जाहिरात

Kalyan News: कल्याणमध्ये पाऊल टाकताच अलर्ट राहा, एका आठवड्यात 2 जणांचा मृत्यू, नगरसेविकेची महापालिकेत धाव

कल्याण परिसरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

Kalyan News: कल्याणमध्ये पाऊल टाकताच अलर्ट राहा, एका आठवड्यात 2 जणांचा मृत्यू, नगरसेविकेची महापालिकेत धाव
Kalyan News Today KDMC
मुंबई:

Kalyan News Today : भटक्या कुत्रा चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्याच्या भीतीपोटी कल्याण पूर्वेतील एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. ही घटना ताजी असताना आत्ता पुन्हा कल्याण येथील मोहने गाळेगाव परिसरात एका सात वर्षाच्या मुलाला भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. खुशील शंकर वाघे असं मृत मुलाचं नाव आहे. कल्याण परिसरात दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांची दहशत वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, खुशील हा मोहनेनजीक गाळेगाव परिसरातील कातकरी पाड्यात राहतो. या आदीवासी मुलाचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. मृत मुलाचे आई-वडील मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. खुशीलला भटका कुत्रा चावला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. खुशीलला जेव्हा कुत्रा चावला त्याचवेळी आणखी एका मुलाला कुत्र्‍याने चावा घेतला होता. तो मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

नक्की वाचा >> प्रवाशांनो! हायवेवर Truck Lay-By बोर्ड का लावतात? काय आहे त्याचा नेमका अर्थ? 'ते' अपघात टळू शकतात

त्या नगरसेविकेनं महापालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली अन्..

या घटनेची गंभीर दखल घेत शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात घाव घेतली.गायकवाड यांनी महापालिका आयुक्त आणि महापौरांची भेट घेतली.बल्याणी चौक,उंभार्णी,मोहिली,गाळेगाव,जेतवननगर, तिपन्नानगर,आर.एस.टेकडी मोहने परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. 

नक्की वाचा >> Satara News: साताऱ्याची सकाळ धडकी भरवणारी, स्थानिकांसह पर्यटकांमध्ये थरथराट, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर

भटक्या कुत्र्यांकडून रस्त्यावर येजा करणाऱ्या व्यक्तींवर हल्ला केला जातो. भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असू नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. भटक्या कुत्र्यांकडून चावा घेतला जातो. भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी विशेष पथक आणि गाडी फिरविण्यात यावी,भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यात यावे,भटक्या कुत्र्यांचे लसीकरण करण्यात यावे, अशा मागण्या नगरसेविका गायकवाड यांनी महापालिका प्रशासनाकडे केल्या आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com