Congress MLA P. N. Patil: काँग्रेसचे पक्षाचे कोल्हापुरातील आमदार पांडुरंग निवृत्ती पाटील उर्फ पी.एन. पाटील यांचे गुरुवारी (23 मे 2024) पहाटेच्या सुमारास निधन झाले आहे. मृत्यूशी त्यांची झुंज अपयशी ठरली आहे. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. आमदार पी.एन.पाटील हे 71 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये शोककळा पसरली आहे.
रविवारी (19 मे 2024) सकाळी चक्कर येऊन पडल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. यानंतर त्यांना तातडीने जिल्ह्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. दरम्यान काही दिवसांपासून काही दिवसांपासून ते कमी रक्तदाबाच्या समस्येचाही सामना करत होते.
दिग्गजांनी वाहली श्रद्धांजली
काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे, असे म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पी.एन.पाटील यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) May 23, 2024
कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे आधारवड, विधिमंडळातील माझे सहकारी आमदार पी एन पाटील यांच्या निधनाने वृत्त अत्यंत दुःखद आहे.
त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाचे आक्रमक आणि निष्ठावान नेतृत्व आज आम्ही गमावले आहे.
श्री.पी एन पाटील यांना भावपूर्ण… pic.twitter.com/OzDkryw4i8
निष्ठावंत नेत्याच्या निधनामुळे काँग्रेसचे मोठे नुकसान झाले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे.
काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) May 23, 2024
त्यांच्यासारख्या निष्ठावंत नेत्याच्या… pic.twitter.com/GJkdmm4txE
आमचे मार्गदर्शक, काँग्रेसचे निष्ठावंत, कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि करवीर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पी. एन. पाटील साहेब यांचे आज पहाटे ६ वाजता निधन झाले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आम्ही त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत.
— Ruturaj S. Patil (@ruturajdyp) May 23, 2024
त्यांच्यासारख्या निष्ठावंत… pic.twitter.com/YZWeDNdjBb
आणखी वाचा
नक्की वाचा: Exclusive: BJP ला किती जागा मिळतील? जगप्रसिद्ध निवडणूक विश्लेषक इयान ब्रेमर यांनी वर्तवले भाकीत
नक्की वाचा: VIDEO : पोलिसांना शिवीगाळ करणे भोवलं; भाजप खासदार कपिल पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
नक्की वाचा: अमरावतीच्या शेतकऱ्यांचे अनुदान गेलं काश्मीरात, नक्की काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world