जाहिरात
Story ProgressBack

सलमान खानची सुरक्षा वाढवा, गोळीबारानंतर थेट PM मोदींकडे मागणी

Salman Khan Firing Case: बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे मुंबईतील घर गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर झालेल्या गोळीबारानंतर त्याच्या कुटुंबीयांसह चाहते चिंतेत आहेत.

Read Time: 2 min
सलमान खानची सुरक्षा वाढवा, गोळीबारानंतर थेट PM मोदींकडे मागणी
Salman Khan: सलमान खानच्या सुरक्षेसंदर्भात चाहत्यांसह बॉलिवूड चिंतेत

Salman Khan Firing Case: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर रविवारी (14 एप्रिल 2024) पहाटेच्या सुमारास गोळीबार झाल्याने मोठी खळबळ उडाली. पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास अज्ञातांनी गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार केला आणि तेथून पळ काढला. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास प्रक्रिया सुरू केली आहे. यादरम्यान ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. 

गोळीबाराच्या घटनेबाबत ऑल इंडियन सिनेवर्कर्स असोसिएशनने चिंता व्यक्त केली आहे. ANIने दिलेल्या माहितीनुसार असोसिएशनने जारी केलेल्या  विधानामध्ये म्हटले आहे की, दोन जणांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. सलमान खान केवळ बॉलिवूड किंवा भारतातच नव्हे संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. मुंबईमध्ये विशेषतः शहराच्या व्हीआयपी परिसरामध्ये गोळीबार केला जात आहे. जेथे खुद्द सलमान खान सुरक्षित नाही तेथे सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. निवडणुकीच्या वातावरणात गँगस्टर उघडपणे गोळीबार करताहेत".

असे म्हणत असोसिएशनने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सलमान खानच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्यासह गोळीबार करणाऱ्या टोळीचा खात्मा करण्याचीही मागणी केली आहे. "गोळीबाराच्या घटनेमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भीतीचा फायदा घेऊन गँगस्टर्स बॉलिवूडकडून खंडणी गोळा करू शकतात. कारण बॉलिवूडचा गॉडफादर म्हणून ओळखला जाणाऱ्या सलमान खानलाच टार्गेट केले जात आहे." 

“ऑल इंडियन सिने वर्कर्स असोसिएशन सलमान खान आणि त्याच्या कुटुंबासोबत आहे. कारण सलमान खान आमच्या कुटुंबाचा (बॉलिवूड) भाग आहे. याशिवाय सलमानची जगभरातील लोकप्रियता पाहता गँगस्टर कोणीही असो ते सलमान खानला टार्गेट करून आपलं नाव कमावू इच्छित आहेत. भविष्यामध्ये गोळीबाराच्या घटना टाळण्यासाठी या गुन्हेगारांवर कारवाई करणे महत्त्वाचे आहे. संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री तसेच देश सलमान खानच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”

असे म्हणत असोसिएशनने सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांना आपला पाठिंबा दर्शवला आहे. 

आणखी वाचा

सलमानच्या घरावरील गोळीबाराचा कट रचला अमेरिकेत, शूटर्सची निवड कशी करण्यात आली?

IPL मॅचमध्ये श्रद्धा कपूरच्या डुप्लिकेटवर खिळल्या सर्वांच्या नजरा, व्हायरल फोटोवर अभिनेत्री म्हणाली, 'अरे ही तर...'

30 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अभिनेत्याची लेक दिसते इतकी सुंदर, लुकवर चाहते फिदा
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination