जाहिरात

Trump Tariff : उद्यापासून 50% टॅरिफ लागू; भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम? वाचा तज्ज्ञांचा इशारा

Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 25% अतिरिक्त टॅरिफचे दर बुधवारपासून लागू होतील.

Trump Tariff : उद्यापासून 50% टॅरिफ लागू; भारताच्या अर्थव्यवस्थेवर काय होणार परिणाम?  वाचा तज्ज्ञांचा इशारा
Trump Tariff : या नवीन टॅरिफ दरांमुळे भारतावरील टॅरिफ 50% पर्यंत वाढला आहे.
मुंबई:


Trump Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या 25% अतिरिक्त टॅरिफचे दर बुधवारपासून लागू होतील. होमलँड सिक्युरिटी डिपार्टमेंट (DHS) ने मंगळवार, 26 ऑगस्ट रोजी नवीन टॅरिफची एक अधिसूचना (notification) वेबसाइटवर अपलोड केली आहे. याबाबत असे म्हटले आहे की, ती बुधवार (27 ऑगस्ट) रोजी अधिकृत नोंदणीमध्ये (official register) जारी केली जाईल. या नवीन टॅरिफ दरांमुळे भारतावरील टॅरिफ 50% पर्यंत वाढला आहे.

GDP वर 2% चा परिणाम

या निर्णायामुळे उद्योगांमध्ये थोडं निराशेचं वातावरण आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, याचा निर्यातीवर (exports) लक्षणीय परिणाम होईल. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य आणि ऊर्जा समितीचे अध्यक्ष सुनील जैन यांनी एनडीटीव्हीला सांगितले, 'अमेरिकेने 27 ऑगस्ट, 2025 पासून भारतीय निर्यात उत्पादनांवर 50% टॅरिफ लावला, तर सुमारे 40 बिलियन डॉलर ते 50 बिलियन डॉलरपर्यंतची भारतीय निर्यात प्रभावित होईल. याचा परिणाम GDP वर 1.50% ते 2% पर्यंत होईल.'

( नक्की वाचा : Trump Tariff : टॅरिफ वॉरचा फटका! भारत सरकारचा मोठा निर्णय; अमेरिका पोस्ट सेवा बंद, वाचा नवे नियम )

मदत पॅकेजवर विचार करावा

जैन यांनी पुढे सांगितलं की, भारत चार ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था आहे आणि याचा भारतीय अर्थव्यवस्थेवर जास्त परिणाम होणार नाही. पण 50% टॅरिफमुळे अमेरिकन बाजारपेठेत भारतीय निर्यात उत्पादने कमी स्पर्धात्मक (competitive) होतील, कारण ट्रम्प प्रशासनाने भारताच्या अनेक प्रतिस्पर्धी देशांवर, जसे की इंडोनेशिया, बांगलादेश, तुर्की आणि पाकिस्तान, भारताच्या तुलनेत खूप कमी रेसिप्रोकल टॅरिफ लावला आहे. भारतीय निर्यातीवरील 50% टॅरिफचा परिणाम कमी करण्यासाठी सरकारने मदत पॅकेज देण्याचा विचार केला पाहिजे.

टॅरिफ दोन टप्प्यांत लागू

होमलैंड डिपार्टमेंटने जारी केलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, '6 ऑगस्ट, 2025 च्या राष्ट्रपतींच्या कार्यकारी आदेश 14329 (Executive Order 14329) ला प्रभावी करण्यासाठी, होमलैंड सुरक्षा सचिवांनी हे निश्चित केले आहे की, अमेरिकेच्या सुसंगत टॅरिफ अनुसूची (Harmonized Tariff Schedule of the United States - HTSUS) मध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य कार्यवाही आवश्यक आहे.'

ट्रम्प यांनी टॅरिफच्या पहिल्या टप्प्यातील 25% दरांची घोषणा 30 जुलै रोजी केली होती आणि 6 ऑगस्ट रोजी त्यांनी आणखी 25% अतिरिक्त टॅरिफची घोषणा केली, जो रशियाकडून तेल खरेदी केल्यामुळे लावला गेला आहे. पहिल्या टप्प्यातील टॅरिफ 7 ऑगस्टपासून लागू झाला आहे, तर दुसऱ्या टप्प्याचे दर 27 ऑगस्ट म्हणजे बुधवारपासून लागू होतील.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com