Earthquake Hits Near Japan : जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा एक शक्तिशाली भूकंप झाल्याची भयानक घटना घडलीय. जपानच्या हवामान खात्याने याबाबत माहिती दिलीय.सोमवारी उत्तर जपानमध्ये 7.6 तीव्रतेचा एक शक्तिशाली भूकंप झाला,यामुळे त्या भागातील किनारी प्रदेशात 40 सेंटीमीटरपर्यंत सुनामी येण्याचा इशारा देण्यात आला आहे. हा भूकंप जपानच्या मुख्य होंशू बेटाच्या सर्वात उत्तरेकडील प्रांत आओमोरीच्या पूर्वेस आणि होक्काइडो बेटाच्या दक्षिणेस झाला, असं एका एजन्सीने म्हटलं आहे. होक्काइडो प्रांतातील उराकावा शहर आणि आओमोरी प्रांतातील मुत्सु ओगावारा बंदरावर 40 सेंटीमीटरची सुनामी आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
एनएचकेच्या अहवालात काय म्हटलंय?
सार्वजनिक प्रसारक एनएचकेच्या अहवालानुसार, आओमोरीच्या हाचिनोहे शहरातील एका हॉटेलमध्ये अनेक लोक जखमी झाले आहेत.
पंतप्रधान साने ताकाइची यांनी पत्रकारांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय की,सरकारने नुकसानीचे तात्काळ मूल्यांकन करण्यासाठी एक आपत्कालीन सेवा उपलब्ध केली आहे.
A Twitter user in northern Japan shared this video frightening video of tsunami warnings blaring from speakers, warning people to evacuate to high ground. The earthquake struck after 11PM, so many people were probably in bed when the shaking started. pic.twitter.com/bjsXhOLxWA https://t.co/QXu1CXR0GX
— Jeffrey J. Hall 🇯🇵🇺🇸 (@mrjeffu) December 8, 2025
लोकांच्या आरोग्याची काळजी घेत आहोत. त्यांचं आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्या भागातील अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा तपासणी केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world