जाहिरात
Story ProgressBack

MLA P. N. Patil: काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास 

कोल्हापूरच्या करवीर मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे आमदार पी. एन. पाटील यांचे गुरुवारी (23 मे 2024) निधन झाले आहे.

Read Time: 1 min
MLA P. N. Patil: काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास 

Congress MLA P. N. Patil: काँग्रेसचे पक्षाचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील यांचे गुरुवारी (23 मे 2024) पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आमदार पी.एन.पाटील हे 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.

रविवारी (19 मे 2024) सकाळी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तातडीने जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपासून काही दिवसांपासून ते कमी रक्तदाबाच्या समस्येचाही सामना करत होते. 

दिग्गजांनी वाहली श्रद्धांजली

काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 

 निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे. 

आणखी वाचा

नक्की वाचा: Exclusive: BJP ला किती जागा मिळतील? जगप्रसिद्ध निवडणूक विश्लेषक इयान ब्रेमर यांनी वर्तवले भाकीत
नक्की वाचा: VIDEO : पोलिसांना शिवीगाळ करणे भोवलं; भाजप खासदार कपिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
नक्की वाचा: अमरावतीच्या शेतकऱ्यांचे अनुदान गेलं काश्मीरात, नक्की काय घडलं?

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
Live Update : मुंबई शिक्षक मतदारसंघाचा कोटा ठरला, उमेदवाराला जिंकण्यासाठी पहिल्या पसंतीची 5,800 मतं लागणार
MLA P. N. Patil: काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास 
nagpur 16 year old boy dies after falling into pit while playing pubg game
Next Article
पबजीने घेतला मुलाचा जीव, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी बुडून मृत्यू 
;