सोशल मीडियाचा वापर करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न अनेक जण करतात. काही जण अनुयायी वाढवण्यासाठी या माध्यमाचा उपयोग करतात. तर काही जणांचं हे पैसे कमावण्याचं माध्यम आहे. विशेषत: यूट्यूबचा वापर करणाऱ्या युझर्सची जगभरात मोठी संख्या आहे. YouTube हे माहिती, मनोरंजन आणि आर्थिक कमाई देणारं माध्यम आहे. त्याचवेळी काही जण याचा वापर सनसनाटी निर्माण करण्यासाठी किंवा मनातील गरळ ओकण्यासाठीही करतात. एक यूट्यबरनंही अशा प्रकारची गरळ ओकत भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी दिली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय म्हणाला Youtuber?
माइल्स रूटलेज असं या यूट्यबरचं नाव आहे. तो ब्रिटीश आहे. त्यानं सोशल मीडियावर भारताची थट्टा करत वंशवादी प्रतिक्रिया दिली. त्याचबरोबर भारतावर अण्वस्त्र हल्ला करेन अशी धमकी दिली. 'भारतासह अन्य देशांवर अण्वस्त्र हल्ला करुन त्यांना नष्ट केलं जाईल. मी ब्रिटनचा पंतप्रधान झालो तर ब्रिटनच्या हितामध्ये हस्तक्षेप करणाऱ्या कोणत्याही देशांवर अण्वस्त्र हल्ला करेन. मी हे मोठ्या गोष्टींबाबत बोलत नाहीय. छोट्या चुकीवरही मी संपूर्ण देश नष्ट करेन. मी भारतावर अण्वस्त्र हल्ला करु शकतो' असं माइल्सनं या व्हिडिओत सांगितलं होतं.
माइल्सनं हा व्हिडिओ प्रदर्शित करतात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. अनेकांनी त्याची खरडपट्टी काढली. त्यानंतर त्यानं ती पोस्ट डिलिट केली.
When I become prime minister of England, I'll open the nuclear silos as an explicit warning to any foreign power that interferes with British interests and affairs.
— Lord Miles (@real_lord_miles) August 20, 2024
I'm not talking huge incidents, I'm itching to launch and atomize entire nations over the smallest infraction. pic.twitter.com/UGBKYB3pku
'मला भारतीय आवडत नाहीच. मी टोपणनाव धारण केलेल्या भारतीयांना देखील ओळखतो. तुमच्याशी कुणी ऑनलाईन गैरवर्तन केलं तर तो भारतीयच असतो,' अशी प्रतिक्रिया माईल्सनं एका युझरला दिलेल्या उत्तरात दिली होती.
तालिबानांच्या तावडीत सापडला होता
भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याची धमकी देणारा माईल्स 2021 साली तालिबाननं अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा तिथं अडकला होता. तालिबान अफगाणिस्तानवर ताबा घेणार हे लक्षात आल्यानंतर तो काबूलला गेला होता. त्यानं ब्रिटीश सरकारच्या इशाऱ्याकडं दुर्लक्ष करत अफगाणिस्तानात प्रवेश केला होता.
( नक्की वाचा : अर्शद नदीमनं चोळलं भारताच्या जखमेवर मीठ, लष्करच्या दहशतवाद्यासोबत दिसला पाकिस्तानचा चॅम्पियन, Video )
तो अफगाणिस्तानमधील प्रवासाचे अनुभव 4chan, Facebook और Twitch या प्लॅटफॉर्मवर शेअर केले होते. तालिबाननं संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर माइल्स तिथंच अडकला. अखेर ब्रिटीश सैन्यानं त्याला बुरखाधारी महिलेच्या वेषात तिथून बाहेर काढलं. त्यानं या सर्व अनुभवावर 2022 मध्ये लेख लिहिला होता.
माइल्स फक्त अफगाणिस्तानच नाही तर युगांडा, केनिया, दक्षिण सुडान, युक्रेनसह जगभरातील वेगवेगळ्या धोकादायक देशामध्ये गेला आहे. त्याला चुकीच्या पद्धतीनं सीमा ओलांडणे तसंच इतर कारणांमुळे जेलमध्येही जावं लागलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world