
अमरावती महापालिकेतील तब्बल 700 कर्मचाऱ्यांनी अचनाक काम बंद आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे अमरावती महापालिकेचे कामकाज ठप्प झाल्याचे चित्र आहे. वारंवार आंदोलन करूनही आपल्या मागण्या पूर्ण होत नाही हे लक्षात आल्यानंतर कार्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला. मनपा आयुक्तांनी आश्वासन देऊनही मागण्या पूर्ण न केल्याने अमरावती मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. शिवाय काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या आंदोलनात तब्बल 700 कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सहभागी झाले आहेत. त्यामुळे मनपा कार्यलयात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. या आंदोलनाचा फटका मनपाच्या कामकाजाला बसला असून कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. सहाव्या, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी, महागाई भत्ता देण्याची मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा - नको गोवा..आता कोकणची हवा ! पर्यटकांची पसंती 'या' समुद्रकिनाऱ्यांना
जवळपास दोन महिन्यांत मनपाला 40 कोटी रुपये मालमत्ता कर कर्मचाऱ्यांनी जमा करून दिला. मात्र, तरीही मनपा आयुक्त कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करत नसल्याचा आरोप होत आहे. अनेकदा आंदोलन करूनही मनपा प्रशासनाला जाग आली नाही. त्यामुळे बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world