जाहिरात

Gatari Amavasya : गटारी थांबायची नाय! तुफान पावसातही नॉनव्हेज प्रेमींची चिकन दुकानाबाहेर गर्दी

मात्र यंदा आषाढाचा शेवटचा दिवस गुरुवारी आला असल्याने आज बुधवारी राज्यभरात गटारी साजरी केली जात आहे.

Gatari Amavasya : गटारी थांबायची नाय! तुफान पावसातही नॉनव्हेज प्रेमींची चिकन दुकानाबाहेर गर्दी

Gatari Amavasya 2025 : शुक्रवारी 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. त्यापूर्वीचा दिवस हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो. या दिवशी गटारी साजरी करण्याची प्रथा आहे. मात्र यंदा आषाढाचा शेवटचा दिवस गुरुवारी आला असल्याने आज बुधवारी राज्यभरात गटारी साजरी केली जात आहे. त्यात आज हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, उपनगरासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा भरपावसातही खवय्यांनी मटणाच्या दुकानाबाहेर गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. 

नवी मुंबईकरांसाठी विशेष म्हणजे नेरूळ आणि जुईनगर या भागातील रहिवाशांसाठी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक विशाल ससाने यांनी गटारीच्या निमित्ताने खास ऑफर दिली आहे. गटारीच्या निमित्ताने या भागात अडीच हजार किलो चिकनच वाटप या दोन प्रभागातील लोकांसाठी करण्यात येत आहे.  मात्र यासाठी रहिवाशांना आधार कार्ड अनिवार्य असेल. आधार कार्ड दाखवून प्रत्येक परिवाराला एक किलो चिकन वाटप करण्यात येत आहे. यानिमित्ताने नवी मुंबईकरांनी चिकनच्या दुकानाबाहेर मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. 

Rain Update : आठवडाभर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 'सैराट' पाऊस; सुट्टीचा प्लान करीत असाल तर अलर्ट व्हा!

नक्की वाचा - Rain Update : आठवडाभर कोकण, पश्चिम महाराष्ट्रात 'सैराट' पाऊस; सुट्टीचा प्लान करीत असाल तर अलर्ट व्हा!

पुणे जिल्ह्यासह कोल्हापूर, साताऱ्यात पावसाचा यलो अलर्ट; पुढील ३ तास महत्वाचे

आज पुणे जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या सचेत अ‍ॅपद्वारे देण्यात आलेल्या अलर्टनुसार, पुढील तीन तासांत पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालय, मुंबईकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हवामानातील या बदलामुळे नदी-नाल्यांना पाणी येण्याची शक्यता आहे, तसेच खाचखळग्यांतून जाणाऱ्या वाहनचालकांनी विशेष काळजी घ्यावी.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com