जाहिरात
4 months ago

Maharashtra MLA Oath-Taking Ceremony LIVE : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर विधानसभेचं तीन दिवसीय विशेष अधिवेशन सुरू आहे. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कालिदास कोळंबकर यांना हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी शनिवारपासून सुरु झाला आहे. शनिवारी एकूण 173 नवनिर्वाचित आमदारांनी शपथ घेतली. आज दुसऱ्या दिवशी 114 आमदार शपथ घेणार आहेत. महाविकास आघाडीचे आमदार आज शपथ घेतील. शपथ घेतल्यावर सर्व आमदार ईव्हीएमविरोधात आंदोलन करणार असल्याचीही माहिती आहे. 

Maharashtra Politics: 'सागर'वर मोठ्या घडामोडी! राहुल नार्वेकर, सुनील तटकरे CM फडणवीसांच्या भेटीला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर राहुल नार्वेकर यांनी थोड्या वेळापूर्वी भेट घेतली उद्याच्या विधानसभा अध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर राहुल नार्वेकर यांची भेट... त्यासोबत चंद्रशेखर बावनकुळे तसेच सुनील तटकरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली...

Kalyan Crime: उसन्या पैशाच्या वादातून महिलेवर हल्ला, कल्याणमधील घटना

कल्याण शीळ रोड वरील टाटा पावर परिसरातील धक्कादायक घटना समोर आली असून महिलेवर  चाकूने हल्ला करण्यात आला आहे. ज्यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. उसने दिलेल्या पैशांवरून  दोन महिलांमध्ये वाद झाला होता. याच वादातून एका महिलेच्या भावाने दुसऱ्या महिलेवर चाकूने हल्ला केला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे. 

Kolhapur News: महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा पेटण्याची शक्यता

कर्नाटक पोलिसांच्या वतीने कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर नाकाबंदी 

उद्याच्या मराठी भाषिकांच्या मेळाव्यापूर्वी कर्नाटक प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त 

महाराष्ट्रातील नेत्यांना अडवण्यासाठी जोरदार तयारी 

निपाणी पोलिसांकडून कोगनोळी दूधगंगा नदीवर नाकाबंदी 

आज सकाळपासून सीमेवर जादा पोलिस मागवून वाहनांची तपासणी सुरू 

 महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या चारचाकी वाहनधारकांची चौकशी करून सोडल जात आहे

Dhule News: आमदार जयकुमार रावल यांचे धुळ्यात जंगी स्वागत

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जयकुमार रावल सलग पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आले असुन, त्यांना विधानसभेत तालिका अध्यक्ष पदाचा सन्मान देखील मिळाला आहे... संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी ही सन्मानाची बाब असून आमदार जयकुमार रावल यांचे धुळ्यात आगमन होताच गोंदूर विमानतळ या ठिकाणी त्यांचे धुळे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केले... धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी देखील आमदार जयकुमार रावल यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.

Pune Shindenagar Fire News: पुण्यात फोटो स्टुडिओला भीषण आग, परिसरात धुराचे लोट

पुण्यामधील शिंदेनगर भागात भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. शिंदे नगरमधील एका फोटो स्टुडिओला ही भीषण आग लागली. या आगीने रौद्ररुप धारण केले असून परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 

Nashik Hindu Morcha: बांग्लादेशमधील हिंदू बांधवांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा

बांगलादेशामध्ये ज्याप्रमाणे अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू बांधवांवर अत्याचार होत आहे त्याच्या निषेधार्थ नाशिकच्या हिंदू संघटनांनी आज नाशिक शहरात पाच विभागांमध्ये मुक मोर्चे काढले  या मोर्चामध्ये सर्व हिंदू संघटना आणि साधुसंत महिला देखील सहभागी झाले आहेत .

Akola Accident: अकोल्यात भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

अकोल्यातील अकोला पातुर रोडवर  एका माकडाला वाचवण्याचा प्रयत्नात एका दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. एका आठवड्यात या रोडवर दोन ते तीन अपघात होऊन तीन ते चार व्यक्तींचा मृत्यू झाल्याची बाब आता समोर आली आहे. दरम्यान आज सायंकाळी सुद्धा ५:३० मिनिटाच्या सुमारास एका दुचाकी स्वारासमोर माकड आडवे आल्याने माकडाला वाचवण्याच्या प्रयत्नात हा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

Indapur News: इंदापूरच्या तरंगवाडी गावात ईव्हीएमच्या समर्थनार्थ रॅली

एकीकडे माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीतील काही ग्रामस्थांनी ईव्हीएम ला कडाडून विरोध दर्शवत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली असतानाचं इंदापूर तालुक्यातील तरंगवाडीत इव्हीएमचं समर्थन करण्यात आलेय. 

तरंगवाडी गावात ग्रामस्थांनी चक्क घोड्यावरुन ईव्हीएम मशीनच्या प्रतिकृतीची डीजे च्या तालात वाजत गाजत गावातून रॅली काढलीय.राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष डाॅ.शशिकांत तरंगे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली.

Pune News: पुणे जिल्ह्यातील सर्व पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात जाणार

पुणे जिल्ह्यातील पराभूत उमेदवार जाणार सुप्रीम कोर्टात जाणार आहेत.  Evm विरोधात पुणे जिल्ह्यातील सर्व पराभूत उमेदवार सुप्रीम कोर्टात करणार याचिका दाखल करणार आहेत. येत्या मंगळवारी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष आणि हडपसरचे उमेदवार प्रशांत जगताप यांनी दिली आहे. 

Devendra Fadnavis On Sharad Pawar: शरद पवार ज्येष्ठ नेते, त्यांनी पराभव मान्य करावा: CM देवेंद्र फडणवीस

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी झालेला पराभव मान्य करावा.. असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या ईव्हीएमविरोधातील आंदोलनावरुन महत्वाचे विधान केले आहे. कोपर्डी येथे ते माध्यमांशी बोलत होते. 

Kalyan Dog Attack: कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, चिमुकल्याचे लचके तोडले

टिटवाळ्यानंतर कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत! कल्याण बेतूरकरपाडा परिसरातील धक्कादायक घटना. भटक्या कुत्र्याचा आठ वर्षाच्या चिमुकल्यावर हल्ला,कुत्र्याने घेतला चिमूकल्याचे गुप्तांग आणि तोंडाचा चावा. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत ,वारंवार तक्रारी करून देखील केडीएमसीचे दुर्लक्ष , अधिकारी एसी कार्यलयात बसून कामं करतात ,नागरिकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप 

मुंबईत ठाकरे गटाचा मनसेला धक्का, घाटकोपरमधील मनसे पदाधिकाऱ्यांनी हाती बांधलं शिवबंधन

घाटकोपर पूर्व विधानसभेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखा अध्यक्ष संतोष पिंगळे, माजी शाखा अध्यक्ष सुनील भोस्तेकर आणि सतीश पवार आपल्या सुमारे २५० ते ३०० समर्थकांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. उद्धव टाकरे यांनी शिवबंधन बांधून सर्वांचे पक्षात स्वागत केले.

बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराविरोधात भिवंडीत निदर्शने

बांगलादेशात मागील दोन महिन्यांपासून अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे.कट्टर पंथीय मुस्लिमां कडून बांगलादेशातील हिंदूंची घरे दुकाने जाळली जात आहेत.तर महिलांवर पाशवी अत्याचार होत आहेत.याविरोधात भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे सकल हिंदू समाजातर्फे निदर्शने करण्यात आली. 

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, नियंत्रण कक्षाला फोन

पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी, पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आला फोन. खोडसाळपणे फोन केल्याची पुणे पोलिसांची माहिती. अज्ञात व्यक्तीकडून खोडसाळपणे पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी. फोन करणाऱ्या व्यक्तीला पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात. फोन करणार व्यक्ती वय 40 पिंपरी-चिंचवड भागातील रावेत येथील राहणारा असल्याची माहिती. या व्यक्तीला पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून,  पिंपरी - चिंचवड पोलिसांकडून सदरील व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध होणार, महायुतीकडून राहुल नार्वेकरांकडून अर्ज दाखल

विधानसभा अध्यक्ष निवडणूक बिनविरोध होणार, महायुतीकडून राहुल नार्वेकरांकडून अर्ज दाखल, महाविकास आघाडी उमेदवार देणार नसल्याचं निश्चित, विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेते पदासाठी महाविकास आघाडीचे नेते आग्रही,  मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक चर्चा करू असं आश्वासन दिलं आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

शिवसेना ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला. विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मागणी केली. सकारात्मक चर्चा करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी भरला अर्ज

विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर यांनी भरला अर्ज, मुख्यमंत्र देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे , चंद्रकांत पाटील इत्यादी नेते होते उपस्थित

महाविकास आघाडी देखील विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार?

महाविकास आघाडी देखील विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार?

महाविकास आघाडीच्या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा

शपथविधी पार पडल्यानंतर लगेच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसणार 

विधानसभा अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरणार की नाही याबाबत निर्णय घेणार, सूत्रांची माहिती

महाविकास आघाडी देखील विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार?

महाविकास आघाडी देखील विधानसभा अध्यक्ष पदासाठी अर्ज भरणार?

महाविकास आघाडीच्या बैठकीत अध्यक्ष पदाबाबत चर्चा

शपथविधी पार पडल्यानंतर लगेच महाविकास आघाडीचे नेते एकत्रित बसणार 

विधानसभा अध्यक्ष पदासाठी फॉर्म भरणार की नाही याबाबत निर्णय घेणार, सूत्रांची माहिती

MLA Oath-Taking Ceremony LIVE: आमदारांचा शपथविधी सुरु, दुसऱ्या दिवशी उर्वरित 114 आमदार घेणार शपथ

MLA Oath-Taking Ceremony LIVE: आमदारांचा शपथविधी सुरु, दुसऱ्या दिवशी उर्वरित 114 आमदार घेणार शपथ

भाजप आमदार किसन वानखेडे विधानभवनात सहकुटुंब दाखल

भाजप आमदार किसन वानखेडे विधानभवनात सहकुटुंब दाखल, विधानभवनाच्या पायऱ्यांना नतमस्तक होऊन केला विधानभवनात प्रवेश

राहुल नार्वेकर हेच पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार?

राहुल नार्वेकर हेच पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, नार्वेकर थोड्याच वेळात अध्यक्षपदाचा अर्ज दाखल करणार

आज आम्ही शपथ घेणार आहोत- विजय वडेट्टीवार

EVM चा निषेध करण्यासाठी आम्ही शपथ घेतली नाही. मात्र आज आम्ही शपथ घेणार आहोत.  मी विरोधी पक्ष नेतेपदासाठी ची माहिती मागवली होती, ती माहिती मला अद्याप मिळालेली नाही. ती माहिती प्राप्त देखील होणार नाही. कारण का असं कुठेही लिखित नाही. विधानसभाध्यक्ष पदासाठी आम्ही रस दाखवलेला नाही, असं काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं. 

महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी

महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याची शक्यता कमी 

संख्याबळ नसल्याने विनाकारण हसू नको असा  मत प्रवाह

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

हिवाळी अधिवेशनासंदर्भात आज मुहूर्त ठरणार

नागपूर अधिवेशनाची तारीख आजच ठरणार

विधानसभेसाठी काय कामकाज ठेवता येईल? यावरही होणार चर्चा

विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सामील होणार का? याकडे लक्ष

उत्तर भारतातील तापमानाचा पारा घसरला, ताजमहल धुक्याच्या चादरीत हरवला

उत्तर भारतातील तापमानाचा पारा घसरला, ताजमहल धुक्याच्या चादरीत हरवला

नाशिकच्या मेळा बस स्थानकात चौकशी कक्षाला बस धडकली, अपघातात एक ठार तर दोघे गंभीर

नाशिकच्या मेळा बस स्थानकात फलाट क्रमांक सहाच्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला बस धडकली, बसचे नियंत्रण सुटल्याने बस थेट घुसली स्थानकात. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक बसने चिरडले दोन ते तीन प्रवासी. बस चालकच नियंत्रण सुटल्याने घडला अपघात, अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी असल्याची माहिती. रात्रीच्या वेळी बस ठरल्या वेळेत बस स्थानकात आल्यानंतर बस चालकाचा नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची माहिती. बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती.

ओडिशातून गांजा घेऊन येणाऱ्या दोन तस्करांना अटक, 26 किलो गांजा जप्त

दोन मोठ्या बॅगमध्ये ओडिशाहून गांजा घेऊन आलेल्या दोन तस्करांना अमरावतीच्या गुन्हे शाखा युनिटने अटक केली आहे. त्यांच्याकडून 26 किलो गांजा व साहित्यासह एकूण पाच लाख 32 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही आरोपी गांजा घेऊन ओडीसाहून नागपूरला आले, तेथून खासगी वाहनाने ते अमरावतीच्या पंचवटी चौकात उतरले, त्याच ठिकाणी अमरावती क्राईम ब्रँच युनिटने दोघांनाही बेड्या ठोकल्या, असे चौकशी दरम्यान आढळून आले आहे

भंडाऱ्यात ट्रॅक्टर उलटून अपघात, चालकाचा जागीच मृत्यू

भंडारा जिल्ह्यातील लोहारा ते धोप मार्गावर गिट्टी घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटून अपघात झाला. दरम्यान हा अपघात इतका भयावह होता की जितेंद्र राऊत वय 55 राहणार मिटेवानी या ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला. दावेझरी येथील दुधराम पटले  यांच्या मालकीचा तो ट्रॅक्टर असून गिट्टी घेऊन जात असताना अचानक ट्रॅक्टर नियंत्रणाबाहेर जाऊन पलटी झाला. 

Track Latest News Live on NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: