जाहिरात
19 minutes ago

NDTV Marathi Manch: महाराष्ट्राच्या प्रगतीत मोलाचे योगदान देणाऱ्या आणि विविध क्षेत्रांत राज्याला नवी दिशा देणाऱ्या महिला नेतृत्वाचा गौरव करण्यासाठी 'एनडीटीव्ही मराठी'तर्फे 'एनडीटीव्ही मराठी मंच: अनस्टॉपेबल महाराष्ट्र' (NDTV Marathi Manch: Unstoppable Maharashtra) या विशेष कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष कॉन्क्लेव्हची थीम 'नारी शक्ती महाराष्ट्राची' अशी आहे. महाराष्ट्र घडवणाऱ्या रणरागिणींच्या या भव्य दिव्य महाउत्सवामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राजकारण, उद्योग, प्रशासन, कला आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज महिला सहभागी होणार आहेत. या सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स येथे वाचा...
 

IPS मोक्षदा पाटील LIVE

ग्रामीण भागातील तरुणींना संधी दिली पाहिजे- मोक्षदा पाटील

ग्रामीण भागातील महिला पोलिसांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द आहे- मोक्षदा पाटील

ग्रामीण भागातील आमच्या महिला पोलिसांमध्ये काहीतरी करुन दाखवण्याची जिद्द आहे. त्यांना संधी दिली की त्याचं ते सोनं करतात हे माझं निरीक्षण आहे. - मोक्षदा पाटील

ग्रामीण भागातील तरुणींना संधी दिली पाहिजे- मोक्षदा पाटील

मोक्षदा पाटील, IPS अधिकारी आपल्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मुलींमध्ये प्रचंड टॅलेंट आहे. आपण त्यांना संधी दिली पाहिजे. मात्र आपण हे फक्त बोलून दाखवतो, प्रत्यक्षात कुठेतरी विसरतो.

NDTV Marathi Manch Live: लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना वगळले गेले - सुप्रिया सुळे

लाडकी बहीण योजनेत निवडणुकी आधी 2 कोटी 46 लाख महिलांना पहिल्यांदा पैसे दिले गेले. त्यानंतर आता 1 कोटी 66 लाख महिलांना पैसे दिले गेले. 80 लाख महिला वगळल्या गेल्या. पण वेबसाईटवर 1 कोटी 12 लाख महिलांनाच योजनेचे पैसे दिले गेले. म्हणजे  1 कोटी 25 महिला कमी झाल्या. हा महाराष्ट्र सरकारचा वेबसाईटवरचा डेटा आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

NDTV Marathi Manch Live: भाजपमध्ये टॅलेंट नव्हतं का असं म्हणावं लागेल - सुप्रिया सुळे

भाजपने काँग्रेसमुक्त केल्यानंतर काही नवीन नेते तयार करतील असं आम्हाला वाटत होतं. पण 12 वर्षात त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचेच लोक दमदाटी करून त्यांच्या पक्षात घ्यावे लागत आहेत. असं होत असेल तर मला चिंता वाटते भाजपकडे टॅलेंटचं नव्हतं का? असा प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. 

NDTV Marathi Manch Live: पुणे हे क्राईम कॅपीटल झालं आहे - सुप्रिया सुळे

महाराष्ट्राच्या पोलीसांचा अभिमान आहे. पण त्यांच्या मागे ज्या अदृष्य शक्ती आहेत, त्यावर माझा आक्षेप आहे.  गृहमंत्र्यांचा डेटा सांगतो, देशात क्राईममध्ये पाचव्या क्रमांक पुणे आहे. आज पुणं राज्याचं क्राईम कॅपिटल झाली आहे. त्यामुळे त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून मला लाज वाटते. याला जबाबदार पुण्याचे कारभारी आहेत. पुण्याच्या कारभाऱ्यांना सक्तीच्या सुट्टीवर पाठवा अशी मागणी यावेळी सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. 

NDTV Marathi Manch Live: सरकारने आम्हाला सांगितलं एक आणलं दुसरं - सुप्रिया सुळे

आमचं समर्थन नारी शक्ती विधेयकाला आहे. आमचे मतभेद कुठे आहेत,जागा पन्नास टक्के वाढवून असं सरकारने सांगितलं होतं. पण तसं बिलात नव्हतं. आम्हाला सांगितलं एक विधेयकात आणलं दुसरं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. 

NDTV Marathi Manch Live: इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला विरोध नाही - सुप्रिया सुळे

 NDTV Marathi Manch Live: इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला विरोध नाही असं  सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.   इंडिया आघाडीचा नारी शक्ती विधेयकाला विरोध नाही. ते आमचं विधेयक आहे. आमच्या सरकार वेळी ते विधेयक आणलं गेलं. महिलांना आरक्षण देणारं पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. शरद पवार हे त्यावेळी मुख्यमंत्री होते. असं त्या म्हणाल्या. 

NDTV Marathi Manch Live: नारी शक्ती उत्सवाला सुरूवात, सुप्रिया सुळे यांची उपस्थिती

NDTV Marathi Manch Live: नारी शक्ती उत्सवाला सुरूवात झाली आहे. या उत्सवाच्या पहिल्या सत्रात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची उपस्थिती आहे.  

NDTV Marathi Manch Live: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंचे आगमन

NDTV Marathi Manch Live: राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नारी शक्ती उत्सवाच्या ठिकाणी नुकतेच आगमन झाले आहे. 

NDTV Marathi Manch Live: नारी शत्ती महाराष्ट्राची

NDTV Marathi Manch: नारी शक्ती उत्सवाला थोड्या वेळात सुरूवात होणार

NDTV Marathi Manch: नारी शक्ती उत्सवाला थोड्याच वेळात  सुरूवात होणार आहे.  या उत्सवात राजकारण, कला, क्रीडा, प्रशासन क्षेत्रातील दिग्गज महिलांची उपस्थिती असणार आहे.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com