जाहिरात
6 days ago

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर आजपासून महायुती सरकारच्या कामकाजाला सुरुवात होत आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने चैत्यभूमीवर मोठी गर्दी पाहायला म मुख्यमंत्री चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी येतील. त्यासोबतच राज्यभरातील सर्व महत्वांच्या घडामोडी, राजकीय, शैक्षणिक, शेती विषयक बातम्या वाचा एका क्लिकवर.. 

माजी मंत्री मधुकर पिचड यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांचे निधन झाले आहे. ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  1980 साला पिचड हे पहिल्यांदा विधानसभेवर काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर त्यांनी शरद पवारांना साथ दिली होती. पिचड यांनी विधानसभेचे विरोधीपक्ष नेतेपद ही सांभाळले होते. शिवाय ते आदिवासी विकास खात्याचे मंत्रीही होते. 2019 साली त्यांनी शरद पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 

पुणे विद्यापीठाच्या वसतीगृहात सापडला गांजा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. विद्यापीठाच्या वसतीगृहात गांजा सापडला आहे. जवळपास 12 ग्रॅम गांजा सापडला आहे. दोन विद्यार्थ्यांकडे हा गांजा होता. याबाबत चतुःशृंगी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा NDTV इंडिया फर्स्ट पुरस्कारानं गौरव

केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचा NDTV फर्स्ट पुरस्कारानं गौरव करण्यात आला.

लोकांचा मोदींवर विश्वास - वैष्णव

इतक्या मोठ्या लोकशाही देशात तिसऱ्यांदा एक सरकार निवडून आले आहे. लोकांचा पंतप्रधान मोदींवर विश्वास आहे. त्यामुळेच आज देश वेगानं पुढं जातोय. - अश्विनी वैष्णव, केंद्रीय मंत्री

खासगी क्षेत्रातील पद्म पुरस्कार -संजय पुगालिया

देशभरातील प्रतिष्ठित 'NDTV इंडियन ऑफ द इयर' पुरस्कार कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. एनडीटीव्हीचे एडिटर इन चीफ संजय पुगालिया यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचं स्वागत केलं. या पुरस्कार कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गज उपस्थित आहेत. 'NDTV इंडियन ऑफ द इयर' हा पुरस्कार द्यायला आम्हाला आनंद होतो. हा खासगी क्षेत्रातील पद्म पुरस्कार आहे, असं मत संजय पुगालिया यांनी यावेळी व्यक्त केलं.

NDTV इंडियन ऑफ द इयर हा खासगी क्षेत्रातील पद्म पुरस्कार- संजय पुगालिया

'NDTV इंडियन ऑफ द इयर' हा पुरस्कार द्यायला आम्हाला आनंद होतो. हा खासगी क्षेत्रातील पद्म पुरस्कार आहे असं  एनडीटीव्हीचे एडिटर-इन-चीफ संजय पुगालिया यांनी सांगितलं. 

Manoj Jarange Patil: 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा: मनोज जरांगेंचा इशारा

मनोज जरांगेंनी राज्य सरकारला नवा अल्टीमेटम दिला असून 5 जानेवारीपर्यंत सरकारने मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावावा असं जरांगे म्हणालेत. सरकार स्थापन झाल्याबद्दल महायुती सरकारला शुभेच्छा आहे अस म्हणत आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय. सरकारने 5 जानेवारी पर्यंत मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या पूर्ण कराव्यात नसता मराठे पुन्हा आंदोलनात उभं राहून सरकारला परेशान करणार असा इशारा जरांगे यांनी दिला. 

नाशिक शहरासह ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, पावसामुळे द्राक्ष बागांना फटका

नाशिक शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसापासून हजेरी लावत आहे..

काल रात्री देखील एक ते दीड तास अवकाळी पाऊस शहरात झाला...या पावसामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. या पावसामुळे द्वारका चौकात अद्यापही मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून रस्त्यावर खड्डेच,खड्डे  पडलेले आहेत.

 नाशिक मध्ये गेल्या आठवड्याभरापासून थंडीचे आगमन झाले होते अनेक ठिकाणी थंडीपासून संरक्षण मिळावे यासाठी उबदार कपडे घालून नाशिककर बाहेर पडत होते मात्र दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात बदल पाहायला मिळाला आणि थंडीचा जोर कमी झाला तर दुपारच्या सुमारास उन्हाच्या झळांही नाशिककर अनुभवत आहेत. नाशिकच्या ग्रामीण भागात झालेल्या पावसामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक ठिकाणी विद्युत पुरवठाही खंडित झाला आहे. या पावसामुळे शहरात रोज रात्री मुख्य रस्त्यावर ट्राफिक जामची समस्या निर्माण होत आहे

Supriya Sule Press Conference Delhi: पुढची पाच वर्ष त्यांनी देशाची सेवा करावी... सुप्रिया सुळेंकडून महायुती सरकारला शुभेच्छा

पुढची पाच वर्ष त्यांनी देशाची सेवा करावी. महाराष्ट्राचा हक्क दुसऱ्या कुठल्या राज्याला त्यांनी देऊ नये. फडणवीस काल म्हणाले लाडकी बहीण चे २१०० रुपये सुरू करणार. शक्य असेल तर १ जानेवारी २०२५ पासून ती मान्य करावी, आमची अपेक्षा ३ हजारांची आहे. विरोधकांची सशक्त लोकशाही मधे गरज असते.  आम्ही देशाच्या हितासाठी सहकार्य करत असतो, व्यक्ती हितासाठी आम्ही सहकार्य करत नाही. हा निकाल आम्ही १०० टक्के मान्य करत नाही. आम्ही आयोगात गेलो आहोत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

Telangana: तेलंगणातील बेस कॅम्पवर माओवाद्यांचा हल्ला, 3 जवान जखमी

तेलंगणा सीमेवरील जेडीपल्ली बेस कॅम्पवर माओवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. यामध्ये तीन जवान जखमी झालेत.  काल रात्रीपासून विजापूर सुरक्षा दल आणि नक्षलवादी यांच्यात तब्बल ४ तास चकमक सुरू आहे. विजापूर जिल्ह्यातील पामेड पोलीस ठाण्यांतर्गत जिदापल्ली-2 कॅम्प दोन दिवसांपूर्वी उघडण्यात आला होता.

Kolhapur News: कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला विरोध कायम

कोल्हापुरात शहरालगतच्या गावांचा हद्दवाढीला अद्यापही विरोध कायम आहे. राज्य शासनाने 2017 साली 42 गावांकरीता कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरण स्थापन केलं. मात्र गेल्या 6 वर्षात एक रुपयाचा निधीही प्राधिकरणाला सरकारने दिला नाही. यामुळे गावांचा विकास रखडला गेल्याने प्राधिकरणांतर्गत येणाऱ्या 42 गावांना विकासासाठी 2 हजार कोटींचा निधी राज्य शासनानं द्यावा अशी मागणी करण्यात समितीकडून आलीये. गावांना मिनी शहर म्हणून विकसित करावं, ग्रामीण भागातील जनतेचा हद्दवाढीला विरोध असल्यानं हद्दवाढी विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. 

Prithviraj Chavan: संविधान कधीही नष्ट होणार नाही, याची जनता काळजी घेईल: पृथ्वीराज चव्हाण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आंबेडकरी जनतेला तसेच देशातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.  आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे, त्यांचा पृथ्वीवरचा प्रवास संपला असला तरी त्यांचा विचार, त्यांनी देशाला दिलेलं संविधान ही जनता कधीही विसरू शकत नाही. संविधान वाचवण्याची लढाई आपल्याला कायमस्वरूपी लढावी लागेल. महाराष्ट्रात जे काही आज चाललं आहे, त्या विरोधात जनता प्रखरपणे आपली भूमिका मांडेल. संविधानाचं, समतेच, न्यायाच राज्य येईल. संविधान कधीही नष्ट होणार नाही, याची जनता काळजी घेईल.

Bike Accident News: दुचाकीचा भीषण अपघात, 2 जण ठार

पालघर तालुक्यातील सातपाटी येथून निघालेल्या भरधाव दुचाकीचा रात्री उशीरा शिरगाव येथे भीषण अपघात झाला असून त्यामध्ये दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, चार तरुण एकाच दुचाकीवरून विक्रमगडच्या दिशेने निघाले असता दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी भिंतीवर धडकल्याने हा भीषण अपघात घडला. अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी पालघर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, गाडीवरील चौथा तरुण अपघातानंतर पसार झाला आहे.

बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला वंदन: अजित पवार

बाबासाहेबांच्या विचारांना आणि भारतीय संविधानाला मी वंदन करतो. जनेतेने प्रचंड बहुमताने निवडून दिलेले हे सरकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भारतीय संविधानावर चालेल, असं अजित पवार म्हणाले

Maharashtra Vidhansabha Adhyaksh: कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष; आज शपथविधी

भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर हे आज हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून शपथ घेणार 

राज्यपाल यांच्या उपस्थितीत राजभवन येथे कार्यक्रम . सीएम फडणवीस, डीसीएम अजित पवार शिंदे यांसह काही मान्यवर उपस्थित राहणार

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चैत्यभूमीवर दाखल

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे दाखल झाले आहेत. यावेळी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महामानवाला अभिवादन केले. 

Jalna Rain News: जालना जिल्ह्यात पावसाची बॅटिंग, पिकांचे मोठे नुकसान

जालना जिल्ह्यात अनेक भागात सकाळी पाच वाजल्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावलीय. जालन्यातील भोकरदन, बदनापूर, अंबड तालुक्यातील अनेक भागात  रात्रीच्या सुमारास ही मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय तर सकळी पाच वाजल्यापासून हसनाबाद,, पिंपळगाव कोलते, दाभाडी, राजूर, सर्कल मध्ये पावसाने  गावात सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतात वेचणीला आलेल्या कपाशीच्या पिकांचं मोठं नुकसान  झालं आहेत त्याच बरोबर सोगून ठेवलेल्या मका पिकाला ही मोठा फटका बसलाय या पावसाचा हरभरा,गहू, या पिकांना फायदा होणार असला तरी मोसंबी ,द्राक्ष फळबागांना मोठा फटका बसलाय...

Mahaparinirvan Din: महापरिनिर्वाण दिनानिमित्त अकोल्यात कॅन्डल मार्च रॅली

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८व्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन अकोल्यात भीम अनुयायी यांच्याकडून भव्य कॅन्डल मार्च रॅली काढण्यात आली. दरम्यान अकोला शहरातील विविध भागातून टॉवर चौक, जुने बस स्टँड, धिग्रा चौक, पोस्ट ऑफिस अशोक वाटिका पर्यंत कॅन्डल मार्च काढण्यात आला. दरम्यान भारतीय बौद्ध महासभा तसेच वंचित बहुजन आघाडी आणि शेकडो भीम अनुयायी यांच्याकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पाच डिसेंबर रात्री ११ वाजून ३० मिनिटांनी अभिवादन करण्यात आले.

Ajit Pawar: अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर अमळनेरमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष

महायुतीच्या सरकारमध्ये अजित पवार यांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर अमळनेर मध्ये राष्ट्रवादी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील त्यांच्या समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी एकत्रित येत हा जल्लोष साजरा केला आहे.

Live Updates: पंचवटी एक्सप्रेसवर लावली महामानवाची पूर्णाकृती प्रतिकृती

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नाशिकच्या मनमाडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी महामानवाला आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले.मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणारी व नाशिक जिल्ह्याची जीवन वाहिनी समजल्या जाणाऱ्या मनमाड - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई पंचवटी एक्सप्रेसचे सुपरवायझर रोहित भालेराव यांच्या संकल्पनेतून पंचवटी एक्स्प्रेसच्या इंजिनावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती प्रतिकृती तसेच भगवान बुध्द यांची प्रतिमा लावत इंजिनचा समोर भागाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली व निळे ध्वज लावून सुशोभित करण्यात आला.

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, कळंबमध्ये जल्लोष

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी आरुढ झाल्यानिमित्त कळंब शहरात फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे. प्रथम कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाके - फोडून आणि एकमेकांना पेढे - भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.  छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून, गुलाल उधळून, मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com