जाहिरात

Aadhaar Card: आधार कार्डबाबत ‘या’ 5 गोष्टी अनेकांना माहित नाहीत; नियमांचं उल्लंघन केलं तर जेल आणि मोठा दंड

Aadhaar Card Rules: UIDAI ने निश्चित केलेले हे नियम अनेकांना माहिती नाहीत. हे नियम कोणते? ते नियम मोडले तर काय शिक्षा होऊ शकते? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

Aadhaar Card: आधार कार्डबाबत ‘या’ 5 गोष्टी अनेकांना माहित नाहीत; नियमांचं उल्लंघन केलं तर जेल आणि मोठा दंड
Aadhaar Card Rules: आधार कार्डबाबतचे हे नियम मोडले तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते.
मुंबई:

Aadhaar Card Rules: आजच्या काळात आधार कार्ड हे प्रत्येक भारतीयासाठी सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का, आधार कार्डचा चुकीचा वापर केल्यास तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते? युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने आधार कार्डसंदर्भात काही कठोर नियम बनवले आहेत. या नियमांचे उल्लंघन केल्यास व्यक्तीला तुरुंगवास आणि मोठा दंड भरावा लागू शकतो.

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ही संस्था आधार कार्ड जारी करते. UIDAI ने आधार कार्डशी संबंधित अनेक नियम तयार केले आहेत, ज्यांचे पालन करणे प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास व्यक्तीला तुरुंगवास किंवा मोठा दंड भरावा लागू शकतो. UIDAI ने निश्चित केलेले हे नियम अनेकांना माहिती नाहीत. हे नियम कोणते? ते नियम मोडले तर काय शिक्षा होऊ शकते? हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.  

आधार कार्डबाबतचे खालील नियम मोडले तर तुम्हाला शिक्षा होऊ शकते.

आधार कार्डमध्ये चुकीची माहिती देणे

आधार कार्ड बनवताना किंवा त्यात अपडेट करताना UIDAI ला योग्य आणि खरी माहिती देणे बंधनकारक आहे. एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून चुकीची माहिती दिली तर तो एक गंभीर गुन्हा मानला जातो. अशा परिस्थितीत, गुन्हेगाराला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांचा दंड भरावा लागू शकतो.

( नक्की वाचा : आधार, पॅन आणि मतदार ओळखपत्रही नाही... तरीही नागरिकत्व कसे सिद्ध करणार? वाचा सर्व माहिती )
 

इतरांच्या आधार कार्डमध्ये बदल करणे

कोणतीही व्यक्ती जर दुसऱ्या कोणाच्या आधार कार्डमधील माहितीमध्ये बदल करण्याचा किंवा त्यांची ओळख बदलण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा एक मोठा गुन्हा आहे. अशा गुन्हेगाराला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो.

बेकायदेशीरपणे आधार कार्ड एजन्सी 

 UIDAI ची परवानगी न घेता आधार कार्डशी संबंधित कोणतीही एजन्सी किंवा सेंटर सुरू करणे आणि लोकांची माहिती गोळा करणे हा सुद्धा एक गुन्हा आहे. या प्रकारच्या गुन्हेगाराला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. एखादी कंपनी असे करत असेल तर त्या कंपनीला 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.

( नक्की वाचा : Amul Price Cut: अमूलकडून ग्राहकांना 'दिवाळी' भेट: बटर, चीजसह 700 हून अधिक उत्पादने स्वस्त, जाणून घ्या नवे दर )
 

खासगी माहिती लीक करणे

एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डवरील खासगी माहिती (Personal Information) कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देते किंवा लीक करते, तर तो एक गुन्हा मानला जातो. या प्रकरणात, दोषी व्यक्तीला 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो.  एखाद्या कंपनीकडून असे कृत्य घडले तर 1 लाख रुपयांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

आधार केंद्रावर गुन्हा

एखादी व्यक्ती आधार केंद्रावर किंवा डेटा सेंटरमध्ये हॅकिंग (Hacking) किंवा डेटा चोरी (Data Theft) यांसारखे गुन्हे करते, तर त्याला अत्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे. अशा गुन्हेगाराला 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपयांपासून ते 10 लाख रुपयांपर्यंतचा मोठा दंड होऊ शकतो.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com