जाहिरात
This Article is From Apr 11, 2024

अंधश्रद्धेचा कळस : महिलेनं नवऱ्याला भोसकलं, मुलांना धावत्या कारमधून फेकून दिलं, आणि अखेर...

जगातील सर्वात पुढारलेल्या आणि शक्तीशाली समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत अंधश्रद्धेतून एक धक्कादायक प्रकार घडला आहे.

अंधश्रद्धेचा कळस : महिलेनं नवऱ्याला भोसकलं, मुलांना धावत्या कारमधून फेकून दिलं, आणि अखेर...
मुंबई:

सूर्यग्रहण, चंद्रग्रहण या काळात काही तरी अनिष्ट घडेल अशी अंधश्रद्धा एकविसाव्या शतकातही कायम आहे. जगातील सर्वात पुढारलेल्या आणि शक्तीशाली समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत नुकताच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. येथील एका महिलेनं सूर्यग्रहणाला घाबरुन तिच्या पार्टनरची हत्या केली. ती इतक्यावरच थांबली नाही तर तिनं स्वत:च्या मुलांना धावत्या कारमधून फेकून दिला. त्यानंतर तिचं वाहन झाडाला धडकलं. एका रिपोर्टमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे.  डेनियल जॉन्सन असं या महिलेचं नाव आहे. ती तिच्या वेबसाईटवर साप्ताहिक   "aura cleansing" सादर करत होती तसंच राशीभविष्यही वाचत असे. पूर्ण सूर्यग्रहण हे अध्यात्मिक युद्धाचं प्रतिक आहे, असं तिनं सोमवारी सांगितलं होतं.

'स्वत:चं रक्षण करा, आणि तुमचं चित्त थाऱ्यावर ठेवा. जग खूप वेगानं बदलत आहे. त्यामध्ये तुम्हाला कुणाची बाजू घ्यायची असेल तर घ्या. तुमच्या आयुष्यातील गोष्टी सरळ करण्यासाठी अजूनही वेळ आहे,' असं जॉन्सननं 4 एप्रिल रोजी स्वत:च्या एक्स (X) हँडलवर लिहलं होतं. 

पोट दुखतं म्हणून हॉस्पिटलमध्ये गेली, डॉक्टरांनी केले भलतेच उपचार, पुढे काय झाले?

लॉस एंजिल्स टाईम्सच्या रिपोर्टननुसार सोमवारी सकाळी जॉन्सननं तिच्या दोन मुलींसोबत बाहेर जाण्यापूर्वी तिच्या पार्टनरची चाकूनं हत्या केली. जॉन्सनचा पार्टनर हा वायू सेनेत काम करत होता अशी माहिती आहे. त्यानंतर जॉन्सनं तिच्या दोन मुलांना धावत्या कारमधून फेकलं. त्यामधील एका मुलाचं वय 9 वर्ष तर दुसऱ्याचं फक्त 8 महिने होतं. यापैकी फक्त 9 वर्षांचा जीव वाचला आहे. 

या धक्कादायक घटनेच्या अर्ध्या तासानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचली. त्यावेळी एक लक्झरी कार 100 किलोमीटर वेगानं झाडाला आदळल्याचं त्यांना आढळलं. टाईम्सच्या रिपोर्टमुसार या अपघातामध्ये जॉन्सनच्या शरीर छिन्न-विछिन्न झालं होतं तसंच तिची ओळख पटवणं अवघड होतं. पोलीस जॉन्सनच्या घरात दाखल झाले त्यावेळी त्यांना जॉन्सनच्या नवऱ्याचा मृतदेह आढळला. त्याच्या छातीत चाकू खुपसण्यात आला होता. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com