जाहिरात
This Article is From Jun 13, 2024

पबजीने घेतला मुलाचा जीव, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी बुडून मृत्यू 

Nagpur PUBG News : पबजी गेममुळे 16 वर्षीय मुलावर जीव गमावण्याची वेळ आली आहे.

पबजीने घेतला मुलाचा जीव, वाढदिवसाच्या दुसऱ्याच दिवशी बुडून मृत्यू 

Nagpur PUBG News :पबजी गेममुळे पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पबजी गेम खेळता खेळता 16 वर्षांचा मुलगा पंप हाऊसच्या खड्ड्यामध्ये पडला आणि त्याचा बुडून मृत्यू झाला. नागपूरमधील अंबाझरी तलावाच्या परिसरामध्ये ही घटना घडली आहे. अंधारामध्ये अंबाझरी तलावाच्या काठावर मित्रासोबत पबजी गेम खेळत असताना या मुलाचा मृत्यू झाला. मृत पावलेल्या मुलाचे नाव पुलकीत शहदादपुरी असे आहे. पुलकीतने बुधवारीच (12 जून) आपला वाढदिवस साजरा केला आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ही घटना घडली.   

(नक्की वाचा : माणसांनी खचाखच भरलेली इमारत, बाहेर पडण्याची संधीच नव्हती; कुवेत अग्निशमन दलाने सांगितले-कसे जिवंत जळाले 49 लोक?)

मध्यरात्री 12 वाजता त्याने केक कापला आणि पहाटेच्या सुमारास तो मित्रासोबत गेम खेळण्यासाठी अंबाझरी तलावाच्या काठावर गेला. येथे दोघंही पंप हाऊसजवळ बसून मोबाइलवर गेम खेळत होते.

(नक्की वाचा: पतीला मैत्रिणीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडलं, पत्नीचा पारा चढला अन् पुढे जे घडलं...)

येथे जवळच पंप हाऊसचा 100 फुटांपेक्षाही खोल खड्डा आहे. याच खड्ड्यात पडून पुलकीतचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. 

(नक्की वाचा : ससून हॉस्पिटलचा आणखी एक भोंगळ कारभार, रुग्णांवर या गोष्टीसाठी टाकला जातोय दबाव)

Pune Car Accident Updates | पुणे पोर्शे कार अपघातप्रकरणी मोठी अपडेट, बालहक्क न्यायालयाचा मोठा निर्णय

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com