर होणारा परिणाम लक्षात घेऊन, वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय त्यांची रणनीती जाहीर करणार आहे. भारत आपल्या वस्तूंच्या आयात शुल्कात लक्षणीय घट करणार असल्याचा दावा केला जात आहे.
( नक्की वाचा : Ratan Tata : रतन टाटांच्या 3800 कोटींच्या संपत्तीमध्ये कुणाला काय मिळालं? वाचा सविस्तर )
काय आहे रेसिप्रोकल टॅरिफ?
डोनाल्ड ट्रम्प यांचे रेसिप्रोकल टॅरिफ हे एक महत्त्वाचे आर्थिक धोरण आहे. ज्याचे उद्दिष्ट अमेरिकन उत्पादनांना जागतिक बाजारपेठेत अधिक स्पर्धात्मक बनवणे आहे. या टॅरिफद्वारे, ट्रम्प सरकारने अमेरिकेला व्यापार करारांमध्ये समान संधी आणि फायदे मिळतील याची खात्री करण्याचा प्रयत्न केला. रेसिप्रोकल टॅरिफ आकारण्याचा मुख्य उद्देश द्वि-मार्गी व्यापार करार संतुलित करण्यासाठी अमेरिकन उत्पादनांवर उच्च आयात शुल्क लादणाऱ्या देशांवर शुल्क लादणे हा आहे.
(नक्की वाचा- Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकाला मंजुरी मिळणार का? लोकसभेतील गणित कसं असेल?)
भारतावर काय परिणाम होणार?
भारतातून अमेरिकेमध्ये निर्यात 30 क्षेत्रांमध्ये आहे. ज्यापैकी सहा कृषी क्षेत्रातील आहेत आणि 24 उद्योग क्षेत्रातील आहेत. प्रत्येकाला वेगवेगळ्या टॅरिफना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वात मोठा औद्योगिक निर्यातदार फार्मास्युटिकल क्षेत्र आहे, ज्याची उलाढाल 12.72 अब्ज डॉलर आहे. काही क्षेत्रांना अतिरिक्त टॅरिफचा सामना करावा लागणार नाही. जर ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढवण्याची घोषणा केली तर भारतातून निर्यात होणाऱ्या अनेक वस्तूंच्या किमती अमेरिकेत वाढतील. परिणामी, अमेरिकेत त्यांचा वापर कमी होऊ शकतो आणि भारताची निर्यात कमी होऊ शकते. अमेरिकेच्या निर्णयाचा खनिज, खनिजे आणि पेट्रोलियम क्षेत्रावर कमीत कमी परिणाम होईल. भारतातून निर्यात होणाऱ्या कृषी क्षेत्रातील वस्तू, मासे, मटण, सी फूट, कोको कॉफी, तांदूळ, मसाले, दूग्धपदार्थ, खाद्य तेल इत्यादी वस्तूवर मोठा परिणाम होईल.